तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी! महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन; अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती

तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे 

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी!

महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन; 

अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती

सिंदखेडराजा :

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी जयंती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. सत्य, अहिंसा, साधेपणा, त्याग आणि देशसेवा या महात्मा गांधी यांच्या विचारांचे तसेच 'जय जवान, जय किसान' हा प्रेरणादायी संदेश देणारे लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला तहसीलदार अजित दिवटे, डॉ. प्रवीण वराडे (नायब तहसीलदार, महसूल), संदीप बंगाळे (निवासी नायब तहसीलदार), संजय सोनुने (महसूल तालुका अध्यक्ष), के. डी. इंगोले (महसूल सहाय्यक), राजू खरात (महसूल सेवक), डी. एस. बनकर, शिवाजी शिंदे (शिपाई), गणेश देशमुख (ऑपरेटर) यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापुरुषांचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आणि प्रशासकीय कामकाजात आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेश या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

अवघ्या पाच तासांत खुनाचा उलगडा; चौघे संशयित जेरबंद! दारुतून विष पाजून उमेश परिहार यांची हत्या :: किनगावराजा पोलिसांची थरारक कारवाई; सोयाबीनच्या शेतात सापडलेल्या मृतदेहाची अवघ्या काही तासांत ओळख पटवली