२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन



मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्ह२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी जारी करण्यात आला.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ अनुसार लक्षणीय प्रमाणात लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राष्ट्रपतींना राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून "१ मे" हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला. १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना वसंतराव नाईक यांनी मांडलेले मराठी भाषा दिनाचे मांडलेले विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती करीत प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना करण्यात आली. राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृत जाहीर केले. अनेक मराठी लोकांसाठी व आधिकाऱ्यांसाठी 'राजभाषा परिचय' पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी भाषा दिवस' (१ मे) हे दोन्हीही दिवस पूर्णपणे वेगळे असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा