सिंदखेडराजा मतदारसंघातील SIR अभियानाचे काम १०० टक्के पूर्ण! ३ लाख २१ हजार ७३० मतदारांची पडताळणी; २ लाख ९१ हजार २५५ EF फॉर्मचे डिजिटायझेशन
सिंदखेडराजा मतदारसंघातील SIR अभियानाचे काम १०० टक्के पूर्ण!
३ लाख २१ हजार ७३० मतदारांची पडताळणी;
२ लाख ९१ हजार २५५ EF फॉर्मचे डिजिटायझेशन
सिंदखेडराजा, दि. १८ ऑगस्ट २०२६ :
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) २४-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील मतदार पडताळणीचे काम १७ ऑगस्टपर्यंत १०० टक्के पूर्ण झाले आहे. या अभियानांतर्गत मतदारांकडून EF फॉर्म घेणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि माहिती संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्याचे काम पूर्ण करण्यात आले.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २१ हजार ७३० मतदार आहेत. सर्व मतदारांना EF फॉर्मचे १०० टक्के वितरण करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ९१ हजार २५५ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, हे प्रमाण ९०.५३ टक्के आहे.
उर्वरित ३० हजार ४७५ मतदारांचे फॉर्म विविध कारणांमुळे पूर्ण स्वरूपात प्राप्त होऊ शकले नाहीत. यामध्ये ८ हजार ७८६ मृत मतदार, १३ हजार ६६५ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, २ हजार २६ ट्रेस न लागलेले मतदार, ५ हजार ९५५ दुबार मतदार आणि ४३ इतर कारणांतील मतदारांचा समावेश आहे. या सर्व बाबींची आवश्यक पडताळणी करून नोंद करण्यात आली आहे.
हे अभियान मतदारसंघातील ३४० मतदान केंद्रांवर ३४० BLO, ७० पर्यवेक्षक, ३५ झोनल ऑफिसर आणि २४ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून माहिती संकलित केली आणि ती संगणकीय प्रणालीवर अपलोड केली.
या अभियानाचे काम प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सिंदखेडराजा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.
अभियानासाठी तहसीलदार अजित दिवटे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, गटविकास अधिकारी सिंदखेडराजा अजित बांगर, गटविकास अधिकारी देऊळगावराजा मुकेश मोहर, गटविकास अधिकारी चिखली समाधान वाघ, गटविकास अधिकारी लोणार उमेश देशमुख, मुख्याधिकारी सिंदखेडराजा आशीष बोबडे, मुख्याधिकारी देऊळगाव राजा अरुण मोकळ, गटशिक्षण अधिकारी सिंदखेडराजा स्वप्निल निकम, गटशिक्षणाधिकारी देऊळगाव राजा श्रीकृष्ण सपकाळ, तालुका निरीक्षक भूमिअभिलेख सिंदखेड राजा रचना जाधव, तालुका निरीक्षक भूमिअभिलेख देऊळगावराजा काशिनाथ भोईर, नायब तहसीलदार सिंदखेडराजा संदीप बंगाळे, नायब तहसीलदार सिंदखेडराजा प्रवीण वराडे, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव आणि नायब तहसीलदार संतोष मुंडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
कार्यालयीन कामकाजात प्रशांत वाघ, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय देऊळगावराजा; नागेश खरात, सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय सिंदखेड राजा; गणेश देशमुख, संगणक ऑपरेटर, तहसील कार्यालय सिंदखेड राजा आणि अमोल जाधव, संगणक ऑपरेटर, तहसील कार्यालय देऊळगाव राजा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
SIR अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकारी, पर्यवेक्षक, BLO, BLO सहाय्यक, संगणक कर्मचारी तसेच संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे BLA, पत्रकार आणि मतदारांचे सहकार्य मिळाल्यामुळे हे अभियान पूर्ण करता आले. या सर्वांचे प्रशासनाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

टिप्पण्या