राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस ..

 राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस ..



सिंदखेडराजा:- केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारे दिल्ली पोलीसांचे एक पथक आज दि. १९ मार्च, रविवारी सकाळी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. 

ह्यासंदर्भात पोलीस टीमचे नेतृत्व करणारे लॉ अँड ऑर्डरचे स्पेशल कमिश्नर सागर प्रीत हुडा यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेदरम्यान कश्मीरच्या श्रीनगरमध्ये ३० जानेवारी रोजी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की यात्रेदरम्यान त्यांना भेटलेल्या काही महिला रडत होत्या. याबाबत विचारले असता, त्या महिलांवर अत्याचार झाल्याचे त्यांनी सांगितले होते. ह्यासंदर्भात राहुल गांधी यांना पत्रही दिले होते. मात्र त्यावेळी ते विदेशात होते. आता ते घरी परतले असल्याने त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी आलो असल्याचेही हुडा यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या ह्या नोटिसवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात पक्षाच्या वतीने ट्वीट करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र सरकार अडाणी-हिंडनबर्ग मामल्यावर राहुल गांधींनी निर्माण केलेल्या प्रश्नांमुळे घाबरले आहे आणि त्यातून पोलिसांचा वापर करीत आहे. भारत जोड़ो यात्रा संपल्यावर ४५ दिवसानंतर दिल्ली पोलीस त्या पीडित महिलांसंदर्भात विचारपूस करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

ह्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळासह सर्वत्र चर्चेला उत आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा