प्राथमिक शिक्षक पतसंस्था पदाधिकारी निवडणूक अविरोध
शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भानुदास लव्हाळे, उपाध्यक्षपदी शरद नागरे व सचिवपदी गंगाधर खरात यांची बिनविरोध निवड
सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित, सिंदखेडराजा र. नं. ७८८ च्या अध्यक्षपदी भानुदास लव्हाळे, उपाध्यक्षपदी शरद नागरे व सचिवपदी गंगाधर खरात यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ह्या शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवड अविरोध होण्याचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केले तरी फक्त तीन जागा अविरोध झाल्या, मात्र उर्वरित जागांवर शिक्षक नेत्यांना त्यात यश प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे दि. २६ फेब्रुवारी, रविवारी निवडणूक घेण्यात आली होती.
त्यामध्ये शिक्षक एकता पॅनेलने बारा जागांवर विजय मिळवत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते. त्यामध्ये शरद कचरू भोकरे, गैबीनंद एकनाथ घुगे, रमेश पुंजाजी जैवळ, भानुदास पुंडलिक लव्हाळे, अशोक संतोषराव नागरे, शरद बाबुराव नागरे, बाळ राजाराम पऱ्हाड, शेख तस्लीम अली मुश्ताक अली, नंदकिशोर दत्तात्रय शिंगणे, लिंबाजी म्हातारबा तायडे तर महिला राखीव गटातून वर्षा बाबुराव इघारे (जायभाये) व योगिता ब्रिजलाल राठोड यांचा समावेश होता. तर अविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अनुसूचित जाती गटातून सुभाष सखाराम गवई, विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून सुभाष झाबुसिंग पवार व इतर मागासवर्ग गटातून गंगाधर शंकरराव खरात ह्यांचा समावेश होता.
संचालक मंडळ निवडीनंतर संबंधित यंत्रणेकडून आज दि. १८ मार्च, शनिवारी पदाधिकारी पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात शिक्षक नेत्यांमधील विविध विचारांतून बैठका, चर्चा, संवाद आदि अनेक घडामोडी घडल्या. परंतु शेवटच्या क्षणी नंदकिशोर शिंगणे, अशोक नागरे, नंदकिशोर खरात, विनोद ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वानुमते अध्यक्षपदासाठी भानुदास लव्हाळे, उपाध्यक्ष शरद नागरे, तर सचिवपदासाठी गंगाधर खरात व कार्यकारी संचालक पदासाठी सुभाष पवार यांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर इतर कुणीही अर्ज दाखल केले नसल्याने अविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली.
दीसना तर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तसेच निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्नशील लोकशाही संरक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन ..!



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏