साखरखेर्ड्यात नागरिकांना कुणीही वाली नाही. आलिया भोगाशी असावे सादर ..
साखरखेर्ड्यात नागरिकांना कुणीही वाली नाही.
आलिया भोगाशी असावे सादर ..
वीज मंडळ ते कंपनी प्रवासात हाती दैवदुर्विलासच ..
सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथील वीज कंपनीतील जबाबदार यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे परिसरातील ग्राहक नागरिकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे. ज्यांच्याकडे प्रतिनिधित्व आहे, ते सुद्धा मला काय त्याचे? ह्या भूमिकेत दिसून येत आहेत.
वीज मंडळ ते वीज कंपनी ह्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रवासात साखरखेर्डा येथील संबंधित कार्यालय व त्यांची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे द्योतक आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ह्या संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा कधीही सुरळीत असल्याचे दिसून आले नाही. वेळोवेळी नव्हेतर तासातासाला उद्भवणारा बिघाड हा पाचवीलाच पुजलेला आहे की काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
वीज मंडळ ते कंपनी ह्या अनेक वर्षांच्या प्रवासात वीज पुरवठा करण्यासाठी परिसरात असलेल्या सुविधेतील खांब, तारा आदि एकूण एक साहित्य तसेच आहे. त्यात जुजबी बदल केल्या जातात. हे बदल ज्यांना आवश्यक वाटतात त्यांच्याकडून मलिदाही खाल्ल्या जातो. नव्हेतर आम्ही आपल्यावर उपकार केलेत हा भावही यंत्रणेतील पगारदारांमध्ये असतो.
मंडळ ते कंपनी ह्या वीज वितरणच्या संपूर्ण प्रवासात स्थानिक ते राज्य व देश पातळीवर अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेलेत. त्यातील अपवाद वगळता बहुसंख्य मंडळीने जनतेच्या मूलभूत ह्या समस्यांकडे दुर्लक्षच केल्याचे चित्र आहे.
यंत्रणेतील वरिष्ठांसंदर्भात तर सगळं काही आलबेल आहे.
सेवेचे काहीही होवो, फक्त वसुली एवढाच त्यांचा एक उद्देश दिसून येतो.
शेवटी ग्राहक नागरिक, सर्वसामान्य जनता आलिया भोगाशी असावे सादर ह्या वृत्तीने, कुणीतरी आपले ऐकेल ह्या संभावित दृष्टीने प्रत्येकाला न्याहाळत असल्याचे वर्षानुवर्षे असलेले चित्र आजही कायम आहे, एवढे मात्र खरे ..!
ह्या संपूर्ण प्रकाराला वैतागून जात संदर्भात जुलै २०२२ मध्ये उपरोधिक पोस्ट समाजमाध्यमावर टाकली होती. त्यावेळी मूळचे सिंदखेडराजा तालुक्यातील व बुलढाणा येथील कार्यालयातील वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने कॉल करुन, दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच भाषेत उत्तर मिळाल्यावर त्या महाशयांनी तालुक्यातील यंत्रणा सुरळीत करण्यासाठी किती प्रयत्न केलेत? हे बिघडांच्या न संपलेल्या प्रकारांनी दाखवून देऊन, त्या व्यक्तीला सणसणीत चपराक दिली आहे. त्यातून गेंड्याची कातडी धारण करणारी यंत्रणा उघडी पडली आहे.
खरं आहे सर
उत्तर द्याहटवादुसरबीड सबटेशन चे पण तेच हालत आहे सर
उत्तर द्याहटवा