बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे?

बारावीच्या विभाग व तालुक्यातील निकालाची उत्सुकता आहे?

मग बघून घ्या ...


अमरावती विभागातील कोणता जिल्हा व बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा निकाल व क्रमांक कितवा आहे ....!


सिंदखेडराजा:- आज जाहीर झालेल्या इयत्ता १२ वीच्या निकालात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका निहाय निकाल पुढीलप्रमाणे ..

निकालामध्ये देऊळगावराजा तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार २७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार  २६२ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १६८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५५७ प्रथम श्रेणीत, ४११ द्वितीय श्रेणीत, ८६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९६.८३ एवढी आहे.

दुसऱ्या क्रमांकावर चिखली तालुका असून, परीक्षेसाठी एकूण ४ हजार १७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ हजार  १५० विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८९२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ८१६ प्रथम श्रेणीत, १ हजार १२० द्वितीय श्रेणीत, १६६ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, टक्केवारी ९६.२४ एवढी आहे.

तिसऱ्या क्रमांकावर बुलढाणा तालुका असून, परीक्षेसाठी एकूण ४ हजार ४७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी विद्यार्थी ४ हजार ४५० परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६४७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ९०९ प्रथम श्रेणीत, १ हजार ४३३ द्वितीय श्रेणीत, २५० विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ४ हजार २३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९५.२५ एवढी आहे.

चौथ्या क्रमांकावर सिंदखेडराजा तालुका असून, परीक्षेसाठी एकूण ३ हजार ८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ६४ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १६५ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ३२७ प्रथम श्रेणीत, १ हजार २०७ द्वितीय श्रेणीत, २१४ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण २ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९५.०७ एवढी आहे. 

पाचव्या क्रमांकावर मेहकर तालुका असून, परीक्षेसाठी एकूण २ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ९३९ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ६८१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ११ प्रथम श्रेणीत, ९०३ द्वितीय श्रेणीत,  १९१ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण २ हजार ७८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९४.७९ एवढी आहे.

सहाव्या क्रमांकावर लोणार तालुका असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ९५३ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील २५१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ८६१ प्रथम श्रेणीत, ६२५ द्वितीय श्रेणीत, ९९ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार ८३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९४.०० एवढी आहे.

सातव्या क्रमांकावर मोताळा तालुका असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ६६५ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील २८४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ७७२ प्रथम श्रेणीत, ४३३ द्वितीय श्रेणीत, ६९ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार ५५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९३.५७ एवढी आहे.

खामगाव तालुका आठव्या क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण ३ हजार ७१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ६९६ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील २१७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, १ हजार ११४ प्रथम श्रेणीत, १ हजार ६२६ द्वितीय श्रेणीत, ४९१ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण ३ हजार ४४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९३.२३ एवढी आहे.

जळगाव जामोद तालुका नवव्या क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ७३४ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १२० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५२५ प्रथम श्रेणीत, ७६२ द्वितीय श्रेणीत, १९८ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार ६०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९२.५६ एवढी आहे.

संग्रामपूर तालुका दहाव्या क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ३४८ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १३० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ५३४ प्रथम श्रेणीत, ४५६ द्वितीय श्रेणीत, १२४ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९२.२१ एवढी आहे.

अकराव्या क्रमांकावर मलकापूर तालुका असून, परीक्षेसाठी एकूण २ हजार १०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ९६ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील १६० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ६५० प्रथम श्रेणीत, ८१५ द्वितीय श्रेणीत, २८७ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार ९१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.२२ एवढी आहे.

शेगाव तालुका बाराव्या क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ५९५ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३६१ प्रथम श्रेणीत, ७२९ द्वितीय श्रेणीत, २५७ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार ४२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८९.०२ एवढी आहे.

नांदुरा तालुका तेराव्या क्रमांकावर असून, परीक्षेसाठी एकूण १ हजार ६६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ हजार ६५२ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, ३८५ प्रथम श्रेणीत, ६५१ द्वितीय श्रेणीत, ३१५ विद्यार्थी पास श्रेणीत असे एकूण १ हजार ४३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८६.९८ एवढी आहे.

अमरावती विभागातील जिल्ह्यांचा क्रमवारीने निकाल

अमरावती विभागात 

प्रथम क्रमांकावर वाशिम जिल्हा असून, तेथील निकाल टक्केवारी ९५.४५ एवढी आहे.

द्वितीय क्रमांकावर बुलढाणा जिल्हा असून, निकाल टक्केवारी ९३.६९ एवढी आहे.

तृतीय क्रमांकावर अकोला जिल्हा असून, निकाल टक्केवारी ९३.०४ एवढी आहे.

चौथ्या क्रमांकावर यवतमाळ जिल्हा असून, निकाल टक्केवारी ९१.९५ एवढी आहे.

पाचव्या क्रमांकावर अमरावती जिल्हा असून, त्याची निकाल टक्केवारी ९०.७६ एवढी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा