पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श : पिंप्री खंदारेच्या अक्षय कांबळे यांची सोळा लाखांच्या शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी भरारी

इमेज
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श :  पिंप्री खंदारेच्या अक्षय कांबळे यांची  सोळा लाखांच्या शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणासाठी भरारी  अक्षय कांबळे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करतांना ग्रामस्थ  सिंदखेडराजा – ग्रामीण भागात राहूनही जिद्द, कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाची प्रबळ इच्छा असेल, तर कोणतेही यश अशक्य नसते, हे पिंप्री खंदारे येथील अक्षय पांडुरंग कांबळे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट्स (IIHS), बेंगळुरू येथे Human Development Policy and Practice या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली असून, त्यांना शिक्षणासाठी तब्बल सोळा लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यांचे हे यश आज ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अक्षय यांनी प्रतिकूल परिस्थितीला कधीही अडथळा मानले नाही. पिंप्री खंदारे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालयात माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर पुणे येथे पदवीचे शिक्षण प...

शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले... तरीही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अनिल जायभाये बनलेत एक्साईज उपनिरीक्षक

इमेज
शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले...  तरीही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर  अनिल जायभाये बनलेत एक्साईज उपनिरीक्षक  अनिल कारभारी जायभाये  सिंदखेडराजा:- काही स्वप्ने अपूर्ण राहतात; मात्र त्याच अपूर्ण स्वप्नांतून नवे ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळते. याच प्रेरणेचे जिवंत उदाहरण म्हणजे तालुक्यातील हनवतखेड येथील अनिल कारभारी जायभाये यांचे आहे. शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिक्षण पूर्ण केलेल्या अनिल यांनी परिस्थितीमुळे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तरीही न डगमगता जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागात एक्साईज पोलीस उपनिरीक्षक (Excise PSI) या मानाच्या पदावर नियुक्ती मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. लहानपणापासून शिक्षक बनून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र काळ आणि परिस्थितीने वेगळा मार्ग दाखवला. अनेकजण अशा प्रसंगी निराश होतात, परंतु अनिल जायभाये यांनी अपयशाला कधीही अंतिम सत्य मानले नाही. त्यांनी त्याच अपूर्ण स्वप्नाला नव्या यशाची प्रेरणा बनवत स्पर्धा ...

देऊळगावराजा शहरात मोकाट जनावरांचा विळखा; संतोष टॉकीज चौकात वाहतूक धोक्यात, प्रशासनाची झोप कधी उडणार?

इमेज
देऊळगावराजा शहरात मोकाट जनावरांचा विळखा;  संतोष टॉकीज चौकात वाहतूक धोक्यात,  प्रशासनाची झोप कधी उडणार? देऊळगावराजा :- देऊळगावराजा शहरातील संतोष टॉकीज चौक परिसरात मोकाट जनावरांचा कळप दिवसभर ठाण मांडून उभा राहत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या समस्येमुळे वाहनचालक, पादचारी आणि परिसरातील दुकानदार त्रस्त झाले असून, संबंधित शासकीय यंत्रणा मात्र अद्यापही केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात शिवारात पेरण्या पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आपल्या पिकांच्या संरक्षणासाठी काटेरी कुंपण उभारतात किंवा मोकाट जनावरांना शेतातून हुसकावून लावतात. परिणामी ही जनावरे शहराकडे धाव घेतात. शहरात आल्यानंतर संतोष टॉकीज चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी समूहाने उभी राहत असल्याने वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या मोकाट जनावरांमुळे परिसरातील दुकानदारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानांसमोर जनावरांचा वावर, रस्त्यावर होणारी घाण, दुर्गंधी आणि ग्राहकांना होणारा मनस्ताप यामुळे व्या...

"पूरग्रस्तांच्या अश्रूंवर वर्षभराचा पडदा; दौरे झाले, आश्वासने झाली... पण विम्याचा एक छदामही नाही!" "आता लोकप्रतिनिधी पीकविम्यावर अवाक्षरही काढत नाहीत; मग ते दौरे मदतीसाठी होते की 'आपत्ती पर्यटन'?" – दीपक कायंदे यांचा उपरोधिक सवाल

इमेज
"पूरग्रस्तांच्या अश्रूंवर वर्षभराचा पडदा;  दौरे झाले, आश्वासने झाली...  पण विम्याचा एक छदामही नाही!" "आता लोकप्रतिनिधी पीकविम्यावर अवाक्षरही काढत नाहीत;  मग ते दौरे मदतीसाठी होते की 'आपत्ती पर्यटन'?"               – दीपक कायंदे यांचा उपरोधिक सवाल सिंदखेडराजा/प्रतिनिधी सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव, जांभोरा व परिसराने वर्षभरापूर्वी निसर्गाच्या भीषण तडाख्याचा सामना केला. ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हजारो एकरांवरील उभी पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली. अनेक जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. घरे, गोठे, शेतातील बांध, विहिरी, रस्ते आणि इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या आपत्तीने शेतकऱ्यांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आयुष्यही विस्कळीत केले. त्या काळात नुकसानग्रस्त भागाला भेट देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची मोठी लगबग दिसून आली होती. सध्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विद्यमान आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री माणिकरावजी ठाकरे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शेतकरी नेते र...

जन्म-मृत्यू दाखल्यांच्या डिजिटायझेशनमधील जाचक अटी रद्द करा; भूतकाळातील कर्मचाऱ्यांच्या त्रुटींची शिक्षा आजच्या नागरिकांना देऊ नका : लोकजागर परिवारचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते यांची मागणी

इमेज
जन्म-मृत्यू दाखल्यांच्या डिजिटायझेशनमधील जाचक अटी रद्द करा भूतकाळातील कर्मचाऱ्यांच्या त्रुटींची शिक्षा आजच्या नागरिकांना देऊ नका : लोकजागर परिवारचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते यांची मागणी सिंदखेडराजा, दि. १७ जुलै : राज्य शासनामार्फत जुने जन्म व मृत्यू दाखल्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी राबविण्यात येत असलेली प्रक्रिया नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असली, तरी त्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेल्या काही जाचक, अव्यवहार्य व नागरिकांना अडचणीत आणणाऱ्या अटींमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा गंभीर मुद्दा लोकजागर परिवारचे मुख्य विश्वस्त प्रवीण गीते यांनी उपस्थित केला आहे. या अटी तात्काळ रद्द करून डिजिटायझेशन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा तसेच मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांना शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अनेक वर्षांपूर्वी ग्रामपंचायत, नगरपालिका, प्रा...

'लाडक्या' योजनेचा खर्च बेभान! तरतुदीपेक्षा तब्बल ३ हजार ५४१ कोटींची उधळपट्टी; कॅगच्या अहवालाने खळबळ

इमेज
'लाडक्या' योजनेचा खर्च बेभान!  तरतुदीपेक्षा तब्बल ३ हजार ५४१ कोटींची उधळपट्टी;  कॅगच्या अहवालाने खळबळ मुंबई | वृत्तसेवा महायुती सरकारच्या गाजलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेवर मंजूर तरतुदीपेक्षा तब्बल ३ हजार ५४१ कोटी रुपये अधिक खर्च झाल्याचा धक्कादायक खुलासा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या ताज्या अहवालातून झाला आहे. विशेष म्हणजे, या अतिरिक्त खर्चाबाबत सरकारकडे ठोस स्पष्टीकरण नसल्याचेही कॅगने नमूद केले आहे. यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनावर आणि निधी व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मात्र, यावेळी कारण लाभार्थी नव्हे, तर योजनेवरील अवाढव्य खर्च आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या ताज्या अहवालानुसार, या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपेक्षा ३ हजार ५४१ कोटी रुपये अधिक खर्च करण्यात आले असून, या अतिरिक्त खर्चाचे समाधानकारक कारण सरकारकडून देण्यात आलेले नाही. महिला व बालविकास विभागाने सुरुवातीला या ...

BLO शिक्षकांमध्ये आदेशांचा गोंधळ; दोन तालुके, दोन भूमिका… निवडणूक यंत्रणा की शिक्षण व्यवस्था? सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात विरोधाभासी आदेश; शिक्षकांमध्ये संताप, निवडणूक आयोगाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

इमेज
BLO शिक्षकांमध्ये आदेशांचा गोंधळ;  दोन तालुके, दोन भूमिका…  निवडणूक यंत्रणा की शिक्षण व्यवस्था? सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यात विरोधाभासी आदेश;  शिक्षकांमध्ये संताप,  निवडणूक आयोगाने तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सिंदखेडराजा/देऊळगावराजा/वृत्तसेवा   विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांमध्ये सध्या प्रचंड संभ्रम, असंतोष आणि मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी पुनरीक्षणाचे अत्यंत महत्त्वाचे आणि वेळबद्ध काम पूर्ण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडून शाळेचे नियमित शैक्षणिक काम पूर्ण करून त्यानंतरच BLO ची जबाबदारी पार पाडण्याचे आदेश दिले जात आहेत. या परस्परविरोधी आदेशांमुळे शिक्षक अक्षरशः कात्रीत सापडले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांनी 26 जून 2026 रोजी काढलेल्या आदेशात BLO व BLO पर्यवेक्षक म्हणून नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना 30 जून ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावध...

देशातील २२ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापक पदे रिक्त; नऊ आयआयटींमध्ये आरक्षित प्रवर्गातील तब्बल ६०% जागा भरायच्या बाकी; जातनिहाय माहिती दिलेल्या संस्थांमध्ये SC, ST व OBC प्रवर्गातील ८८८ पदे रिक्त; गुणवत्तापूर्ण पीएचडी उमेदवारांची कमतरता असल्याचा आयआयटी प्रशासनाचा दावा

इमेज
देशातील २२ आयआयटींमध्ये ३८% प्राध्यापक पदे रिक्त;  नऊ आयआयटींमध्ये आरक्षित प्रवर्गातील तब्बल ६०% जागा भरायच्या बाकी जातनिहाय माहिती दिलेल्या संस्थांमध्ये SC, ST व OBC प्रवर्गातील ८८८ पदे रिक्त;  गुणवत्तापूर्ण पीएचडी उमेदवारांची कमतरता असल्याचा आयआयटी प्रशासनाचा दावा नवी दिल्ली/वृत्तसेवा देशातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) प्राध्यापकांच्या रिक्त पदांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. उपलब्ध अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, देशातील २२ आयआयटींमधील १२,१९८ मंजूर प्राध्यापक पदांपैकी ४,६४० पदे म्हणजेच ३८.०४ टक्के पदे अद्याप रिक्त आहेत. म्हणजेच प्रत्येक दहा पदांपैकी जवळपास चार पदे भरलेली नाहीत.  याहून गंभीर बाब म्हणजे जातनिहाय माहिती उपलब्ध करून देणाऱ्या केवळ नऊ आयआयटींमध्ये एकूण १,५०१ रिक्त पदांपैकी ८८८ पदे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील आहेत. म्हणजेच या संस्थांतील रिक्त पदांपैकी जवळपास ६० टक्के पदे आरक्षित प्रवर्गातील असल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले आहे.  आकडेवारीनुसार, रिक्त पदांमध्ये ओबीसी प्रवर...

१५ वर्षांनंतर न्याय! रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप; २०११ मध्ये पारधी तरुण बेग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

इमेज
१५ वर्षांनंतर न्याय! रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणात ९ पोलिसांना जन्मठेप २०११ मध्ये पारधी तरुण बेग्या पवार यांच्या मृत्यूप्रकरणी  वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल वाशिम, दि. २ (वृत्तसेवा)  वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात २०११ मध्ये घडलेल्या गाजलेल्या पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. २) ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला. तब्बल १५ वर्षे, १ महिना आणि २३ दिवसांच्या न्यायालयीन लढ्यानंतर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी समाजातील बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ९ मे २०११ रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकून बेग्या पवार यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासादरम्यान गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी बेग्या पवार यांना पोलीस ठाण्...

FDA चा संभाजीनगरात मध्यरात्री धडक; नामांकित 'यल्ला यल्ला' व 'आईच्या गावात फेमस टेन' रेस्टॉरंट्स सील; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम; अस्वच्छता, प्रतिबंधित रंगांचा वापर आणि ग्राहकांची फसवणूक उघड

इमेज
FDA ची संभाजीनगरात मध्यरात्री धडक;  नामांकित 'यल्ला यल्ला' व 'आईच्या गावात फेमस टेन' रेस्टॉरंट्स केले सील आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम;  अस्वच्छता, प्रतिबंधित रंगांचा वापर आणि ग्राहकांची फसवणूक उघड छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ३० जूनच्या मध्यरात्रीपासून १ जुलैपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरात राबविलेल्या विशेष धडक मोहिमेत अनेक नामांकित हॉटेल्स व रेस्टॉरंट्समधील अन्न सुरक्षा नियमांच्या गंभीर उल्लंघनाचा पर्दाफाश केला. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत प्रसिद्ध 'यल्ला यल्ला' आणि 'आईच्या गावात फेमस टेन' या रेस्टॉरंट्सना सील करण्यात आले असून त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईपूर्वी FDA ने शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट चालकांची बैठक घेऊन अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. स्वच्छता, दर्जेदार कच्चा माल, अन्न साठवणुकीची योग्य पद्धत, प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर टाळणे आणि ग्राहकांची दिश...

फेसबुकवरील मैत्री पडली महागात; ट्रेडिंगमधून बख्खळ कमाईचे आमिष; नाशिकमध्ये तिघांची ३७.९१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

इमेज
फेसबुकवरील मैत्री पडली महागात;  ट्रेडिंगमधून बख्खळ कमाईचे आमिष  नाशिकमध्ये तिघांची ३७.९१ लाखांची ऑनलाइन फसवणूक नाशिक : सोशल मीडियावरील ओळखीचा गैरफायदा घेत ट्रेडिंग व्यवसायातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत नाशिकमधील एका सेवानिवृत्त व्यक्तीसह तिघांची तब्बल ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त व्यक्तीला जुलै २०२५ मध्ये फेसबुकवर 'अंजली अग्रवाल' नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. संबंधित महिलेने आपल्या प्रोफाइलमध्ये पश्चिम बंगालमधील एका नामांकित कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असल्याचे नमूद केले होते. सुरुवातीला फेसबुकवर साध्या गप्पांमधून ओळख वाढली. त्यानंतर दोघांमधील संवाद व्हॉट्सअॅपवर सुरू झाला. विश्वास संपादन केल्यानंतर महिलेने ऑनलाइन ट्रेडिंगमधून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. तसेच मोठा नफा झाल्याचे कथित स्क्रीनशॉटही पाठवून स...

शिक्षकांना बीएलओ म्हणून पूर्णवेळ कार्यमुक्तीचा आदेश; शिक्षण विभागाने घेतली हरकत, सिंदखेडराजात प्रशासकीय पेच निर्माण मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती की शिक्षणाला प्राधान्य? प्रशासनातील दोन आदेश आमनेसामने

इमेज
शिक्षकांना बीएलओ म्हणून पूर्णवेळ कार्यमुक्तीचा आदेश;  शिक्षण विभागाने घेतली हरकत, सिंदखेडराजात प्रशासकीय पेच निर्माण मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती की शिक्षणाला प्राधान्य?  प्रशासनातील दोन आदेश आमनेसामने सिंदखेडराजा :- विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) व BLO पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ कार्यमुक्त करण्याच्या निवडणूक प्रशासनाच्या आदेशामुळे शिक्षण विभाग आणि निवडणूक प्रशासन यांच्यातील अधिकारक्षेत्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सिंदखेडराजा यांनी २६ जून २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार विधानसभा मतदारसंघातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची BLO व BLO पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना ३० जून ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कार्यमुक्त करून विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशात घरभेटी, मतदार पडताळणी, नवीन मतदार नो...

सिंदखेडराजा येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

इमेज
सिंदखेडराजा येथे विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न सिंदखेडराजा, दि. १ जुलै – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील महाराष्ट्रासह १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. जालना रोडवरील जिजाऊ सृष्टी सभागृहात दुपारी ३ वाजता झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने हा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक तसेच विविध विभागांच्या यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. बैठकीत प्रा. संजय खडसे यांनी सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षकांना कामकाजाचा वेग वाढविण्यासह पारदर्श...

एनसीईआरटीच्या नववीच्या समाजशास्त्र पुस्तकावरून वाद; प्रस्तावना, धर्मनिरपेक्षता आणि मनुस्मृतीच्या उल्लेखावर चर्चा

इमेज
एनसीईआरटीच्या नववीच्या समाजशास्त्र पुस्तकावरून वाद;  प्रस्तावना, धर्मनिरपेक्षता आणि मनुस्मृतीच्या उल्लेखावर चर्चा नवी दिल्ली | वृत्तसेवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या एनसीईआरटीच्या इयत्ता नववीच्या नव्या समाजशास्त्र पाठ्यपुस्तकावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. नव्या पुस्तकात भारतीय संविधानाची प्रस्तावना (Preamble), "धर्मनिरपेक्ष" आणि "समाजवादी" या संज्ञांचा पूर्वीप्रमाणे स्वतंत्र उल्लेख नसल्याने विरोधी पक्ष, सामाजिक संघटना आणि शिक्षणतज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.  नव्या पुस्तकात संविधान, लोकशाही संस्था, निवडणूक आयोग आणि १९७५-७७ च्या आणीबाणीवरील स्वतंत्र विभागाचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर भारतीय लोकशाही संस्थांच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे.  वाद निर्माण झाल्यानंतर एनसीईआरटीने स्पष्टीकरण देत म्हटले की संविधानाची प्रस्तावना अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेली नाही. नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार (NCF) विषयांचे पुनर्वितरण करण्यात आले असून प्रस्तावना आणि संबंधित संकल्पनांचे सविस्तर अध्ययन पुढील इयत्तां...

संभाजीनगर हादरले; नापास केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला

इमेज
संभाजीनगर हादरले; नापास केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकावर चाकू हल्ला संभाजीनगर | प्रतिनिधी संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील एका शाळेत नववीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकावर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला अटक करून बालगृहात दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी नववीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा शाळेत प्रवेश घेतला नव्हता. मंगळवारी दुपारी तो शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) घेण्यासाठी शाळेत आला होता. यावेळी मुख्याध्यापकांनी त्याला आवश्यक अर्ज भरून देण्यास तसेच शाळेची थकबाकी जमा करण्यास सांगितले. मात्र, विद्यार्थ्याने अर्ज भरण्यास नकार दिला. अर्जाशिवाय दाखला देता येणार नसल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केल्यानंतर त्याने आपल्या वर्गशिक्षकांना कार्यालयात बोलावण्याची मागणी केली. मुख्याध्यापकांच्या दालनात चर्चा सुरू असताना विद्यार्थ...

"९६ मानधन शिक्षकांना न्यायालयाचा दिलासा; ॲड. योगेश जायभाये यांच्या युक्तिवादामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाला स्टे!"

इमेज
"९६ मानधन शिक्षकांना न्यायालयाचा दिलासा;  ॲड. योगेश जायभाये यांच्या युक्तिवादामुळे शिक्षण विभागाच्या आदेशाला स्टे!" नंदुरबार | वृत्तसेवा  नंदुरबार जिल्ह्यात मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या ९६ शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधित प्रकरणात न्यायालयाने अंतरिम स्थगिती (स्टे) आदेश दिल्याने शिक्षकांच्या सेवेसमोरील तातडीचा धोका टळला आहे. पवित्र पोर्टलमार्फत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्यासाठी दोन गट तयार करण्यात आले होते. यातील पहिल्या गटातील अनेक शिक्षक शिक्षण सेवक म्हणून नियुक्त होऊन इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. तर नंदुरबार जिल्ह्यात मानधन तत्त्वावर कार्यरत असलेले ९६ शिक्षक अनेक वर्षांपासून दुर्गम व अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. दरम्यान, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी बाहेरील जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना नंदुरबार जिल्ह्यात प्राधान्य देण्याबाबत आदेश जारी केला होता. मात्र जिल्ह्यातील उपलब्ध जागा मर्यादित असल्याने या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून से...