शिक्षक पतसंस्था निवडणुकीत एकता पॅनेलचे एकहाती वर्चस्व..

 


शिक्षक पतसंस्था निवडणुकीत एकता पॅनेलचे एकहाती वर्चस्व..



सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित सिंदखेडराजा र. नं. ७८८ च्या संचालक मंडळाची निवडणूक आज दि. २६ फेब्रुवारी, रविवारी घेण्यात आली. त्यामध्ये शिक्षक एकता पॅनेलने बारा जागांवर विजय मिळवत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे.


ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून माजी अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे तसेच बहुसंख्य शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी पतसंस्थेची उत्तम वाटचाल पाहत प्रयत्न केले. त्यामध्ये अनुसूचित जाती गटातून सुभाष सखाराम गवई, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून सुभाष झाबुसिंग पवार व इतर मागासवर्ग गटातून गंगाधर शंकरराव खरात ह्यांना अविरोध करण्यात यश आले. मात्र सर्वसाधारण व महिला राखीव गटाची निवड अविरोध करण्याचे प्रयत्न सुरु असतांनाच काहींनी त्यात बिब्बा घातला. त्यामुळे यंत्रणेला आज प्रत्यक्ष मतदान घ्यावे लागले.


यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे आदिंच्या नेतृत्वाखाली शिक्षक एकता पॅनेल व दिलीप खंडारे, कैलास ढोलेकर आदिंच्या नेतृत्वाखाली बहुजन शिक्षक आघाडी पॅनेल असे दोन पॅनेल ऐनवेळी समोरासमोर उभे ठाकले. 


दोन्हीही पॅनेल्सनी संस्थेच्या प्रत्येक मतदार शिक्षकापर्यंत पोहोचत आपली भूमिका स्पष्ट केली.

शिक्षक एकता पॅनेल तर्फे शरद कचरू भोकरे, गैबीनंद एकनाथ घुगे, रमेश पुंजाजी जैवळ, भानुदास पुंडलिक लव्हाळे, अशोक संतोषराव नागरे, शरद बाबुराव नागरे, बाळ राजाराम पऱ्हाड, शेख तस्लीम अली मुश्ताक अली, नंदकिशोर दत्तात्रय शिंगणे, लिंबाजी म्हातारबा तायडे तर महिला राखीव गटातून वर्षा बाबुराव इघारे (जायभाये) व योगिता ब्रिजलाल राठोड यांनी तर बहुजन शिक्षक आघाडी पॅनेल तर्फे दिलीप बन्सीलाल चव्हाण, माधव नारायण देशमुख, तेजराव काशिराव देशमुख, शिवशंकर देवराव डोईफोडे, प्रफुल्ल हरिभाऊ घिके, मधुकर नारायण घोंगे, केशव शेषराव मुरकूट, सुभाष भिकाजी पडघान, संतोष आनंदा सोनुने व महिला राखीव गटातून छाया उत्तम मनवर व वंदना चंद्रशेखर टाकसाळ ह्यांनी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.


ह्या निवडणूकीत एकूण ३०३ मतदारांपैकी २९१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ९६.०३ एवढी आहे. मतदानानंतर थोड्याच वेळात मतमोजणी सुरु करण्यात आली. त्यामध्ये शिक्षक एकता पॅनेलचे सर्वच्या सर्व म्हणजे सर्वसाधारण गटातील दहा व महिला राखीव गटातील दोन असे बाराही उमेदवार जवळपास दुपटीच्या फरकाने निवडून आल्याचे चित्र आहे. 


तर अविरोध निवडून आलेले तिघेही संचालक बहुजन शिक्षक आघाडी पॅनेलचे असल्याचे निवडणुकीतील पोस्टर्स व घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.

निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी नंदकिशोर खरात, विनोद ठाकरे, माणिकराव घुगे, विलास आघाव, नितीन मेरत, शिवाजी डिघोळे, सुनील मदनराव कायंदे आदिंनी परिश्रम घेतले


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!