साखरखेर्डा येथील त्या बेपत्ता प्रौढ व्यक्तीचा मृतदेहच आढळला ..


 
साखरखेर्डा येथील त्या बेपत्ता प्रौढ व्यक्तीचा मृतदेहच आढळला ..


सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील शेख सलीम शेख मन्नू कुरेशी हे दि. ४ फेब्रुवारी, शनिवारी बेपत्ता झाले होते. त्याच रात्री ११.०० वा. त्यांचा मृतदेह, उदगीर, जि. लातूर येथे आढळला असल्याची माहिती मिळाली आहे.  

साखरखेर्डा येथील जाफ्राबाद मोहल्ल्यातील शेख सलीम शेख मन्नू कुरेशी, वय अंदाजे ५५ वर्षे ही व्यक्ती शनिवारी, दि. ४ फेब्रुवारी रोजी बस स्थानक परिसरात होती. शेख सलीम हे दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीय, नातेवाईक व इतर सर्वांनी त्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती देण्यात आली. त्यावरुन नोंद घेत साखरखेर्डा पोलिसांनीही शोध सुरु केला होता.

काल दि. ७ फेब्रुवारी, मंगळवारी रात्री ११.०० च्या सुमारास त्यांचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत मृतदेह उदगीर, जि. लातूर येथे आढळला व त्यांचा दफनविधी पार पडल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. त्यावरुन कुटुंबीय उदगीर येथे पोहोचले आहेत.

कुटुंबातील एका व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार साखरखेर्डा येथून बेपत्ता झाल्यावर शेख सलीम कुरेशी हे बसमध्ये बसून जालना येथे गेले. जालना येथुन रेल्वेने हैद्राबादकडे जाणाऱ्या गाडीत बसले. रेल्वेमध्येच उदगीर स्थानकाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

कुरेशी कुटुंबीय उदगीर येथे पोहोचले असून, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला आहे. तूर्तास पुढील कारवाई सुरु आहे.

शेख सलीम कुरेशी ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..!🌷🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा