देऊळगावराजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ जून रोजी
देऊळगावराजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ११ जून रोजी
![]() |
| तहसीलदार वैशाली डोंगरजाळ |
देऊळगावराजा:- तालुक्यातील मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या देऊळगावराजा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदी तसेच सन २०११ च्या जनगणनेनुसार राबविण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच संबंधित महिला आरक्षण यांचा समावेश असलेले प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
ही सोडत ११ जून २०२६ (गुरुवार) रोजी ग्रामपंचायतीतील अध्यासी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून संबंधित इच्छुक नागरिक, संभाव्य उमेदवार आणि ग्रामस्थांनी या प्रक्रियेस उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
ज्या ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यामध्ये देऊळगाव मही, डोड्रा, अंढेरा, शिवणी आरमाळ, बायगाव, मेंडगाव, पिंप्री आंधळे, टाकरखेड वायाळ, निमगाव गुरु, नागणगाव, पाडळी शिंदे, सावरखेड नागरे, खल्याळ गव्हाण, मंडपगाव, मेहुणाराजा, सावखेड भोई, गिरोली खुर्द, पांगरी, जवळखेड, उंबरखेड, आळंद, पिंपळगाव बु., चिचोली बुरकुल, पळसखेड झाल्टा, बोरखेडी बावरा व तुळजापूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. देऊळगावराजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी संबंधितांनी आरक्षण सोडत प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहून माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केले आहे.


टिप्पण्या