१० ते १२ महिलांना अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप! शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांवर भाजप आमदार श्वेता महाले यांचा गंभीर आरोप : : महिलांच्या तक्रारी, दबावाचे राजकारण आणि पुरावे सादर करण्याचे आव्हान; महाले थेट डीआयजींच्या दरबारात जाणार!
१० ते १२ महिलांना अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप! शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांवर भाजप आमदार श्वेता महाले यांचा गंभीर आरोप महिलांच्या तक्रारी, दबावाचे राजकारण आणि पुरावे सादर करण्याचे आव्हान; महाले थेट डीआयजींच्या दरबारात जाणार! बुलढाणा/वृत्तसेवा राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे पक्ष सत्तेत एकत्र असले, तरी बुलढाणा जिल्ह्यात मात्र या दोन्ही मित्रपक्षांतील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यात सुरू असलेला वाद आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याला महिलांच्या कथित छळाच्या गंभीर प्रकरणाची किनार लाभली आहे. संजय गायकवाड यांच्याशी संबंधित काही व्यक्तींकडून महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांवरून अश्लील संदेश पाठविले जात असल्याचा खळबळजनक आरोप श्वेता महाले यांनी केला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या तब्बल १० ते १२ महिलांनी आपल्याकडे तक्रारी केल्याचा दावा करीत, संबंधित संदेश पाठविणाऱ्यांचे सोशल मीडिया आयडी आणि मोबा...