पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विधानपरिषदेची संधी हुकली; सिंदखेडराजात राजकीय तापमान चढले, इच्छुकाच्या आमदारकीच्या स्वप्नांना तात्पुरता ब्रेक

इमेज
  विधानपरिषदेची संधी हुकली;  सिंदखेडराजात राजकीय तापमान चढले,  इच्छुकाच्या आमदारकीच्या स्वप्नांना तात्पुरता ब्रेक सिंदखेडराजा : प्रतिनिधी सिंदखेडराजा तालुक्यातील राजकीय पटावर सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. विधानपरिषदेच्या निवडीच्या शर्यतीत आघाडीवर मानल्या जाणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी इच्छुक नेत्याच्या हातातून अखेरच्या क्षणी संधी निसटल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदारकीची स्वप्ने डोळ्यांत साठवून मोठ्या ताकदीने तयारी करणाऱ्या या नेत्याला अंतिम टप्प्यात डावलण्यात आल्याने समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या इच्छुकाने पक्षांतर्गत तसेच वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठका, गावागावांत संपर्क मोहिमा आणि राजकीय हालचालींना दिलेला वेग पाहता त्यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. अनेकांनी तर त्यांच्या निवडीची खात्री गृहीत धरून पुढील राजकीय समीकरणांची आखणीही सुरू केली होती. मात्र अंतिम यादी जाहीर होताच चित्र पालटले आणि त्यांच्या नावाचा अभाव स्पष...

धार्मिक विद्वेषाची बीजे राजकीय लाभासाठीच – सत्यपाल महाराज

इमेज
  धार्मिक विद्वेषाची बीजे राजकीय लाभासाठीच – सत्यपाल महाराज महिलांनी स्वतःला डोळस बनवल्यास समाजातील अंधश्रद्धा अक्षरश: कोसो दूर जाईल सिंदखेडराजा:- स्वतःचे व कुटुंबाचे भले होईल ह्या आशेतून महिला श्रद्धेतून अंधश्रद्धा व बुवाबाजीच्या फासांत अडकतात व त्याचे वाईट परिणाम समाजात दिसून येतात. त्याचेच उघड उदाहरण नाशिकच्या खरात प्रकरणात उमटून पडले आहे. त्यामुळे स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सक्षम मेंदूला विचारावीत. त्यासाठी वैचारिक बाजू कणखर ठेवावी लागते व ती शिक्षण तसेच वाचनातून येत असल्याचे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक किर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले. तालुक्यातील साखरखेर्डा येथील महाकालेश्वर मंदिर परिसरात ७ एप्रिल मंगळवारी आयोजित महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधनपर कीर्तनात सत्यपाल महाराज बोलत होते.  आपल्या किर्तनात त्यांनी महिलांनी ढोंगी बाबा आणि बुवाबाजीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. नव्हेतर मुलं होण्यासाठी, वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी किंवा संपत्ती मिळवण्यासाठी कोणत्याही बाबाकडे जाणे ही चुकीची मानसिकता असल्या...

डॉ. विशाल इंगोले हे संवेदनशील तसेच धारिष्ट्यवान विचारांचे कवी होते - साहित्यिक बाबाराव मुसळे

इमेज
डॉ. विशाल इंगोले हे संवेदनशील तसेच धारिष्ट्यवान विचारांचे कवी होते - साहित्यिक बाबाराव मुसळे सिंदखेडराजा:- स्व. डॉ. विशाल इंगोले यांच्या कविता वाचली म्हणजे विद्रोहाच्या स्फोटातून क्रांती पेटवणारी मशाल ठरावी, एवढी धारिष्ट्याची ती कविता होती असे वक्तव्य प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बाबाराव मुसळे, वाशिम यांनी केले. तालुक्यातील दुसरबीडच्या नगरमाळ येथील सावित्रीबाई मंगल कार्यालयात आज दि. ५ एप्रिल, रविवारी आयोजित स्मृतीशेष कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिकाजी तळेकर, खैरव हे तर प्रसिद्ध चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार, पेण व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.  कार्यक्रमात सर्वप्रथम प्रसिद्ध युवा कवी तान्हाजी बोऱ्हाडे, मु. कानसे, पो. शिनोली, ता. आंबेगाव, जि. पुणे यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना बाबाराव मुसळे यांनी कवितेच्या निर्मिती व प्रकाशनाची प्रक्रिया कथन केली. आपल्या ह्या अभ्यासातून तान्हाजी बोऱ्हा...

पोलीस पाटलांनी गावांतील शांततेला प्राधान्य द्यावे - गणेश डोईफोडे :: कार्यकारिणी अध्यक्षपदी दिगंबर पाटील तर सचिवपदी तुषार चव्हाण

इमेज
  पोलीस पाटलांनी गावांतील शांततेला प्राधान्य द्यावे - गणेश डोईफोडे  (अध्यक्ष व सचिवांचा सत्कार करताना दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे) कार्यकारिणी अध्यक्षपदी दिगंबर पाटील तर सचिवपदी तुषार चव्हाण   सिंदखेडराजा:- पोलीस पाटलांनी गावांतील घडामोडींचा अगदी बारकाईने अभ्यास करीत त्यातील शांतता व सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या घटनांबाबत पोलिसांना सचेत करीत राहावे, असे आवाहन दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे यांनी केले आहे. दि. २ मार्च, गुरुवारी पोलीस स्टेशन साखरखेर्डा अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांच्या बैठकीत डोईफोडे हे बोलत होते.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड तर गणेश डोईफोडे हे प्रमुख उपस्थित होते.  या बैठकीत पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांच्या कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये डिगांबर पुंडलिक अंभोरे, गजरखेड ‌यांची अध्यक्षपदी तर तुषार उत्तमराव चव्हाण, हनवतखेड यांची सचिवपदी, राजू आत्माराम खरात, रान‌अंत्री यांची उपाध्यक्षपदी तर कोषाध्यक्ष म्हणून प्रताप रतिराम लंबे यांची निवड करण्यात आली आहे.  यावेळी कार्यकारिणी पदाधिकारी निवडण्यासाठी सूच...