आपल्याला भेटली का कधी? अशी प्रचंड मतलबी लोकं ..??
आपल्याला भेटली का कधी?
अशी प्रचंड मतलबी लोकं ..??
तुम्ही काय अन मी काय?
मतलबी लोकांच्या त्या दुर्बीण निरीक्षणात आपण सगळेच आहोत. ही मतलबी लोकं अनाकलनीय असतात. मतलब नसेल तर कधीच भेटत नाहीत. एखाद्या कार्यक्रमात भेट झाली की एवढे वाकतात (म्हणजे लवतात) की आपल्याला स्वतःची शरम वाटू लागते.
अन जर ती स्वत: होऊन संपर्क साधत आपल्याकडे आली किंवा प्रत्यक्षात भेटली तर नक्कीच मोठा वांधा आपल्यासारख्यांचा होतोच. सार्वजनिक क्षेत्रात आपल्याला प्रतिष्ठा आहे, ह्यावर ही मंडळी चोखपणे लक्ष ठेवून असते. आपल्याशी भेटून अथवा संपर्क करुन काय बोलतील? अन इतरांना त्याचा मतितार्थ काय सांगतील?, ह्याचा नेमच नसतो. कारण त्यांना फक्त त्यांचा मतलब साध्य करायचा असतो. तो तर त्यांच्या बेशरमपणाचा कळसच असतो. त्यानंतर त्यांच्या मतलबाची योग्य वेळ निघून गेली की, त्या घडलेल्या किंवा न घडलेल्या गोष्टींचे, त्यांच्या दृष्टीकोनातून मतलबात रूपांतर केल्या गेलेल्या बाबी कानावर येतात.
तेंव्हा आपण कितीही प्रामाणिकपणे चालणारे असलो किंवा कठोर असलो, तरीही आपला मेंदू गोठविण्याची क्षमता त्या कपोलकल्पित बाबीत असते.
ती मतलबी मंडळी, आपल्या नावाचा, प्रभावाचा, नातेवाईकपणाचा आदि सर्वच क्षेत्रातील प्रभावाचा माघारी वापर करीत त्यांचा कार्यभाग उरकून घेतात.
अन सपशेलपणे आपण तोंडावर पडतो.
अशाच काही प्रसंगावर आधारित मतलब्यांनी प्रायोजित केलेली बदनामी सुद्धा आपल्या वाट्याला येते.
तेंव्हा आपण स्वतःसाठी आणि त्या मतलब्यांसाठीच जळणारे "दीपक" ठरावेत. असा त्यांचा हेतू दृष्टीपथात येतो. मात्र क्षमेशिवाय कोणतेही दान मोठे ठरत नाही, ही आपली माणुसकी आपण पाळायची. ह्या एक दोन नव्हेतर खूप अनुभवानंतर आपण आपली दिशा ठरवू यात.
मात्र ह्याचवेळी उपरोक्त सगळ्या बाबींसाठी आपल्या ग्रामीण बोलीभाषेतील एकच म्हण आठवते ..
मुकी ...
हाक ना बोंब ...!
हा अनुभव ज्याला आहे, त्यानेच प्रतिक्रिया द्यावी, ही हात जोडून विनंती ..!🙏

अगदी बरोबर 👌
उत्तर द्याहटवाSatish rohidas rathod
उत्तर द्याहटवा