मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी BLO करणार घरभेटी; नागरिकांनी सहकार्य करावे

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी BLO करणार घरभेटी; 

नागरिकांनी सहकार्य करावे



देऊळगावराजा :-

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देऊळगावराजा तालुक्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR-2026) राबविण्यात येणार असून, या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील सर्व ११५ मतदान केंद्रांवर हा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३० जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळून पाहणार आहेत. तसेच प्रत्येक मतदाराला Enumeration Form वितरित करण्यात येणार असून, तो फॉर्म अचूक माहिती भरून संबंधित BLO यांच्याकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.

या मोहिमेदरम्यान नवीन मतदारांची नोंदणी, मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमधील दुरुस्ती, स्थलांतरित अथवा मृत मतदारांची नावे वगळण्यासाठी आवश्यक अर्ज, तसेच इतर निवडणूकविषयक नमुने भरून घेण्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यास मदत होणार आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीवर आल्यास त्यांना आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून द्यावी. विशेषतः १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेण्याची संधी या मोहिमेद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यमान मतदारांनीही आपल्या नावासह इतर माहितीची खात्री करून घेऊन आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात.

लोकशाही व्यवस्थेचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार म्हणून नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी ही विशेष मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याने देऊळगावराजा तालुक्यातील सर्व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!