राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, सुरतच्या न्यायालयाचा निकाल

 मोठ्ठी बातमी! 

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा, 

सुरतच्या न्यायालयाचा निकाल

मोदी आडनावा वरील 'ती' टीका भोवली



सिंदखेडराजा:- २३ मार्च, गुरुवार

सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावासंबंधी केलेल्या टीकेसंदर्भात २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. 

न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

आज २३ मार्च, गुरुवारी सुरतच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनावासंबंधी केलेल्या टीकेसंदर्भात २०१९ मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र वायनाडच्या खासदाराला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर लगेच जामीन मिळाला. राहुल गांधी यांनी 'सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव का आहे?', असे कथित वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे नेते, आमदार व गुजरातचे माजी मंत्री असलेल्या पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती. वायनाडचे लोकसभा सदस्य असलेल्या राहुल गांधी यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील कोलार येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत कथित टीका केली होती.

राहुल गांधी यांचे वकील किरीट पानवाला यांनी सांगितलं की, मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एच. वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला होता आणि निकालाची तारीख २३ मार्च निश्चित केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० ​​(मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरत कोर्टात त्यांचे म्हणणं नोंदवण्यासाठी हजर झाले होते.

त्यानंतर आज २३ मार्च, गुरुवारी निकाल देण्यात आला. मात्र याचवेळी त्यांना जामीनही देण्यात आला आहे.

आता यापुढे नेमके काय काय होते? ह्याकडे सगळ्यांचेच लक्ष केंद्रीत होत आहे, एवढे मात्र खरे ..!

टिप्पण्या