पुण्यात शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या - कात्रजमधील धक्कादायक घटना डॉक्टरांच्या आत्महत्येची पुण्यातील ही तिसरी घटना

पुण्यात शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या 
- कात्रजमधील धक्कादायक घटना

डॉक्टरांच्या आत्महत्येची पुण्यातील ही तिसरी घटना

पुणे/वृत्तसेवा 

पुण्यातील कात्रज परिसरात एका २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना काल, ९ सप्टेंबर २०२६ रोजी घडली आहे.  
मृत तरुणीचे नाव आदी माया शेखर रेड्डी (वय २१ वर्ष) असे असून, ती मूळची हैदराबाद, तिरूमलंगरी, तेलंगणा येथील रहिवासी होती. ती पुण्यातील भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.  

ती तिचा भाऊ डॉ. आदी अदीम शेखर रेड्डी यांच्यासोबत कात्रज येथील नॅन्सी लेक होम सोसायटी, फ्लॅट क्र. १००२, जे विंग येथे राहत होती.  

कात्रज पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, माया हिने सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव, पोलीस हवालदार कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ती गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत आढळली.  

तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

घटनेच्या वेळी तिचा भाऊ घटनास्थळी उपस्थित होता. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सध्या तिची एमबीबीएसची परीक्षा सुरू असल्याने ती प्रचंड तणावाखाली होती. या परीक्षेच्या तणावातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज तिच्या भावाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचेही त्यांनी सांगितले.  

पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक रवी जाधव पुढील तपास करत आहेत.  

या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  
ही पुण्यातील गेल्या काही महिन्यांतील दुसरी-तिसरी अशी घटना आहे. यापूर्वी ससूनच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील २३ वर्षीय डॉक्टर तरुणी ज्योती कृष्णकुमार मीना हिने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तसेच बिबवेवाडी येथे २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने फसवणुकीमुळे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली