लाडक्या आर. आर. आबांना, स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ..🌷🙏

 


लाडक्या आर. आर. आबांना,
स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ..🌷🙏

विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेलं नेतृत्व आणि  मोकळं - ढाकळं व्यक्तिमत्त्व आठ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपल्यातून निघून गेलं.
महाराष्ट्राचे लाडके आबा अर्थात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं दि. १५ फेब्रुवारी, २०१५ रोजी निधन झालं. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांना काळाने गाठलं.

महाराष्ट्राच्या लाडक्या आबांना कर्करोगाने हरवलं. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

◆ आर. आर. पाटील उपाख्य आरआर आबा यांचा परिचय

● रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील, आरआर आबा
● १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगलीमध्ये तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्म
● प्राचार्य पी बी पाटील यांच्या शाळेत श्रमदान करुन शिक्षण
● सांगलीतील शांतीनिकेतन महाविद्यालयात कला शाखेची पदवी आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण
● उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता

◆ राजकीय प्रवास

● १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषद सदस्य
● १९९० पासून सलग सहा वेळा आमदार
● ग्रामविकास मंत्रालयाची यशस्वी धुरा
● गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचं सर्वस्वी श्रेय आबांना
● उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून मोठी जबाबदारी लीलया सांभाळली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली