स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची साखरखेर्डा येथे धाड ; १८ लाख २१ हजार ९२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटका जप्त
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची साखरखेर्डा येथे धाड
१८ लाख २१ हजार ९२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटका जप्त
साखरखेर्डा (बुलढाणा):-
महाराष्ट्र प्रतिबंधित गुटका कायद्यांतर्गत साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी १८ लाख २१ हजार ९२१ रुपयांचा प्रतिबंधित गुटका जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक बुलढाणा, निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, अमोल गायकवाड आणि अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिष रोही, पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत दोन आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे. आरोपी :
1. शेख इम्रान शेख चांद
2. शेख मुस्ताक शेख खलील
दोन्ही आरोपी साखरखेर्डा येथील राहणारे आहेत.
कायद्याचे कलम :
अन्न सुरक्षा व मानदंड कायदा २००६ कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), (e), ३(१)(zz)(iv) व ५९ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५, १२३, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनला हजर करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ह्या धडाकेबाज कारवाईमध्ये पीएसआय प्रताप बाजड, हे. कॉ. गजानन दराडे, शरद गिरी, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, पो कॉ. मनोज खार्डे हे . कॉ. राजु आडवे, साखरखेर्डा एपीआय गजानन करेवाड, अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांनी भाग घेतला.
पोलिसांनी प्रतिबंधित गुटका विक्री व साठवणुकीविरुद्ध कठोर कारवाई सुरु ठेवली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सूचित केले आहे.

टिप्पण्या