ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या : : मनोरमानगरमध्ये प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायरिंग; उपचारादरम्यान मृत्यू : : कुटुंबीयांचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; पोलिसांकडून सर्व शक्य दिशांनी तपास
ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या मनोरमानगरमध्ये प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायरिंग; उपचारादरम्यान मृत्यू कुटुंबीयांचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; पोलिसांकडून सर्व शक्य दिशांनी तपास ठाणे/वृत्तसेवा : ठाणे शहरातील मनोरमानगर-मानपाडा परिसरात मंगळवारी रात्री (२९ सप्टेंबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने ठाणे शहराच्या राजकीय वर्तुळासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना घोडबंदर रोडवरील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. कार्यालयासमोरच हल्ला; हल्लेखोर पसार प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मनोरमानगर-मानपाडा, दुर्गा चौक परिसरात पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयाजवळ असताना अज्ञ...