सोशल मीडियाद्वारे बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणी पाच आरोपींना अटक

सोशल मीडियाद्वारे बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणी पाच आरोपींना अटक 

सिंदखेडराजा:- दि. ३ मार्च, शुक्रवारी राज्यभरात गाजलेल्या इयत्ता १२ वी चा गणित विषयाचा पेपर सोशल मीडियातून फुटल्या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सिंदखेडराजा पोलिसांनी तक्रारीत साखरखेर्डा परिसरातील गावाचा उल्लेख करुन घेतला गेला होता. त्याअनुषंगाने हा गुन्हा साखरखेर्डा पोलिसांकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ४ मार्च, शनिवारी वर्ग करण्यात आला. 

उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार व ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह  तातडीने तपास हाती घेतला. आपल्या कौशल्याचा वापर करीत पेपरफुटीसाठी कारणीभूत असणाऱ्या आरोपींचा शोध घेतला. संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली.  त्यातून पाच आरोपी ज्यामध्ये दोन खाजगी शाळेवरील शिक्षक व इतर तिघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या सर्व पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यावर पोलिसांनी त्यांना रात्री उशीरा अटक केली आहे. आरोपींमध्ये गजानन शेषराव आढे, वय ३४ वर्षे, रा. किनगाव जट्टू, ता. लोणार, गोपाल दामोधर शिंगणे, वय ३० वर्षे, रा. शेंदूरजन, गणेश शिवानंद नागरे, वय ३० वर्षे, पवन सुधाकर नागरे, वय २३ वर्षे व गणेश बद्रीनाथ पालवे तिघेही रा. भंडारी यांचा समावेश आहे.

ह्या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? ह्यासंदर्भातही ठाणेदार नंदकिशोर काळे व सहकारी पुढील तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल