आर्थिक विवंचनेतील शेतकरी अडचणीच्या काळात अनुदानापासून वंचित

प्रशासकीय अनास्थेपायी आर्थिक विवंचनेतील शेतकरी अडचणीच्या काळात अनुदानापासून वंचित

सिंदखेडराजा:- विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांची करोडो रुपयांची थकबाकी शासनाकडून येणे बाकी असल्याची परिस्थिती आहे. कोरोनाचे वातावरण तसेच खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाल्यास थोडाफार हातभार लागू शकते. मात्र प्रशासकीय स्तरावरील अनास्था ह्या सर्व प्रकाराला कारणीभूत असल्याने संबंधितांनी याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत तुषार तसेच ठिबक सिंचन आदि बाबींसाठी संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यात आले होते. यांत्रिकीकरण करण्यासाठी असलेल्या योजनेअंतर्गत रोटाव्हेटर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र याचाही तसेच सामूहिक शेततळे, शेडनेट शेती लाभ काही शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच पोक्रा योजनेतील अशी जवळपास सर्वच अनुदाने प्रलंबित आहेत.
याचवेळी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत मागील वर्षी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या रकमेतून संबंधित फळवर्गीय पिकांच्या कलमांची लागवड मागच्या वर्षी जून - जुलै २०१९ मध्ये केलेली आहे. तसेच त्यांना आवश्यक असलेली औषधी, खते, मजुरी व संगोपन यावर खर्च केला आहे. 
यासर्व बाबींतून तालुक्यातील शेतकऱ्यांचे करोडो रुपये शासनाकडे थकबाकी आहेत. यासंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अनेक शेतकऱ्यांनी विचारणा केली असता त्यांना गोलमटोल उत्तरे देत टोलवाटोलवी करीत पिटाळण्यात आलेले आहे.
मार्च - एप्रिल महिन्यात जर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असती तर खरीप हंगामाच्या खर्चाचा भार हलका झाला असता, शेतकऱ्यांची सर्व परिस्थिती माहीत असूनही संबंधित विभागाच्या जिल्हास्तरीय प्रशासकीय यंत्रणेतील काहीजणांची अनास्था यास कारणीभूत असल्याची चर्चा जोर धरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा