परप्रांतात स्वगृही पायदळी परतणाऱ्या तरुणांसाठी विनोद वाघ यांनी बसची केली व्यवस्था

परप्रांतात स्वगृही पायदळी परतणाऱ्या तरुणांसाठी विनोद वाघ यांनी बसची केली व्यवस्था



सिंदखेडराजा:- तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या २४ परप्रांतीय युवकांनी पायदळी निघत घर गाठण्याचा प्रयत्न काल दि. २४ मे, रविवारी केला होता. अवघे दोन कि. मी. अंतर पार करीत नाही तोच भाजपचे प्रदेश चिटणीस विनोद वाघ यांनी त्यांच्यासाठी जेवण व राहण्याची व्यवस्था करीत आज परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था केली.

मध्यप्रदेश येथील २४ तरुण नागपूर ते मुंबई ह्या प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या तालुक्यातील तढेगाव येथील केंद्रामार्फत सुरु असलेल्या कामावर रोजगार होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र असलेल्या लॉकडाऊन मध्येही हे काम सुरुच असल्याने, इच्छा असूनही घरी जाता येत नव्हते. अधून मधून जाण्याची इच्छा व्यक्त केली तर लॉकडाऊन लवकरच संपणार म्हणत ठेकेदाराची मंडळी युवकांना विरोध करायची. मात्र लॉकडाऊन चौथ्या टप्प्यावर पोहोचल्याने हे २४ युवक प्रचंड अगतिक झाले होते. काहीही करुन आता मध्यप्रदेशात स्वगृही निघायचे व पोहोचायचेच असा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी काल दि. २४ मे, रविवारी दुपारनंतर सर्व तयारी करुन हे युवक तढेगाव नजीकच्या समृद्धीच्या केंद्राला सोडून आपल्या मार्गाला लागले. तेथून दोन किमी अंतरावर हे युवक येत नाही तोच दुसरबीड येथील भाजपचे प्रदेश चिटणीस विनोद वाघ यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या युवकांची भेट घेऊन एस. टी. बसची व्यवस्था करण्याचे अभिवचन दिले. तेथूनच तालुका, जिल्हा ते राज्यपातळीवरच्या यंत्रणेतील विविध अधिकारी पदाधिकारी यांच्यासह मेहकर आगाराशी संपर्क साधून बसची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. याचवेळी ह्या २४ युवकांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी गजानन पिछोरे, शेख अख्तर, गणेश कोकाटे, नासेर शेख, शेख गफ्फार, शेख नौशाद, शेख भोलू, कृष्णा दराडे, अमजद शेख, कय्युम शेख, अलीम शेख, शेख शोएब आदिंनी परिश्रम घेतले. 
सततच्या पाठपुराव्यानंतर आज दुपारच्या वेळी एस. डी. शेजुळ व एल. सी. मोरे ह्या दोन चालकांसह एस. टी. बस उपलब्ध झाली. 
 २४ युवकांना घेऊन एस. टी. बस नागपूर नजीकच्या मध्यप्रदेश सीमेवरील चेकनाक्याकडे रवाना झाली.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

CRIME .. दोन अल्पवयीन मुलांचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; समाजमन अस्वस्थ तालुक्यातील धक्कादायक घटना, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल