पोस्ट्स

बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे?

इमेज
बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे? मग बघून घ्या ... अमरावती विभागातील कोणता जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा निकाल व क्रमांक कितवा आहे ....! सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका निहाय निकाल पुढीलप्रमाणे .. निकालामध्ये देऊळगावराजा तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार २७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार  २६२ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १६८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५५७ प्रथम श्रेणीत, ४११ द्वितीय श्रेणीत, ८६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९६.८३ एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चिखली तालुका असून, परीक्षेसाठी एकूण ४ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार  १५० विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ८१६ प्रथम श्रेणीत, १ हजार १२० द्वितीय श्रेणीत, १६६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३ हजार ९९४ विद्यार्थी उत्...

बारावी परीक्षेत सिंदखेडराजा तालुका ९५ टक्के पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के उत्तीर्ण

इमेज
सिंदखेडराजा तालुका : बारावीचा निकाल ९५ टक्के पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के उत्तीर्ण तर विज्ञान विषयांत पाच कनिष्ठ महाविद्यालये १०० टक्के सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालात तालुक्यात असलेल्या एकूण ३० कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल एकूण ९५.०७ टक्के एवढा लागला आहे. यामध्ये संजय गांधी, धांदरवाडी, अटलबिहारी वाजपेयी, राहेरी, जान्हवी, दुसरबीड, आदर्श, सिंदखेडराजा व उत्कर्ष, सिंदखेडराजा ह्या पाच कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान, कला, वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण ३ हजार ८६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३ हजार ६४ विद्यार्थ्यी परीक्षेला सामोरे गेले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार यापैकी एकूण २९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये १६५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, १३२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २१४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. जिजामाता क. म. वि.  सिंदखेडराजा, ३०६ पैकी ३०२ विद...

एसटी बस अक्षरशः अर्धी चिरली अपघातात ६ ठार तर १६ गंभीर

इमेज
  कंटेनर व एसटी बसची समोरासमोर धडक एसटी बस अक्षरशः अर्धी चिरली अपघातात ६ ठार तर १६ गंभीर   विशेष प्रतिनिधी सिंदखेडराजा:- तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ सी वर दुसरबीड ते सिंदखेडराजा दरम्यान आज दि. २३ मे, मंगळवारी सकाळी ६.०० वा. च्या सुमारास पळसखेड चक्का फाट्याजवळ कंटेनर व बस ही दोन वाहने एकमेकांना समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला. या घटनेत कंटेनरने बसच्या चालकाची बाजू अर्ध्या भागापर्यंत अक्षरशः चिरत नेली होती. या घटनेची माहिती मिळताच  किनगावराजा ठाणेदार युवराज रबडे व त्यांचे सहकारी कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी व उपस्थित पळसखेड ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरु करीत, सर्व अपघात बधितांना सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  त्यावेळी ६ व्यक्ती मृत झाल्या होत्या. त्यात ३ महिला व ३ पुरुष, ज्यामध्ये दोन्हीही चालकांचा समावेश होता. तर १६ व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत होत्या. गंभीर व्यक्तींना पुढील उपचारासाठी तातडीने जालना येथे हलविण्यात आले. तर किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले. दुर्घटनेतील बस मेहकर आगारा...

वीज पडून १६ बकऱ्या जागीच ठार, रताळी येथील घटना

इमेज
सिंदखेडराजा तालुक्यात सकाळीच अवकाळी पाऊस वीज पडून १६ बकऱ्या जागीच ठार रताळी येथील घटना सिंदखेडराजा:-  सिंदखेडराजा:- तालुक्यातील काही भागात आज दि. ३० एप्रिल, रविवारी सकाळी वीजांच्या कडकडाटात तासभर अवकाळी पाऊस झाला.  त्यामध्ये साखरखेर्डा नजीकच्या रताळी येथे  सकाळी ९.०० वा. सुमारास वीज पडून भिकाजी सखाराम जाधव ह्यांच्या मालकीच्या १६ बकऱ्या जागीच मरण पावलेल्या आहेत. सकाळी बकऱ्या सोडून शशिकला तेजराव आव्हाळे व शेतमालक भिकाजी सखाराम जाधव हे दोघेही शेतात बकऱ्या चारत होते. त्याचवेळी बाजूच्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली. ह्यावेळी १६ बकऱ्या ठार झाल्या मात्र शेत मालक व महिलेने ट्रॅक्टर ट्रॉली खाली आश्रय घेतला होता. त्यामुळे सुदैवाने ते दोघे बचावले. घटनेचा पंचनामा करण्यासाठी महसूलचे तलाठी शेळके व पोलीस विभागाचे कर्मचारी तातडीने पोहोचले असल्याची माहिती सरपंच सौ. उषा समाधान पाटील यांनी दिली आहे.

अभिनंदन ..! प्रवीण, माझंही मन तुझ्यासारखंच अगदी मोठ्ठं व्हावं ..

इमेज
  अभिनंदन ..! प्रवीण, माझंही मन तुझ्यासारखंच  अगदी मोठ्ठं व्हावं .. खरं तर प्रवीणला खूप लहानपणापासून ओळखतो. तो किनगावराजाचा भाचा पण आमच्या बाबुराव सरांचा (इथं बोलीभाषेतील शब्दांत बाबुराव मास्तर लिहायचे होते.) मुलगा .. मधल्या काळातील काही बाबीपण लिहीत नाही. त्यामुळे आम्हा दोघांनाही पारिवारिक संबंधात त्रास होतो. नातेवाईक संबंध खूप दाट, पण मी स्वतः त्यापलीकडे जाऊन, माणुसकीचा धर्म निभावणारा. अगदी ११ किंवा १२ वीत वैद्यकीय शाखेत (एमबीबीएस) जाण्याची योग्यता असतांनाच, स्व. सुरेश सोनुने ह्यांनी माझ्या वडिलांना आग्रह करीत मला राजकारणात आणले. त्यावेळी मी माझे दाजी स्व. भास्करराव डोईफोडे ह्यांचे दुकान संभाळायचो. तीन चार वर्षानंतर माझे पदवीचे वय असेल. स्वतःसाठी तसेच समाजासाठी काहीतरी करावे ही उर्मी मनात होती. पण दरम्यानच्या काळात डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांनी स्वतः काही बाबींची पूर्तता करीत व त्यानुसार शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर, मला साखरखेर्डा येथील शाळेत नियुक्ती दिली. देऊळगावराजा येथून साखरखेर्डा येथे आलो. स्व. सुरेशभाऊंच्या वैचारिक भूमिकेतून आपण स्वतः काहीतरी चळवळ उभारावी, ह्यासाठी प...

गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती रुग्णवाहिका सेवा व डॉक्टरांच्या कसबाचे होत आहे कौतुक ..!

इमेज
  गर्भवती महिलेची १०८ रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती रुग्णवाहिका सेवा व डॉक्टरांच्या कसबाचे होत आहे कौतुक ..! सिंदखेडराजा:- नायगाव बु. येथील एका गर्भवती विवाहितेला १०८ रुग्णवाहिकेतून बाळंतपणासाठी चिखली येथे नेण्यात येत होते. अवघडलेली स्थिती असतांनाच प्रवासादरम्यान तिला मध्येच कळा येण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यावेळी रुग्णवाहिकेत कर्तव्यावर असणाऱ्या डॉ. गणेश शिवराज रंगदळ यांनी त्या गंभीर परिस्थितीत आपल्या वैद्यकीय कौशल्याचे कसब पणाला लावत बाळंतपण करीत अवघडल्या स्थितीतून विवाहित युवतीची सुटका केली. आज दि.२० एप्रिल, गुरुवारी झालेल्या ह्या प्रसंगामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय अधिकारी यांचे कौतुक होत आहे. १०८ रुग्णवाहिकेच्या वाहनचालक व डॉक्टरांना एक कॉल आला. त्याचक्षणी अवघडलेली गर्भवती हे लक्षात घेत, साखरखेर्डा येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर आणि चालकाने लगबगीने प्रवासाला सुरुवात केली. नायगाव बु. ता. मेहकर येथील दिवस भरत आलेली गर्भवती विवाहिता शिवकन्या खरात हीला व तिच्या सोबत आणखी दोन महिलांना सोबत घेत, शिवकन्या हिच्या बाळंतपणासाठी १०८ रुग्णवाहिकेतून नायगाव बु. येथून चिखली नेण्यासा...

साखरखेर्ड्यात नागरिकांना कुणीही वाली नाही. आलिया भोगाशी असावे सादर ..

साखरखेर्ड्यात नागरिकांना कुणीही वाली नाही.  आलिया भोगाशी असावे सादर .. वीज मंडळ ते कंपनी प्रवासात हाती दैवदुर्विलासच .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील वीज कंपनीतील जबाबदार यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे परिसरातील ग्राहक नागरिकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व आहे, ते सुद्धा मला काय त्याचे? ह्या भूमिकेत दिसून येत आहेत. वीज मंडळ ते वीज कंपनी ह्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रवासात साखरखेर्डा येथील संबंधित कार्यालय व त्यांची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे द्योतक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा कधीही सुरळीत असल्याचे दिसून आले नाही. वेळोवेळी नव्हेतर तासातासाला उद्भवणारा बिघाड हा पाचवीलाच पुजलेला आहे की काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे.  वीज मंडळ ते कंपनी ह्या अनेक वर्षांच्या प्रवासात वीज पुरवठा करण्यासाठी परिसरात असलेल्या सुविधेतील खांब, तारा आदि एकूण एक साहित्य तसेच आहे. त्यात जुजबी बदल केल्या जातात. हे बदल ज्यांना आवश्यक वाटतात त्यांच्याकडून मलिदाही खाल्ल्या जातो. नव्हेतर आम्ही आपल्यावर उपकार केलेत हा भावही यंत...

बोगसपणा मेंदूत घुसवल्या जातोय .. वाचकांनो सावध व्हा ..! काम कुणाचे? पुरस्कार कुणाला?? यंत्रणेने भावनिक न होता, ज्याचा न्याय त्याला ही भूमिका घेण्याची गरज ..!

इमेज
बोगसपणा मेंदूत घुसवल्या जातोय .. वाचकांनो सावध व्हा ..! काम कुणाचे?  पुरस्कार कुणाला?? यंत्रणेने भावनिक न होता, ज्याचा न्याय त्याला ही भूमिका घेण्याची गरज ..! (एका पुरस्काराचे छायाचित्र) सिंदखेडराजा:- इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असतांनाच दि. ३ मार्च रोजी, झी २४ तास ह्या वृत्तवाहिनीवर गणिताचा पेपर फुटल्याची बातमी आली. एवढेच नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी ह्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यातून संपूर्ण राज्यभरात कल्लोळ उठला. यंत्रणेतील एका विभागाने हे प्रकरण झाल्याचे दाखल करण्यासंदर्भात नाकारले, त्याच व्यक्तीला सन्मानित केले जावे, हा दैवदुर्विलास आज बघावयास मिळाला. त्यामुळे घाईघाईने श्रेय कुणाच्यातरी नावे करणाऱ्या वरिष्ठांनाही अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. इयत्ता दहावी तसेच बारावी परीक्षा सुरु झाल्यापासून सोशल मीडियाचा वापर करीत पेपर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन, झी २४ तासच्या प्रतिनिधीने त्या प्रकरणावर आपले लक्ष कायम केले. इयत्ता १२ वी च्या पेपरफुटीमध्ये त्यांना यशही लाभले. नव्हेतर बातमी वाऱ्यावर न जाता त्यातील ...

हॅट्स ऑफ .. राहुल द्रविड ..

इमेज
  एक फेसबुक पोस्ट वाचली, ती जशीच्या तशी इथं देत आहे. हॅट्स ऑफ .. राहुल द्रविड .. (यामध्ये हेडिंगचे १० अन शेवटचे २९ शब्द माझे आहेत.) क्रिकेटपटू राहुल द्रविडला बंगळुरू विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, जो सन्मान राहुल द्रविडने कृतज्ञतापूर्वक परत केला. पदवी तर परत दिलीच, पण अप्रतिम भाषणही केले; तो म्हणाला, "माझी पत्नी डॉक्टर आहे, तिने ही पदवी मिळवण्यासाठी अगणित कष्ट व निद्रानाश सहन करीत रात्र आणि दिवस घालवले आहेत." "माझी आई कला शाखेची प्राध्यापिका आहे, तिने पदवीसाठी चिकाटीने पन्नास वर्षे वाट पाहिली. मी क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत केली, पण माझा इतका अभ्यास झाला नाही, मग मी ही पदवी कशी स्वीकारू?"   १९५२ मध्ये इस्रायली सरकारने आईन्स्टाईन यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती.आईनस्टाईन नम्रपणे म्हणाले, “मी भौतिकशास्त्राचा अननुभवी विद्यार्थी आहे. मला राज्याचा कारभार आणि प्रशासन काय समजते !!!” ग्रिगोरी पेरेलमन, रशियन जगप्रसिद्ध गणितज्ञ यांनी २००६ मध्ये फील्ड पदके आणि गणिताच्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाच्या समतुल्य मानली जाणारी मोठी रक्कम परत केली. ते म्हण...

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

इमेज
  मोठी बातमी!  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द,  लोकसभा अध्यक्षांची कारवाई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये खासदार आणि आमदारांना २ वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यासही बंदी घातली जाऊ शकते. याच कायद्यानुसार, राहुल गांधी यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे.  राहुल गांधी यांच्यासमोर काय मार्ग? खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कायदेशीर मार्ग आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी वरच्या कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. जर वरच्या कोर्टाने खालच्या कोर्टा...

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, सुरतच्या न्यायालयाचा निकाल

इमेज
  मोठ्ठी बातमी!  राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा,  सुरतच्या न्यायालयाचा निकाल मोदी आडनावा वरील 'ती' टीका भोवली सिंदखेडराजा:- २३ मार्च, गुरुवार सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंबंधी केलेल्या टीकेसंदर्भात २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे.  न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. आज २३ मार्च, गुरुवारी सुरतच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनावासंबंधी केलेल्या टीकेसंदर्भात २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र वायनाडच्या खासदाराला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन मिळाला. राहुल गांधी यांनी 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे?', असे कथित वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार व गुजरातचे माजी मंत्री असलेल्या पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. वायनाडचे लोकसभा सदस्य अ...

राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस ..

इमेज
  राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस .. सिंदखेडराजा:- केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारे दिल्ली पोलीसांचे एक पथक आज दि. १९ मार्च, रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे.  ह्यासंदर्भात पोलीस टीमचे नेतृत्व करणारे लॉ अँड ऑर्डरचे स्पेशल कमिश्नर सागर प्रीत हुडा यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेदरम्यान कश्मीरच्या श्रीनगरमध्ये ३० जानेवारी रोजी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की यात्रेदरम्यान त्यांना भेटलेल्या काही महिला रडत होत्या. याबाबत विचारले असता, त्या महिलांवर अत्याचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. ह्यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्रही दिले होते. मात्र त्यावेळी ते विदेशात होते. आता ते घरी परतले असल्याने त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आलो असल्याचेही हुडा यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या ह्या नोटिसवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात पक्षाच्या वतीने ट्वीट करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र सरकार अडाणी-हिंडनबर्ग मामल्यावर राहुल गांधींनी निर्माण केलेल्या प्रश्नांमुळे घाबरले आहे आ...

प्राथमिक शिक्षक पतसंस्था पदाधिकारी निवडणूक अविरोध

इमेज
शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भानुदास लव्हाळे, उपाध्यक्षपदी शरद नागरे व सचिवपदी गंगाधर खरात यांची बिनविरोध निवड सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित, सिंदखेडराजा र. नं. ७८८ च्या अध्यक्षपदी भानुदास लव्हाळे, उपाध्यक्षपदी शरद नागरे व सचिवपदी गंगाधर खरात यांची बिनविरोध निवड झाली आहे. ह्या शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड अविरोध होण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केले तरी फक्त तीन जागा अविरोध झाल्या, मात्र उर्वरित जागांवर शिक्षक नेत्यांना त्यात यश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे दि. २६ फेब्रुवारी, रविवारी निवडणूक घेण्यात आली होती.  त्यामध्ये शिक्षक एकता पॅनेलने बारा जागांवर विजय मिळवत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते. त्यामध्ये  शरद कचरू भोकरे, गैबीनंद एकनाथ घुगे, रमेश पुंजाजी जैवळ, भानुदास पुंडलिक लव्हाळे, अशोक संतोषराव नागरे, शरद बाबुराव नागरे, बाळ राजाराम पऱ्हाड, शेख तस्लीम अली मुश्ताक अली, नंदकिशोर दत्तात्रय शिंगणे, लिंबाजी म्हातारबा तायडे तर महिला राखीव गटातून वर्षा बाबुराव इघारे (जायभाये) व योगिता ब्रिजलाल राठोड यांचा समावेश होता. तर  ...

इयत्ता १० वीच्या मागासवर्गीय परीक्षार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण तसेच मोफत टॅब व इंटरनेट डेटा

इमेज
  इयत्ता १० वीच्या मागासवर्गीय परीक्षार्थ्यांना  MHT - CET/JEE/NEET परीक्षेसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था टॅब व ६ जीबी इंटरनेट डेटा मिळणार मोफत सिंदखेडराजा:- सध्या जे दहावीची परीक्षा देत आहेत, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २०२५ मध्ये होणाऱ्या MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था राज्य शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, मुंबई तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती - विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी होण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, वरील मागास प्रवर्गातील व नॉन - क्रिमिलेअर असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी; विद्यार्थिनी ह्यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये १० वीची परीक्षा देत आहेत तेच विद्यार्थी ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यांनी अर्ज करतांना इयत्ता दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र व इयत्ता नववीची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे....

आणखी दोन शिक्षक अटकेत, आरोपींची एकूण संख्या झाली सात, सोशल मीडियाद्वारे बारावी पेपरफुटी प्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी

इमेज
  सोशल मीडियाद्वारे बारावी पेपरफुटी प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी  आज रात्री उशीरा आणखी दोन शिक्षक अटकेत : आरोपींची एकूण संख्या झाली सात तपासात पोलीस मुख्य सूत्रधार व मास्टर माईंड पर्यंत पोहचणार का? सिंदखेडराजा:- राज्यभर गाजलेल्या इयत्ता १२ वीच्या गणित पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना दि. १० मार्च, शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर रात्री उशीरा आणखी दोन आरोपी शिक्षकांना लोणार भागातून अटक करण्यात आली असून, आरोपींची एकूण संख्या सात झाली आहे. त्यातून ह्या प्रकरणाचे धागेदोरे तपासत पोलीस ह्या प्रकरणाचा सुत्रधार व मास्टरमाईंड पर्यंत पोहोचण्यात यशस्वी होणार का? असा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.  राज्यभरात गाजलेल्या इयत्ता बारावीचा गणित पेपर सोशल मीडियाद्वारे फुटल्याची घटना दि. ३ मार्च, शुक्रवारी तालुक्यात घडल्याची बाब इलेक्ट्रॉनिक मीडियावर आली होती. त्यानंतर काही मिनिटांच्या अवधित विधानसभा अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासात अजितदादा पवार व वर्षा गायकवाड यांनी यावर सरकारला धारेवर धरले होते. त्यातून हा प्रकार संपूर्ण राज्यभरात चर्चेत आला ...

सोशल मीडियाद्वारे बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणी पाच आरोपींना अटक

इमेज
सोशल मीडियाद्वारे बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणी पाच आरोपींना अटक  सिंदखेडराजा:- दि. ३ मार्च, शुक्रवारी राज्यभरात गाजलेल्या इयत्ता १२ वी चा गणित विषयाचा पेपर सोशल मीडियातून फुटल्या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सिंदखेडराजा पोलिसांनी तक्रारीत साखरखेर्डा परिसरातील गावाचा उल्लेख करुन घेतला गेला होता. त्याअनुषंगाने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ४ मार्च, शनिवारी वर्ग करण्यात आला.  उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  तातडीने तपास हाती घेतला. आपल्या कौशल्याचा वापर करीत पेपरफुटीसाठी कारणीभूत असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला. संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली.  त्यातून पाच आरोपी ज्यामध्ये दोन खाजगी शाळेवरील शिक्षक व इतर तिघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या सर्व पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यावर पोलिसांनी त्यांना रात्री उशीरा अटक केली आहे. आरोपींमध्ये गजानन शेषराव आढे, वय ३४ वर्षे, रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, गोपाल दामोधर शिंगणे, वय ३० वर्षे, रा. शेंद...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बारावीच्या पेपर फुटी संदर्भात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल ..

इमेज
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या  बारावीच्या पेपर फुटी संदर्भात सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल .. हा पेपर पुन्हा होणार नाही - बोर्डाचे प्रकटन सिंदखेडराजा:- राज्यभरात गाजलेल्या सोशल मीडियातून पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे प्रकरण साखरखेर्डा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचेही सूतोवाच आहे. तर गणिताचा पेपर पुन्हा होणार नसल्याचे प्रकटन बोर्डाकडून जारी करण्यात आले आहे. आज दि. ३ मार्च, शुक्रवारी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा गणिताचा पेपर होता.  तालुक्यातून हा पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून परीक्षेच्या अर्धा तासापूर्वीच फुटल्याची बातमी एका वृत्तवाहिनीवर प्रकाशित झाली. लगोलग विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात अजितदादा पवार व माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा मुद्दा गाजवला. त्यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील ह्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे उत्तर दिले. त्यातून ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर जिल्हा शिक्षण विभागा...

मधमाशांचा हल्ल्यात नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी जखमी ..

इमेज
  मधमाशांचा हल्ल्यात नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी जखमी .. सिंदखेडराजा:- लग्न लावण्यासाठी परण्या काढत वरात घेऊन लग्नस्थळी जाणाऱ्या वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी तालुक्यातील दुसरबीड येथे आज दि.२७ फेब्रुवारी, सोमवारी घडली. या घटनेत वऱ्हाडसह नवरदेव जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.  दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात आयोजित आज एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये तालुक्यातीलच किनगावराजा येथील फुलसिंग देव्हरे यांचा मुलगा वर मंगेश फुलसिंग देव्हरे ह्याचा शुभ विवाह दुसरबीड येथीलच बबन बिथरे यांची मुलगी वधू गंगा बबन बिथरे हिच्यासोबत होणार होता.  त्यादरम्यान किनगावराजा येथून नवरदेवाची वऱ्हाडी मांडली दुसरबीड येथे पोहोचली. मंगल कार्यालयात सर्व सोपस्कार व विधी झाल्यावर सायंकाळी परण्याची वरात वाजत गाजत मंगल कार्यालयातून निघाली. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५.३० वा. सुमारास ही वरात लग्न लावण्यासाठी परत मंगल कार्यालयाकडे जात असतांनाच मार्गावरील बाभूळ बनात बँडच्या वाद्याच्या आवाजाने झाडावरील आग्या मोहोळाचे पोळे त्या वऱ्हाडी मंडळीच्या अंगावर पडले. अचानक घडलेल्य...

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

इमेज
२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्ह२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी जारी करण्यात आला. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ अनुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौ...

शिक्षक पतसंस्था निवडणुकीत एकता पॅनेलचे एकहाती वर्चस्व..

इमेज
  शिक्षक पतसंस्था निवडणुकीत एकता पॅनेलचे एकहाती वर्चस्व.. सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित सिंदखेडराजा र. नं. ७८८ च्या संचालक मंडळाची निवडणूक आज दि. २६ फेब्रुवारी, रविवारी घेण्यात आली. त्यामध्ये शिक्षक एकता पॅनेलने बारा जागांवर विजय मिळवत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून माजी अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे तसेच बहुसंख्य शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी पतसंस्थेची उत्तम वाटचाल पाहत प्रयत्न केले. त्यामध्ये अनुसूचित जाती गटातून सुभाष सखाराम गवई, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून सुभाष झाबुसिंग पवार व इतर मागासवर्ग गटातून गंगाधर शंकरराव खरात ह्यांना अविरोध करण्यात यश आले. मात्र सर्वसाधारण व महिला राखीव गटाची निवड अविरोध करण्याचे प्रयत्न सुरु असतांनाच काहींनी त्यात बिब्बा घातला. त्यामुळे यंत्रणेला आज प्रत्यक्ष मतदान घ्यावे लागले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे आदिंच्या नेतृत्वाखाली शिक्षक एकता पॅनेल व दिलीप खंडारे, कैलास ढोलेकर आदिंच्या नेतृत्वाखाली बहुजन शिक्षक आघाडी पॅनेल असे दोन...

लाडक्या आर. आर. आबांना, स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ..🌷🙏

इमेज
  लाडक्या आर. आर. आबांना, स्मृतीदिनी विनम्र अभिवादन .. 🌷🙏 विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेलं नेतृत्व आणि  मोकळं - ढाकळं व्यक्तिमत्त्व आठ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपल्यातून निघून गेलं. महाराष्ट्राचे लाडके आबा अर्थात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं दि. १५ फेब्रुवारी, २०१५ रोजी निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांना काळाने गाठलं. महाराष्ट्राच्या लाडक्या आबांना कर्करोगाने हरवलं. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ◆ आर. आर. पाटील उपाख्य आरआर आबा यांचा परिचय ● रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील, आरआर आबा ● १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगलीमध्ये तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्म ● प्राचार्य पी बी पाटील यांच्या शाळेत श्रमदान करुन शिक्षण ● सांगलीतील शांतीनिकेतन महाविद्यालयात कला शाखेची पदवी आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण ● उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता ◆ राजकीय प्रवास ● १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषद सदस्य ● १९९० पासून सलग सहा वेळा आमदार ● ग्रामविकास मंत्रालयाची यशस्वी धुरा...

आपल्याला भेटली का कधी? अशी प्रचंड मतलबी लोकं ..??

इमेज
आपल्याला भेटली का कधी? अशी प्रचंड मतलबी लोकं ..?? तुम्ही काय अन मी काय? मतलबी लोकांच्या त्या दुर्बीण निरीक्षणात आपण सगळेच आहोत. ही मतलबी लोकं अनाकलनीय असतात. मतलब नसेल तर कधीच भेटत नाहीत. एखाद्या कार्यक्रमात भेट झाली की एवढे वाकतात (म्हणजे लवतात) की आपल्याला स्वतःची शरम वाटू लागते. अन जर ती स्वत: होऊन संपर्क साधत आपल्याकडे आली किंवा प्रत्यक्षात भेटली तर नक्कीच मोठा वांधा आपल्यासारख्यांचा होतोच. सार्वजनिक क्षेत्रात आपल्याला प्रतिष्ठा आहे, ह्यावर ही मंडळी चोखपणे लक्ष ठेवून असते. आपल्याशी भेटून अथवा संपर्क करुन काय बोलतील? अन इतरांना त्याचा मतितार्थ काय सांगतील?, ह्याचा नेमच नसतो. कारण त्यांना फक्त त्यांचा मतलब साध्य करायचा असतो. तो तर त्यांच्या बेशरमपणाचा  कळसच असतो. त्यानंतर त्यांच्या मतलबाची योग्य वेळ निघून गेली की, त्या घडलेल्या किंवा न घडलेल्या गोष्टींचे, त्यांच्या दृष्टीकोनातून मतलबात रूपांतर केल्या गेलेल्या बाबी कानावर येतात. तेंव्हा आपण कितीही प्रामाणिकपणे चालणारे असलो किंवा कठोर असलो, तरीही आपला मेंदू गोठविण्याची क्षमता त्या कपोलकल्पित बाबीत असते. ती मतलबी मंडळी, आपल्या नावाच...

साखरखेर्डा येथील त्या बेपत्ता प्रौढ व्यक्तीचा मृतदेहच आढळला ..

इमेज
  साखरखेर्डा येथील त्या बेपत्ता प्रौढ व्यक्तीचा मृतदेहच आढळला .. सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील शेख सलीम शेख मन्नू कुरेशी हे दि. ४ फेब्रुवारी, शनिवारी बेपत्ता झाले होते. त्याच रात्री ११.०० वा. त्यांचा मृतदेह, उदगीर, जि. लातूर येथे आढळला असल्याची माहिती मिळाली आहे.   साखरखेर्डा येथील जाफ्राबाद मोहल्ल्यातील शेख सलीम शेख मन्नू कुरेशी, वय अंदाजे ५५ वर्षे ही व्यक्ती शनिवारी, दि. ४ फेब्रुवारी रोजी बस स्थानक परिसरात होती. शेख सलीम हे दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीय, नातेवाईक व इतर सर्वांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती देण्यात आली. त्यावरुन नोंद घेत साखरखेर्डा पोलिसांनीही शोध सुरु केला होता. काल दि. ७ फेब्रुवारी, मंगळवारी रात्री ११.०० च्या सुमारास त्यांचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह उदगीर, जि. लातूर येथे आढळला व त्यांचा दफनविधी पार पडल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यावरुन कुटुंबीय उदगीर येथे पोहोचले आहेत. कुटुंबातील एका व्यक्तीकडून मिळालेल्या...

विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न गरजेचे - प्रकाश मुकुंद

इमेज
 विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न गरजेचे - प्रकाश मुकुंद बुलढाणा:- स्पर्धेच्या युगात विज्ञान किंवा इतर विषयांचे केवळ अध्यापन व प्रात्यक्षिक करुन भागणार नाही. तर विद्यार्थ्यांना विविध विषयांचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले. राजीव गांधी सैनिक शाळेत दि. ३१ जाने व १ फेब्रु रोजी आयोजित दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीच्या शिक्षकांच्या कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुकुंद बोलत होते.  कार्यशाळेत रोबोटिक्स तज्ञ काजल राजवैद्य यांनी सध्या देशविदेशात रोबोट्स वापरण्यात येत आहेत. मात्र साध्या गोष्टींसाठी हे यंत्र फायदेशीर ठरते, तर त्यापेक्षाही जास्त अपडेटिंगसाठी मेंदूचा वापर व्हावा व वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स, आर्टिफिसिअल इंटेलिजन्स निर्माण व्हावेत असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर कलर, फेसिएल, ऑब्जेक्ट, इंटेलिजन्स ट्रॅकिंग रोबोटचे आकर्षक प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांसमोर सादर केले. याचवेळी विज्ञान शिक्षक प्रल्हाद दाभाडे व ...

"इगो" म्हणजेच "गं ची बाधा .." ती लयच वाईट! ती कुठलंच ठेवत नाही.

इमेज
 "इगो" म्हणजेच  "गं ची बाधा .."  ती लयच वाईट! ती कुठलंच ठेवत नाही. सिंदखेडराजा:- आपण सर्वजण ज्याला इगो म्हणतो, पूर्वी त्यालाच 'गं ची बाधा' असे म्हणायचे. जगण्याच्या व अनुभवाच्या दृष्टिकोनातून माझ्यासारखे अनेकजण अगदीच खालच्या पातळीतील सापडतील. सकाळच्या न्याहरीत खायला रातची भाकर, ठेचा, खार (लोणचे) कधीमधी कुटके, दुपारी ज्वारीची भाकर व जी उपलब्ध असेल ती भाजी. रात्रीच्या वेळी मात्र हमखास डाळ ठरलेली. सोबतच नेसायला काय तर कुटुंबातील वयपरत्वे मोठ्या व्यक्तीने नेसून टाकलेले, वापरुन जुने केलेले कपडे. आणि ते जरी आणखी जीर्ण झाले किंवा फाटले तर त्याला टीपा देऊन, किंवा घरच्या सुईदोऱ्याने शिवून वापरायचे. त्यानंतर कपडे नेसायची पुढची पातळी येत नाही, तोपर्यंत शाळेतल्या सोबतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी प्रेमाने "लाईट लाईट" म्हणून संबोधावे, असा तो काळ .. पण, त्यावेळच्या गावगाड्यात नाकाडोळ्याची कुटुंबे सुध्दा ह्याच प्रकारचे जीवन जगत असत, त्यामुळे कुठेच उचनीचता आढळत नव्हती. त्याकाळी सुबत्ता नसली तरी प्रेम, आपुलकी, सौहार्दाने गावगाडे चालायचे.  मात्र त्यानंतर हळूहळू धडक...