इयत्ता १० वीच्या मागासवर्गीय परीक्षार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण तसेच मोफत टॅब व इंटरनेट डेटा

 इयत्ता १० वीच्या मागासवर्गीय परीक्षार्थ्यांना  MHT - CET/JEE/NEET परीक्षेसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था


टॅब व ६ जीबी इंटरनेट डेटा मिळणार मोफत




सिंदखेडराजा:- सध्या जे दहावीची परीक्षा देत आहेत, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २०२५ मध्ये होणाऱ्या MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षणाची व्यवस्था राज्य शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, मुंबई तसेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती - विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

लाभार्थी होण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी, वरील मागास प्रवर्गातील व नॉन - क्रिमिलेअर असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी; विद्यार्थिनी ह्यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये १० वीची परीक्षा देत आहेत तेच विद्यार्थी ह्या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यांनी अर्ज करतांना इयत्ता दहावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र व इयत्ता नववीची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाराच असावा, त्यासंबंधीची कागदपत्रे भविष्यात अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन "Application for MHT - CET/JEE/NEET - 2025 Training" यावर जाऊन ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करावा. अर्जासोबत (१) नववीची गुणपत्रिका, (२) दहावीच्या परीक्षेचे ओळखपत्र, (३) आधार कार्ड, (४) रहिवासी दाखला, (५) जातीचे प्रमाणपत्र व (६) वैध नॉन - क्रिमिलेअर प्रमाणपत्र ही कागदपत्रे स्वाक्षांकीत (स्वतःची सही केलेली) करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करणे गरजेचे आहे. अशी माहिती बुलढाणा जिल्हा महाज्योती समन्वयक सतीश बाहेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा