पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महसूल कर्मचारी पुन्हा संपाच्या पवित्र्यात! देऊळगावराजा हल्ला प्रकरणातील आरोपींवर कारवाई न झाल्याने सिंदखेडराजा तहसीलचे अधिकारी-कर्मचारी १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजेवर

इमेज
महसूल कर्मचारी पुन्हा संपाच्या पवित्र्यात! देऊळगावराजा हल्ला प्रकरणातील आरोपींवर कारवाई न झाल्याने  सिंदखेडराजा तहसीलचे अधिकारी-कर्मचारी  १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजेवर सिंदखेडराजा/प्रतिनिधी : देऊळगावराजा येथे अवैध गौणखनिज वाहतूक प्रतिबंधक पथकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने महसूल विभागात निर्माण झालेला असंतोष आता सिंदखेडराजापर्यंत पोहोचला आहे. आरोपींवर ठोस आणि कठोर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे तहसील प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. देऊळगावराजा तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी २४ ऑगस्टपासून सामूहिक रजेवर आहेत. या आंदोलनाला सिंदखेडराजा येथील महसूल कर्मचाऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजी पाठिंबा दिला होता. त्यानंतर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार २९ ऑगस्ट रोजी आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामु...

शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो; अमित ठाकरेंचा संताप! मनसे कार्यकर्त्यांनी फोटो उतरवला; ‘महापुरुषांच्या बरोबरीने राजकीय नेत्यांचे फोटो नको’ — महाविद्यालय प्रशासनाला ठणकावले!

इमेज
शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो;  अमित ठाकरेंचा संताप! मनसे कार्यकर्त्यांनी फोटो उतरवला; ‘महापुरुषांच्या बरोबरीने राजकीय नेत्यांचे फोटो नको’  — महाविद्यालय प्रशासनाला ठणकावले! पुणे/वृत्तसेवा : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी प्राचार्यांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या शेजारी लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर तीव्र आक्षेप घेतला. ‘महापुरुषांच्या शेजारी कोणत्याही राजकीय नेत्याचा फोटो नको’, अशी भूमिका घेत अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मोदींचा फोटो तेथून काढण्यास सांगितले. अमित ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देताना विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि मेसमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रारी केल्या. विद्यार्थ्यांनी मेसमधील परिस्थितीचे फोटोही त्यांना दाखवले. कॅन्टीनमध्ये सडलेले कांदे वापरले जात असल्याचे...

किनगाव जट्टू: रस्ता वाचवण्याची तक्रार की रेती व्यवसायाचा बदला? तक्रारदारावरच एफआयआर

इमेज
किनगाव जट्टू: रेती वाहतुकीसाठी रक्कम मागण्याचे प्रकरण  रस्ता वाचवण्याची तक्रार की रेती व्यवसायाचा बदला?  तक्रारदारावरच एफआयआर?? लोणार :-  किनगाव जट्टू ते खापरखेड लाड रस्त्यावर रेती वाहतुकीचा वाद आता थेट एफआयआरपर्यंत पोहोचला आहे. एका बाजूला स्थानिक रहिवासी अमोल प्रभाकर पालकर यांनी सरकारी रस्ता नष्ट होत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली. दुसऱ्या बाजूला रेती कंपनीच्या व्यवस्थापकाने त्यांच्यावरच धमकी आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. दोन्ही बाजूंचे कागदपत्रे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. एफआयआरमध्ये काय आहेत आरोप? ३० ऑगस्ट २०२६ रोजी बीबी पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०२१३/२०२६ दाखल झाला. फिर्यादी दुर्जेश दिलीप अवचार (२५), कळमेश्वर ता. मेहकर येथील, देवी तुळजाई रिअल इस्टेट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. फिर्यादी मध्ये आरोपी म्हणून अमोल प्रभाकर पालकर, रा. किनगाव जट्टू ता. लोणार याचा उल्लेख  आहे. फिर्यादीच्या कथनानुसार, २९ ऑगस्ट दुपारी १२.३० वाजता खापरखेड लाड शिवारातील रेती स्टॉकपॉइंटवरून रॉयल्टी भरलेली रेती नेणारे टिपर एमएच २८ बीबी ९७८९ किनगाव जट्टू रस्...

रेतीचा टिप्पर अडवून सहा लाखांची मागणी केल्याचा आरोप :: ‘पैसे दिल्याशिवाय वाहने जाऊ देणार नाही’; शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

इमेज
रेतीचा टिप्पर अडवून सहा लाखांची मागणी केल्याचा आरोप ‘पैसे दिल्याशिवाय वाहने जाऊ देणार नाही’;  शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार लोणार/वृत्तसेवा : रेती वाहतूक करणारा टिप्पर अडवून त्याच्या मालकाकडून सहा लाख रुपयांची मागणी केल्याचा तसेच पैसे न दिल्यास वाहने पुढे जाऊ देणार नसल्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अमोल प्रभाकर पालकर (रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध विवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरनुसार, दुर्गेश दिलीप अवचार (वय २५) हे एका रिअल इस्टेट कंपनीत मागील तीन वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करतात. संबंधित कंपनीने खापरखेड लाड शिवारातील पूर्णा नदीपात्रातून शासनाच्या नियमानुसार रेतीघाट घेतला असून, तेथून रॉयल्टीच्या पावत्यांसह टिप्परद्वारे रेती वाहतूक केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळपासून खापरखेड लाड शिवारातील रेती स्टॉक पॉइंटवरून रॉयल्टीसह रेतीची वाहतूक सुरू होती. त्यावेळी दुर्गेश अवचार हे रॉयल्टीची पावती देण्याचे काम करीत होते. याचदरम्य...

बनावट कागदपत्रांच्या आधारे ५ कोटींच्या भूखंडाची परस्पर विक्री! ७४ वर्षीय महिलेच्या जागेवर तोतया मालक उभा करून बनावट कुलमुखत्यारपत्र, खोटे खरेदीखत; ठाकरे सेनेच्या युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक

इमेज
बनावट कागदपत्रांच्या आधारे ५ कोटींच्या भूखंडाची परस्पर विक्री!  ७४ वर्षीय महिलेच्या जागेवर तोतया मालक उभा करून बनावट कुलमुखत्यारपत्र, खोटे खरेदीखत;  ठाकरे सेनेच्या युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघांना अटक अकोला/वृत्तसेवा : अकोल्यातील मलकापूर परिसरात मोक्याच्या ठिकाणी असलेल्या तब्बल ५ कोटी रुपये बाजारमूल्याच्या भूखंडाची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या युवा सेनेचा अकोला जिल्हाप्रमुख असल्याचे सांगितले जाणारे आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण, तसेच राहुल अशोकराव जाधव आणि प्रियांका लक्ष्मण पाटील ऊर्फ प्रियांका नागेश चव्हाण या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेली प्रियांका ही आस्तिक चव्हाणची वहिनी असल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे अकोला शहरातील कोट्यवधींच्या मालमत्तांच्या व्यवहारात बनावट ओळख, खोटे दस्तऐवज आणि संगनमताने मालमत्ता हडपण्याचे रॅकेट कार्यरत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. ७४ वर्षीय महिलेच्या मालकीचा कोट्यवधींचा भूखंड मलकापूर...

गटारच नाही, तरी झाकणांचा थाट! सपाट जमिनीवर मॅनहोलची झाकणे बसवून लाखोंच्या कामाचा दावा?; पनवेल महापालिकेतील अजब कारभाराने खळबळ

इमेज
गटारच नाही, तरी झाकणांचा थाट! सपाट जमिनीवर मॅनहोलची झाकणे बसवून लाखोंच्या कामाचा दावा?;  पनवेल महापालिकेतील अजब कारभाराने खळबळ पनवेल/वृत्तसेवा : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत गटाराची वाहिनीच अस्तित्वात नसताना सपाट जमिनीवर मॅनहोलची सिमेंटची झाकणे बसविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तळोजा आणि कामोठे परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांवर गटाराचे प्रत्यक्ष बांधकाम न करता केवळ तयार सिमेंटची झाकणे रस्त्याच्या कडेला ओळीने बसविल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे गटाराच्या नावाखाली कागदोपत्री काम दाखवून पालिकेच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला का?, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, तळोजा परिसरातील काही वसाहती तसेच जोडरस्त्यांवर हा प्रकार निदर्शनास आला. संबंधित ठिकाणी गटारासाठी आवश्यक असलेले खोदकाम, भुयारी वाहिनी किंवा मॅनहोलची रचना दिसून येत नसतानाही तयार सिमेंटची झाकणे मात्र मोठ्या संख्येने बसविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही झाकणे नेमकी को...

लहान कर्जदारांकडून ७४ टक्के, मोठ्या थकबाकीदारांकडून केवळ १४.५ टक्के वसुली! सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आरटीआय उत्तरातून मोठ्या कर्जदारांच्या थकीत कर्जांबाबत गंभीर प्रश्न; मात्र ‘राइट-ऑफ’ म्हणजे कर्जमाफी नसल्याचे स्पष्ट

इमेज
लहान कर्जदारांकडून ७४ टक्के,  मोठ्या थकबाकीदारांकडून केवळ १४.५ टक्के वसुली! सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आरटीआय उत्तरातून मोठ्या कर्जदारांच्या थकीत कर्जांबाबत गंभीर प्रश्न;  मात्र ‘राइट-ऑफ’ म्हणजे कर्जमाफी नसल्याचे स्पष्ट नवी दिल्ली/वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कर्जवसुलीच्या आकडेवारीत मोठ्या आणि लहान कर्जदारांमध्ये लक्षणीय फरक असल्याचे आरटीआयच्या उत्तरातून समोर आले आहे. पुणेस्थित आरटीआय कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जाला बँकेने दिलेल्या उत्तरानुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ ते २०२५-२६ या दहा वर्षांच्या कालावधीत, एक कोटी रुपयांपेक्षा कमी कर्जाच्या खात्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या राइट-ऑफ केलेल्या ६ हजार ७७४.२३ कोटी रुपयांपैकी ५ हजार ००४.२८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. ही वसुली सुमारे ७४ टक्के आहे. याउलट, १०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कर्जाच्या खात्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या राइट-ऑफ केलेल्या २६ हजार ७०१.५५ कोटी रुपयांपैकी केवळ ३ हजार ८७४.४१ कोटी रुपये वसूल झाले. म्हणजेच या वर्गातील वसुलीचे प्...

बैल नेणाऱ्या दलित वाहनचालकाच्या तोंडात शेण कोंबले; बेदम मारहाण, जातीय शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी! ‘गोरक्षक’ असल्याचा दावा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा; अमानुष कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडिताने गाठले पोलिस ठाणे

इमेज
बैल नेणाऱ्या दलित वाहनचालकाच्या तोंडात शेण कोंबले;  बेदम मारहाण, जातीय शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी! ‘गोरक्षक’ असल्याचा दावा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमांखाली गुन्हा;  अमानुष कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडिताने गाठले पोलिस ठाणे जालना/वृत्तसेवा : बैल घेऊन जाणाऱ्या अनुसूचित जातीतील वाहनचालकाला अडवून त्याच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार जालना जिल्ह्यात समोर आला आहे. बैलाची वाहतूक करण्यासाठी वैध कागदपत्रे जवळ असतानाही केवळ संशयाच्या आधारावर वाहन अडवून चालकाला बेदम मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आणि त्याच्या तोंडात जबरदस्तीने शेण कोंबल्याचा गंभीर आरोप पीडिताने केला आहे. एवढेच नव्हे, तर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जालना तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली ...

बुलढाणा जिल्ह्यातील तरुणी छत्रपती संभाजीनगर येथून बेपत्ता! ‘आयएएस अधिकारी बनवायचे’ होते वडिलांचे स्वप्न; स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात पाठवलेल्या लेकीचा दोन वर्षांपासून शोध नाही

इमेज
बुलढाणा जिल्ह्यातील तरुणी छत्रपती संभाजीनगर येथून बेपत्ता! ‘आयएएस अधिकारी बनवायचे’ होते वडिलांचे स्वप्न; स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात पाठवलेल्या लेकीचा दोन वर्षांपासून शोध नाही छत्रपती संभाजीनगर/बुलढाणा/वृत्तसेवा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरातील एका शेतकरी कुटुंबाने मोठ्या स्वप्नांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरला पाठवले. ‘आपली मुलगी आयएएस अधिकारी व्हावी’, हे वडिलांचे स्वप्न होते. मात्र, शहरात शिक्षणासाठी गेलेली ही तरुणी मे २०२४ पासून अचानक बेपत्ता झाली असून, आजवर तिचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, रोहित राजपूत नावाच्या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, संबंधित तरुणी चिखली, जि. बुलढाणा येथील शेतकरी कुटुंबातील असून मार्च २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आली होती. ती क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूतन कॉलनी परिसरातील एका महिला वसतिगृहात राहत होती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. स्वप्न मोठे होते; पण लेकीचा अचानक संपर्क तुटला शेत...

आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेलाच ग्रहण! अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या तक्रारींनी खळबळ; स्वयंपाकगृहातील मदतनीसाला अटक, पूर्वीच्या प्रकरणानंतरही पुन्हा नियुक्ती कशी?

इमेज
आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेलाच ग्रहण! अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या तक्रारींनी खळबळ; स्वयंपाकगृहातील मदतनीसाला अटक, पूर्वीच्या प्रकरणानंतरही पुन्हा नियुक्ती कशी? ठाणे/वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाच्या तक्रारी समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आश्रमशाळेतील स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत झिपरू गवळी याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य केवळ विद्यार्थिनींच्या तक्रारींपुरते मर्यादित नसून, याच कर्मचाऱ्यावर यापूर्वीही अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती, तरी तो पुन्हा आश्रमशाळेच्या वातावरणात कसा पोहोचला? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. निवासी आश्रमशाळेत मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी असताना प्रशासनाकडून पार्श्वभूमी तपासणी झाली होती का, याची चौकशी होण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एका विद्यार्थिनीच्या ध...

पश्चिम बंगालमध्ये एसआयआरनंतरच्या अपीलांमध्ये ९१ टक्के प्रकरणांत मतदार यादीत नावे समाविष्ट; मात्र ३७.२७ लाख अपील अद्याप प्रलंबित आरटीआयमधून धक्कादायक आकडे समोर; ८२ हजार ७८२ निकाली काढलेल्या प्रकरणांपैकी ७५ हजार ४४३ प्रकरणांत समावेशाचा आदेश

इमेज
पश्चिम बंगालमध्ये एसआयआरनंतरच्या अपीलांमध्ये  ९१ टक्के प्रकरणांत मतदार यादीत  नावे समाविष्ट;  मात्र ३७.२७ लाख अपील अद्याप प्रलंबित आरटीआयमधून धक्कादायक आकडे समोर;  ८२ हजार ७८२ निकाली काढलेल्या प्रकरणांपैकी  ७५ हजार ४४३ प्रकरणांत समावेशाचा आदेश नवी दिल्ली/वृत्तसेवा : पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेनंतर दाखल झालेल्या अपीलांबाबत माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आरटीआय उत्तरानुसार, ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत राज्यातील अपीलीय न्यायाधिकरणांकडे एकूण ३८ लाख १० हजार ६२० अपील दाखल झाली होती. त्यापैकी केवळ ८२ हजार ७८२ अपीलांचा निकाल लागला आहे. निकाली काढलेल्या या प्रकरणांपैकी ७५ हजार ४४३ प्रकरणांत मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा आदेश देण्यात आला, तर ७ हजार ३३९ प्रकरणांत नावे वगळण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यामुळे निकाल लागलेल्या अपीलांपैकी सुमारे ९१.१३ टक्के प्रकरणांत नावे समाविष्ट झाली, तर ८.८७ टक्के ...

संघर्षाला न घाबरता ध्येयाचा पाठलाग करा; यश तुमच्या पावलांशी येईल! माजी विद्यार्थ्यांनी उलगडला संघर्षातून यशाकडे जाणारा व्यावसायिक प्रवास; श्री व्यंकटेश महाविद्यालयात 'टॉक शो'मधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

इमेज
संघर्षाला न घाबरता ध्येयाचा पाठलाग करा;  यश तुमच्या पावलांशी येईल! माजी विद्यार्थ्यांनी उलगडला संघर्षातून यशाकडे जाणारा व्यावसायिक प्रवास;  श्री व्यंकटेश महाविद्यालयात 'टॉक शो'मधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन देऊळगावराजा :  अपयशाने खचू नका, परिस्थितीला दोष देऊ नका आणि संधीची वाट पाहत बसू नका; आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करा. संघर्षाच्या वाटेवरूनच यशाचे शिखर गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थ्यांना दिला. स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीमंत राजे राजेंद्रसिंह जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी विकास समिती आणि मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'टॉक शो' अर्थात माजी विद्यार्थी-व्यावसायिकांशी संवाद या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष जीवनातील संघर्ष, अनुभव आणि व्यावसायिक यशाची वाट समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमास श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महावि...

नगरपरिषदेच्या शाळेतील लेकीची परदेशी भरारी! श्रावणी अहिरेची ब्रिस्टल विद्यापीठात एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या मास्टर्ससाठी निवड; विद्यार्थ्यांसाठी ठरली प्रेरणादायी आदर्श

इमेज
नगरपरिषदेच्या शाळेतील लेकीची परदेशी भरारी! श्रावणी अहिरेची ब्रिस्टल विद्यापीठात एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या मास्टर्ससाठी निवड;   विद्यार्थ्यांसाठी ठरली प्रेरणादायी आदर्श देऊळगावराजा : जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर देऊळगाव राजा शहरातील कु. श्रावणी महेश अहिरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेतून आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या श्रावणीने एरोस्पेस इंजिनीअरिंगसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात बी.टेक. पदवी पूर्ण करून आता थेट इंग्लंडमधील प्रतिष्ठित University of Bristol येथे MSc in Aerospace Engineering या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला आहे. तिच्या या यशामुळे देऊळगाव राजा शहराची शैक्षणिक क्षेत्रातील मान उंचावली असून, मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही तिने प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. नगरपरिषदेच्या शाळेपासून परदेशातील विद्यापीठापर्यंत... श्रावणीच्या यशाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात कोणत्याही मोठ्या किंवा महागड्या शैक्षणिक संस्थेतून झालेली नाही. तिने इयत्ता...

ॲड. योगेश जायभाये यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादाला यश; आदिवासी क्षेत्रातील २२० शिक्षण सेवकांना कायम शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा

इमेज
ॲड. योगेश जायभाये यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादाला यश;  आदिवासी क्षेत्रातील २२० शिक्षण सेवकांना कायम शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा देऊळगावराजा :   अनुसूचित क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करून आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनुसूचित क्षेत्रातील पात्र २२० शिक्षण सेवकांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून, तीन वर्षांची समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना प्राथमिक शिक्षकाच्या नियमित पदावर नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयासाठी ॲड. योगेश वि. जायभाये यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सातत्याने केलेले प्रयत्न आणि मांडलेला अभ्यासपूर्ण युक्तिवाद महत्त्वाचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयीन प्रक्रियेसोबतच प्रशासकीय पातळीवर झालेल्या कार्यवाहीमुळे अखेर अनुसूचित क्षेत्रातील पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार नियुक्ती प्रक्रिया मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य,...

लाडकी बहीण योजनेसाठी SC घटकातून पुन्हा ₹३४४.७४ कोटी; निधी वर्ग करण्यावरून वाद :: आदिवासी विकास विभागाचा निधीही यापूर्वी वापरला

इमेज
लाडकी बहीण योजनेसाठी SC घटकातून पुन्हा ₹३४४.७४ कोटी;  निधी वर्ग करण्यावरून वाद आदिवासी विकास विभागाचा निधीही यापूर्वी वापरला मुंबई/वृत्तसेवा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै २०२६च्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती घटकातील तरतुदीतून ₹३४४.७४ कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. यासंदर्भातील शासननिर्णय जारी झाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा वापर होत असल्याने या निर्णयावरून राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. २०२६-२७ मध्ये SC घटकासाठी ₹३ हजार कोटींची तरतूद उपलब्ध शासननिर्णयाच्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांतर्गत ₹३ हजार कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जुलै २०२६च्या आर्थिक लाभासाठी ₹३४४.७४ कोटी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली. हा निधी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिलांच्या लाभासाठी वापरण्याचे निर्देश असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या निर्णयाला सरसकट “SC/STच्या ...