पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"टीईटी पेपरफुटीचे ‘आग्रा कनेक्शन’! छपाई केंद्रातूनच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्या का? तपासाचा फास आवळला". आग्रा प्रेस, वाहतूक साखळी आणि दलालांचे जाळे तपासाच्या रडारवर; दीड कोटींच्या व्यवहाराचा संशय

इमेज
"टीईटी पेपरफुटीचे ‘आग्रा कनेक्शन’!  छपाई केंद्रातूनच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्या का?  तपासाचा फास आवळला". आग्रा प्रेस, वाहतूक साखळी आणि दलालांचे जाळे तपासाच्या रडारवर;  दीड कोटींच्या व्यवहाराचा संशय मुंबई/वृत्तसेवा महाराष्ट्रातील टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पेपरफुटी प्रकरणाने राज्याच्या शिक्षण व्यवस्थेलाच हादरा दिला असून, या घोटाळ्याचे धागेदोरे आता उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छपाई केंद्रापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका आग्रा येथील खासगी प्रेसमध्ये छापण्यात आल्या होत्या. त्यामुळे पेपरफुटीची सुरुवात नेमकी छपाई केंद्रातून झाली का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, परीक्षेच्या काही आठवडे आधी मूळ प्रश्नपत्रिका आग्रा येथील प्रेसमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. तेथे भाषांतर आणि छपाईची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका महाराष्ट्रात पाठविण्यात आल्या. याच टप्प्यात गोपनीयतेचा भंग झाला की महाराष्ट्रात आणताना पेपर बाहेर पडले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटीच्या मूळ प्रश्नपत्रिकांचे संच जप्त करण्...

अधिवेशनात आमदार खरात यांनी वेधले पंकजाताईंचे लक्ष; विषय होता शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याच्या गरजेचा रेटला मुद्दा

इमेज
अधिवेशनात आमदार खरात यांनी वेधले पंकजाताईंचे लक्ष;           विषय होता शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याच्या गरजेचा रेटला मुद्दा ! मेहकर/वृत्तसेवा  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचा प्रश्न प्रभावीपणे मांडत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंढे यांचे लक्ष वेधले. शेतीला पूरक आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन म्हणून दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सभागृहात मांडले. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना खरात यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केवळ शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी दुग्ध व्यवसायासारखे पूरक उद्योग मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने दुधाळ जनावरांचे वाटप करण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यासाठी विशेष दुग्ध विकास धोरण राबवावे. बुलढाणा, वाशीम, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील दूध ...

सीलबंद बंगल्यातील मध्यरात्रीची घुसखोरी; लाचखोर अधिकाऱ्याचे पुरावे गायब करण्याचा कट?

इमेज
सीलबंद बंगल्यातील मध्यरात्रीची घुसखोरी;  लाचखोर अधिकाऱ्याचे पुरावे गायब करण्याचा कट? जळगाव/वृत्तसेवा लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सीलबंद घरात मध्यरात्री झालेली रहस्यमय घुसखोरी आणि त्यानंतर झालेल्या दोन जणांच्या अटकेमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. हा केवळ घरफोडीचा प्रयत्न होता की भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला कट होता, याचा शोध आता पोलीस आणि तपास यंत्रणा घेत आहेत. जळगावचे जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्यावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांचे गणेश कॉलनीतील निवासस्थान सील करण्यात आले होते. मात्र, सीलबंद घराच्या शांततेला मध्यरात्री अचानक तडा गेला. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्तींनी घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून शिडीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला. सीलबंद घरातून येणारे आवाज ऐकून सतर्क झालेल्या शेजाऱ्यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घराच्या आतून प्...

मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान; शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ अनंतात विलीन; मेहुणाराजा गावातील वीरपुत्राला हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप

इमेज
मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान;  शहीद जवान अंकुश महादेव मिसाळ अनंतात विलीन मेहुणाराजा गावातील वीरपुत्राला  हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप                                                                                                          मेहुणाराजा (ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा) :- जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा बजावताना वीरमरण आलेले भारतीय सैन्याच्या ३३ मिडीयम रेजिमेंटमधील हवालदार अंकुश महादेव मिसाळ हे मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत अनंतात विलीन झाले.  सोमवारी (दि. २९ जून) दुपारी सुमारे २ वाजता त्यांच्या मूळ गावी मेहुणाराजा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सैन्य अधिकारी उपस्थित राहून या वीरपुत्राला अश्...

टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी; आंतरराज्यीय रॅकेटचा संशय; एसआयटीमार्फत तपास सुरु; आणखीही काही आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता ..!

इमेज
टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी आंतरराज्यीय रॅकेटचा संशय;  एसआयटीमार्फत तपास सुरु  आणखीही काही आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता ..! भिवंडी/वृत्तसेवा  राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून भिवंडी न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील लाखो टीईटी परीक्षार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सुट्टीच्या न्यायाधीशांसमोर आरोपींना हजर करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी अधिक कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धीरज बलराज सिंग (वय २८, रा. हरियाणा), राजीव साव (वय ४५, रा. बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (वय ३०, रा. बिहार) यांचा समावेश आहे. या तिघांचा पेपरफुटी प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सा...

केंद्रीय मंत्र्यांचा मोठा गैरव्यवहार; पदाचा दुरुपयोग करीत जनतेच्या पैशांची लूट! स्वतःच्याच मंत्रालयातून ९९ लाखांहून अधिक अनुदान लाटले

इमेज
केंद्रीय मंत्र्यांचा मोठा गैरव्यवहार;  पदाचा दुरुपयोग करीत जनतेच्या पैशांची लूट! स्वतःच्याच मंत्रालयातून ९९ लाखांहून अधिक अनुदान लाटले राजस्थान/वृत्तसेवा भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने पदाचा दुरुपयोग करून जनतेच्या कराच्या पैशांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी स्वतःच्या मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ योजनेचा वापर करत ९९ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान लाटले आहे. हा प्रकार इतका स्पष्ट आणि निर्लज्ज आहे की, स्वतः मंत्री भगीरथ चौधरी यांच्याच शेतातील फलकाने त्यांचा भ्रष्टाचार उघड करून टाकला आहे. अजमेर जिल्ह्यातील पीह गावात भगीरथ चौधरी यांची शेती आहे. येथे कृत्रिम तलाव, चार मोठे पॉलीहाऊस आणि काकडी शेतीसाठी भव्य प्रकल्प उभारण्यात आला आहे.  या प्रकल्पावर लावलेल्या फलकावर स्पष्ट उल्लेख आहे – “राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, कृषी मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहाय्याने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.” लाभार्थी म्हणून भगीरथ चौधरी यांचे नाव आणि  ५० टक्के अनुदान म्हणून ९९ लाख ६०...

परदेशातील उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष; महाराष्ट्रातील २५ तरुण म्यानमारमध्ये अडकले, मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

इमेज
परदेशातील उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष;  महाराष्ट्रातील २५ तरुण म्यानमारमध्ये अडकले,  मानवी तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश बीड/वृत्तसेवा   परदेशात लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत महाराष्ट्रातील तरुणांची फसवणूक करून त्यांना थायलंडमार्गे म्यानमारमध्ये नेऊन सायबर गुन्ह्यांमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील सुमारे २५ तरुण मानवी तस्करीचे बळी ठरल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. माहितीनुसार, संबंधित तरुणांना थायलंडमध्ये डेटा एंट्री, ग्राहक सेवा किंवा आयटी क्षेत्रातील आकर्षक नोकऱ्या मिळतील, असे सांगण्यात आले होते. काहींनी या नोकऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून एजंटांच्या माध्यमातून परदेश गाठला. मात्र थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना म्यानमार, थायलंड आणि लाओस यांच्या सीमेवरील कुप्रसिद्ध "गोल्डन ट्रँगल" परिसरात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यावर या तरुणांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यांना सायबर फसवणूक करणाऱ्या केंद्रांमध्ये डांबून ठेवण्यात आले. पीडितांन...

कल्याणमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; महिला वकिलाला अटक, दोन महिलांची सुटका

इमेज
कल्याणमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश;  महिला वकिलाला अटक, दोन महिलांची सुटका कल्याण / वृत्तसेवा ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी कक्षाने (AHTC) कल्याण पूर्व परिसरात कथित देहव्यापार रॅकेटवर कारवाई करत एका महिला वकिलाला अटक केली असून दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी मानवी तस्करी विरोधी पथकाने बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. छाप्यादरम्यान दोन महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एका महिला वकिलाला ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेली महिला कल्याण आणि पनवेल न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत तपशील पोलिसांकडून अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. पोलिस आता या ...

राज्यातील ६ जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा गैरव्यवहार; हजेरीपत्रकातील तफावत, बोगस जॉबकार्ड आणि अतिरिक्त देयकांचा संशय

इमेज
  राज्यातील ६ जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये मनरेगा गैरव्यवहार;  हजेरीपत्रकातील तफावत,  बोगस जॉबकार्ड आणि अतिरिक्त देयकांचा संशय मुंबई/वृत्तसेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) राज्यातील सहा जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींमध्ये गंभीर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हजेरीपत्रकातील तफावत, बोगस व दुबार जॉबकार्ड, कामाच्या दिवसांची फुगवलेली नोंद आणि मजुरांच्या नावावर अतिरिक्त देयके काढल्याचे प्रकार उघड झाल्याने ग्रामीण विकास यंत्रणेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य विधानसभेत आमदार अशोकराव माने आणि संतोष दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी संबंधित माहिती दिली. मार्च २०२६ मध्ये सादर करण्यात आलेल्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) अहवालातही मनरेगा अंमलबजावणीतील अनेक त्रुटी आणि गैरव्यवहारांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अहवालानुसार संभाजीनगर, अमरावती, पालघर, धाराशिव, अहिल्यानगर आणि नागपूर या जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतींच्या कामांची तपासणी करण्यात आली....

मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात? भिवंडीतील ॲमेझॉन गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; परवाना निलंबित, दोघांवर गुन्हा दाखल

इमेज
मुदतबाह्य अन्नपदार्थ पुन्हा बाजारात?  भिवंडीतील ॲमेझॉन गोदामावर एफडीएची मोठी कारवाई;  परवाना निलंबित, दोघांवर गुन्हा दाखल मुंबई/वृत्तसेवा   राज्यात अन्न भेसळ, गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने भिवंडीतील ॲमेझॉन रिटेल इंडियाच्या गोदामावर मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठविल्याचा संशय व्यक्त करत एफडीएने सुमारे दीड टन कालबाह्य आणि खराब झालेला खाद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीएला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिवंडी तालुक्यातील सरवली परिसरातील गोदामातून मुदत संपलेले खाद्यपदार्थ नियमानुसार नष्ट न करता पुन्हा विक्रीसाठी पाठविले जात असल्याचा संशय होता. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २४ जून, बुधवारी मध्यरात्री छापा टाकून तपासणी केली. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य, खराब झालेला आणि मानवी आरोग्यास धोकादायक ठरू शकणारा खाद्...

राज्यात २०२३ मध्ये ६ हजार ६६७ हून अधिक शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्या; पीक विमा कंपन्यांचा ६ हजार ९४४ कोटींचा नफा,

इमेज
राज्यात २०२३ मध्ये ६ हजार ६६७ हून अधिक शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्या;  पीक विमा कंपन्यांचा ६ हजार ९४४ कोटींचा नफा,  सभागृहात गंभीर चर्चा मुंबई/वृत्तसेवा राज्यातील शेती संकट अद्याप कायम असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्र सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३ मध्ये राज्यात तब्बल ६ हजार ६६७ हून अधिक शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. यामध्ये ४ हजार १५० शेतकरी, २ हजार ५१९ शेतमजूर आणि ७७ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मराठवाडा विभागातच २१७ आत्महत्यांची नोंद झाली असून अनेक भूमिहीन शेतमजुरांची प्रकरणे अधिकृत आकडेवारीत समाविष्ट नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवरून विधानसभेत तीव्र चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना सांगितले की, आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना अद्याप राज्य सरकारकडून दिली जाणारी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळालेली नाही. अनेक कुटुंबे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून तांत्रिक कारणे सांगून नुकसानभरप...

महाराष्ट्र टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे स्थगित; लाखो परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संताप

इमेज
  महाराष्ट्र टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे स्थगित;  लाखो परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संताप मुंबई/ठाणे वृत्तसेवा   राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून रविवार, २८ जून २०२६ रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) पेपरफुटीच्या संशयामुळे स्थगित करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिकेशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) आणि शिक्षण विभागाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमधील प्रश्न आणि मूळ टीईटी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न जुळत असल्याचे प्राथमिक पडताळणीत आढळून आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. ही परीक्षा राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. सुमारे ४ लाखांहून अधिक उमेदवार या प...

डिजिटल फसवणुकीच्या बळींना मिळणार २५ हजारांपर्यंत नुकसानभरपाई; RBI चा नवा नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू

इमेज
डिजिटल फसवणुकीच्या बळींना मिळणार २५ हजारांपर्यंत नुकसानभरपाई;  RBI चा नवा नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू नवी दिल्ली / वृत्तसेवा देशभरात ऑनलाइन बँकिंग आणि डिजिटल पेमेंट्सचा वापर वाढत असताना सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डिजिटल फसवणुकीला बळी पडलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा दिलासा देणारा नवीन नुकसानभरपाई आराखडा जाहीर केला आहे. RBI च्या नव्या नियमांनुसार, फसव्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमुळे ₹५० हजारांपर्यंत नुकसान झालेल्या पात्र ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष निव्वळ नुकसानीच्या ८५ टक्के किंवा कमाल ₹२५ हजारांपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे. यापैकी जी रक्कम कमी असेल ती भरपाई म्हणून दिली जाईल. हा नियम मूळतः १ जुलै २०२६ पासून लागू होणार होता. मात्र RBI ने त्याची अंमलबजावणी सहा महिने पुढे ढकलत तो १ जानेवारी २०२७ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम त्या तारखेनंतर झालेल्या डिजिटल बँकिंग व्यवहारांना लागू राहील. कोणाला मिळणार लाभ? फसवणुकीमुळे नुकसान झालेल्या वैयक्तिक ग्राहकांना तसेच एकल मालकी (Sole Propriet...

ग्राहकांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनसाठी कडक नियम लागू

इमेज
ग्राहकांच्या आरोग्यासाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय;  हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लाउड किचनसाठी कडक नियम लागू मुंबई/वृत्तसेवा :  अन्नातील भेसळ, अस्वच्छ स्वयंपाकगृहे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त  यांनी राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, कँटिन, क्लाउड किचन तसेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवांसाठी कठोर अन्न सुरक्षा नियमावली लागू केली आहे. या नियमांचे पालन करणे सर्व संबंधित आस्थापनांना बंधनकारक असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. किचनमध्ये स्वच्छता अनिवार्य नव्या नियमांनुसार स्वयंपाकघरातील भिंती व फरशा वॉटरप्रूफ आणि सहज धुता येतील अशा टाईल्सच्या असाव्यात. किचनमध्ये पुरेशी हवा खेळती राहण्यासाठी एक्झॉस्ट फॅन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच झुरळे, उंदीर, पाली व इतर कीटकांपासून मुक्त वातावरण राखण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल व इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅपची व्यवस्था करावी लागणार आहे. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची साठव...

तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी २५० कोटींची ‘ड्रग्ज लॉबी’ सक्रिय? जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत खळबळजनक दावा

इमेज
  तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी २५० कोटींची ‘ड्रग्ज लॉबी’ सक्रिय? जितेंद्र आव्हाडांचा विधानसभेत खळबळजनक दावा मुंबई | वृत्तसेवा  राज्यात भेसळखोर, गुटखा माफिया आणि बेकायदेशीर औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे आयुक्त हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या कारवाईमुळे अनेक भेसळखोर आणि अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार यांनी विधानसभेत केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभेत बोलताना आव्हाड यांनी आरोप केला की, तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि काही औषध कंपन्यांकडून तब्बल २५० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर या संपूर्ण प्रकरणामागील व्यक्ती आणि हितसंबंधींची नावे पुढील आठवड्यात जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. "मुंढे यांच्या पाठीमागे मोठी लॉबी लागली आहे" सभागृहात बोलताना आव्हाड म्हणाले की, राज्यातील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभी...

एसआयआर मोहिमेत मृत अंगणवाडी सेविकेची नियुक्ती! सिंदखेडराजा तहसीलचा धक्कादायक कारभार उघड; लोकशाही प्रक्रियेची थट्टा?

इमेज
एसआयआर मोहिमेत मृत अंगणवाडी सेविकेची नियुक्ती! सिंदखेडराजा तहसीलचा धक्कादायक कारभार उघड; लोकशाही प्रक्रियेची थट्टा? सिंदखेडराजा:- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेदरम्यान सिंदखेडराजा तहसील प्रशासनाचा एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. मतदार यादी पुनरिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत तहसील कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव थेट मदतनीस म्हणून नियुक्ती आदेशात समाविष्ट करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दि. २४ जून २०२६ रोजी जिजाऊ सृष्टी येथे सिंदखेडराजा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएलओंचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक बीएलओंना प्रशिक्षणातील सूचना व मार्गदर्शन व्यवस्थित ऐकूच आले नाही. तरीही केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी उपस्थितांच्या सह्या घेऊ...

खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी! त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ

इमेज
खासदार संजय दिना पाटील यांची  पत्रकारांना धमकी! त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई / वृत्तसेवा ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या एका कथित वक्तव्यावरून राज्यातील राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार संजय दिना पाटील यांनी यापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार पाटील संतप्त झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाटील यांनी पत्रकारांना उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे तसेच पुन्हा प्रतिक्रिया मागण्यासाठी आल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा आशयाची धमकी दिल्य...

देऊळगावराजा येथे ‘होय होय वारकरी’ ; एक दिवसीय संतविचार परिचय शिबिराचे आयोजन

इमेज
देऊळगावराजा येथे ‘होय होय वारकरी’  एक दिवसीय संतविचार परिचय शिबिराचे आयोजन देऊळगावराजा :  महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेतील विचारांचा परिचय करून देण्यासाठी आणि संतांच्या समतावादी, मानवतावादी संदेशाचा प्रसार करण्यासाठी 'संत विचार प्रसारक मंडळाच्या' वतीने आणि संविधान जागर अभियानाच्या सहयोगाने ‘होय होय वारकरी’ हे एक दिवसीय संतविचार परिचय शिबिर आयोजित करण्यात आले आहे.  हे शिबिर रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत देऊळगावराजा येथील शिवरकर बिल्डिंग, नवीन नगरपालिकेशेजारी येथे संपन्न होणार आहे. या शिबिरासाठी ह.भ.प. भारत महाराज जाधव (मठाधिपती, श्री संत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम (मठ), पंढरपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यापासून ते संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंतची गौरवशाली संतपरंपरा लाभली आहे. या संतांनी समाजात समता, प्रेम, बंधुता, मानवता आणि सामाजिक प्रबोधनाची मूल्ये रुजविण्याचे कार्य केले. “अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नीचा जागीच मृत्यू; मुलगा, मुलगी व चालक गंभीर जखमी; २३ जून, मंगळवार सकाळची घटना

इमेज
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :  पती-पत्नीचा जागीच मृत्यू;  मुलगा, मुलगी व चालक गंभीर जखमी २३ जून, मंगळवार सकाळची घटना  दुसरबीड/वृत्तसेवा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी, मुलगा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार, २३ जून रोजी सकाळच्या सुमारास सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३२६.५ जवळ घडला. प्राथमिक माहितीनुसार, एमएच-२० एचएन-६७६८ क्रमांकाची टोयोटा फॉर्च्यूनर कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी समोर असलेल्या एनएल-०१ एडी-४९८१ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की फॉर्च्यूनर कारचा संपूर्ण पुढील भाग ट्रकच्या मागील बाजूत घुसला. अपघातानंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि प्रवासी आत अडकून पडले. अपघातात डॉ. सय्यद असिफ सय्यद उमर (वय ५२) आणि त्यांच्या पत्नी गुलसितानबी सय्यद असिफ (वय ४५, रा. छत्...

पुण्याजवळील लोहगडावरील ‘अपघात’ निघाला खून; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलल्याचा आरोप, वधू व कथित प्रियकर अटकेत”

इमेज
"चेतन"साठी "सिया"ने "केतन"ला संपविले? पुण्याजवळील लोहगडावरील ‘अपघात’ निघाला खून; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलल्याचा आरोप, वधू व कथित प्रियकर अटकेत” लोहगड किल्ल्यावरचा ‘अपघात’ की थंड डोक्याने रचलेला खून? संपूर्ण घटनाक्रम लोणावळा/पुणे/वृत्तसेवा पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ला येथे घडलेली एक धक्कादायक घटना सुरुवातीला अपघात म्हणून समोर आली होती. मात्र पोलिस तपासात या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून, हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात २६ वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला असून, त्यांची वधू ठरलेली सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.  काय घडले? १८ जून रोजी केतन अग्रवाल हे त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयलसोबत लोहगड किल्ल्यावर गेले होते. सियाचा वाढदिवस जवळ आल्याने हा ट्रेक आणि सहल आयोजित केल्याचे सांगितले जात होते. किल्ल्यावरील एका उंच कड्याजवळ फोटो काढताना केतन यांचा तोल जाऊन ते सुमारे ४०० फूट खोल दरीत पडल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. त्यानंतर बचाव पथकाने त्यांचा म...

भाजप प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम!; "तुतारी कायम हातातच! डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या अफवा"; "मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या कामांसाठीच" – डॉ. राजेंद्र शिंगणे

इमेज
भाजप प्रवेशाच्या अफवांना पूर्णविराम! "तुतारी कायम हातातच! डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या अफवा" "मुख्यमंत्र्यांची भेट ही केवळ जिल्हा बँक व सहकारी संस्थांच्या कामांसाठीच" – डॉ. राजेंद्र शिंगणे बुलढाणा | प्रतिनिधी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवांना स्वतः डॉ. शिंगणे यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोशल मीडियावर सकाळपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर "डॉ. शिंगणे कमळ हाती घेणार", "मुख्यमंत्र्यांशी पक्षप्रवेशाबाबत चर्चा", "भाजपमध्ये जाणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह" अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पैनगंगा सहकारी सूतगिरणी आणि देऊळगावराजा येथील सोयाबीन प्रकल्पाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल ...