विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न गरजेचे - प्रकाश मुकुंद


 विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न गरजेचे - प्रकाश मुकुंद


बुलढाणा:- स्पर्धेच्या युगात विज्ञान किंवा इतर विषयांचे केवळ अध्यापन व प्रात्यक्षिक करुन भागणार नाही. तर विद्यार्थ्यांना विविध विषयांचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी केले. राजीव गांधी सैनिक शाळेत दि. ३१ जाने व १ फेब्रु रोजी आयोजित दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनीच्या शिक्षकांच्या कार्यशाळा उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात मुकुंद बोलत होते. 

कार्यशाळेत रोबोटिक्स तज्ञ काजल राजवैद्य यांनी

सध्या देशविदेशात रोबोट्स वापरण्यात येत आहेत. मात्र साध्या गोष्टींसाठी हे यंत्र फायदेशीर ठरते, तर त्यापेक्षाही जास्त अपडेटिंगसाठी मेंदूचा वापर व्हावा व वेगवेगळ्या प्रकारचे रोबोट्स, आर्टिफिसिअल इंटेलिजन्स निर्माण व्हावेत असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर कलर, फेसिएल, ऑब्जेक्ट, इंटेलिजन्स ट्रॅकिंग रोबोटचे आकर्षक प्रात्यक्षिक उपस्थित विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांसमोर सादर केले.

याचवेळी विज्ञान शिक्षक प्रल्हाद दाभाडे व प्रवीण पाटील यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंपासून दर्जेदार  शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचा बहुद्देशीय वापर ह्याचे सादरीकरण केले.

याचवेळी भास्कर यांनीही स्पर्धा परीक्षा व त्यातील शॉर्टकट्स ह्या संदर्भात मार्गदर्शन केले.

दि. ३१ जाने. मंगळवारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या माळी, तर उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी ह. पि. तुम्मोड तर डायट प्राचार्य विजयकुमार शिंदे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, विज्ञान पर्यवेक्षक जगन मुंढे, गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वायाळ, अशोक पवार, डॉ. अभिलाष माळी, प्राचार्य रविंद्र पडघान आदि प्रमुख उपस्थितीत होते. उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. के. वाघ यांनी तर आभार प्रदर्शन डी. यु. हिवाळे ह्यांनी केले. 

दरम्यान येत्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विज्ञाननिष्ठ भूमिका घेणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे रणजीतसिंग राजपूत यांनी प्रदर्शनीत सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन जनकसिंग राजपूत, तर आभार प्रदर्शन निलेश चिंचोलकर ह्यांनी केले.

दोन दिवसीय प्रदर्शनाला गजानन पवार, गजानन धोंडगे, किशोर पवार, प्रवीण क्षीरसागर, दीपक नागरे ह्यांचासह सर्वच तालुक्यातील विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा