बोगसपणा मेंदूत घुसवल्या जातोय .. वाचकांनो सावध व्हा ..! काम कुणाचे? पुरस्कार कुणाला?? यंत्रणेने भावनिक न होता, ज्याचा न्याय त्याला ही भूमिका घेण्याची गरज ..!
बोगसपणा मेंदूत घुसवल्या जातोय ..
वाचकांनो सावध व्हा ..!
काम कुणाचे?
पुरस्कार कुणाला??
यंत्रणेने भावनिक न होता,
ज्याचा न्याय त्याला ही भूमिका घेण्याची गरज ..!
(एका पुरस्काराचे छायाचित्र)सिंदखेडराजा:- इयत्ता बारावीची परीक्षा सुरू असतांनाच दि. ३ मार्च रोजी, झी २४ तास ह्या वृत्तवाहिनीवर गणिताचा पेपर फुटल्याची बातमी आली. एवढेच नाही तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी ह्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यातून संपूर्ण राज्यभरात कल्लोळ उठला.
यंत्रणेतील एका विभागाने हे प्रकरण झाल्याचे दाखल करण्यासंदर्भात नाकारले, त्याच व्यक्तीला सन्मानित केले जावे, हा दैवदुर्विलास आज बघावयास मिळाला.
त्यामुळे घाईघाईने श्रेय कुणाच्यातरी नावे करणाऱ्या वरिष्ठांनाही अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
इयत्ता दहावी तसेच बारावी परीक्षा सुरु झाल्यापासून सोशल मीडियाचा वापर करीत पेपर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन, झी २४ तासच्या प्रतिनिधीने त्या प्रकरणावर आपले लक्ष कायम केले. इयत्ता १२ वी च्या पेपरफुटीमध्ये त्यांना यशही लाभले. नव्हेतर बातमी वाऱ्यावर न जाता त्यातील तथ्य बाहेर कसे येऊ शकते? ह्यावर लक्ष केंद्रित केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तथ्य हाती लागताच त्यांनी पुराव्यानिशी बातमी प्रकाशित केली?
त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात हलकल्लोळ उठला. काही मिनिटातच अधिवेशनात अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रकरण गंभीर झाले. परीक्षा घेणाऱ्या बोर्डाने तसेच त्या अंतर्गत शिक्षण विभागाने आपले काम हाती घेतले. शिक्षण विभागाच्या वतीने अधिकारी जगन मुंढे व तालुका गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे ह्यांनी तातडीने साखरखेर्डा पोलीस ठाणे गाठले. मात्र आज ज्यांना पुरस्कार बहाल करण्यात आला, त्या साखरखेर्ड्याचे ठाणेदार असलेल्या श्रीयुत काळे ह्यांनी तक्रार घेण्यासाठी सपशेल नकार दिला. नव्हेतर शासनातर्फे तक्रारदार असलेल्या मुंढे व गावडे ह्यांना सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात जाण्याचे सूचित केले.
शिक्षण विभागाची मंडळी सिंदखेडराजा येथे पोहोचल्यानंतर तेथेही प्रकरण दाखल करण्यासंदर्भात वादविवाद उद्भवला. वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर, प्रकरण पुन्हा साखरखेर्डा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
त्यानंतर तपास सुरू झाल्यावर ज्यांनी बातमी प्रकाशित केली, त्या झी २४ तास वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून तपासाला दिशा मिळाली.
त्या प्रतिनिधीकडून महत्वाची सगळी माहिती मिळाल्यानंतर प्रकरणात गुन्हेगारांच्या तपासाला दिशा मिळाली. एकानंतर एक आरोपी अटक केल्या गेले.
प्रकरणात काहींना जमीन मिळाला मात्र काही आरोपी अजूनही तुरुंगात बंदिस्त आहेत.
एवढे सगळे होऊनही ज्याने ह्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच ज्या अधिकाऱ्याने हात झटकण्याचे संपूर्ण प्रयत्न केले. त्यालाच पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, ह्या पेक्षा दैवदुर्विलास कोणता?
ज्या व्यक्तीने ह्या संपूर्ण कॉपी प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी हाडाची काडे केली? त्याला फक्त विमनस्कपणे हसण्यावाचून काहीही साध्य होऊ शकले नाही. एवढेच तथ्य आज समोर आले आहे.
मात्र यंत्रणा, त्यातील अधिकारी व त्या बाबीला प्रसिद्धी देणारे, एकमेकांच्या टिर्र्या बडवत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सत्याला न्याय मिळायला हवा, ही भूमिका यंत्रणेतील वरिष्ठांनी घ्यायला हवी.
त्यातूनच बातम्या प्रसिद्ध झाल्या, की करण्यात आल्या?
हे बघता स्थानिक पातळीवर सुद्धा गोदी मीडिया कार्यरत झाला की काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे, एवढे मात्र निश्चित ..!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏