चार वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू

चार वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
मुलाला वाचवण्यासाठी आईने मारली होती विहिरीत उडी


सिंदखेडराजा:- तालुक्यातील दरेगाव येथे चार वर्षीय बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरेगाव येथील तेजस अनिल काळुसे हा चार वर्षीय मुलगा आपल्या आई अश्विनी सोबत गावाशेजारच्या परिसरातील शेतात गेला होता. आई थोडी बाजूला गेली असता तेजस हा खेळता खेळता विहिरीकडे गेला व त्या विहिरीत पडला. त्याचा आवाज ऐकून आई अश्विनीने त्याच्या पाठोपाठ विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने तेजसला वाचवू शकली नाही.  यासंदर्भात साखरखेर्डा ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुरतसिंग इंगळे, विशाल बनकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करीत, मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे रवाना केला आहे.
एकुलता एक मुलगा असलेल्या तेजसच्या मृत्यूमुळे दरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एकुलता एक मुलगा असलेल्या तेजसच्या मृत्यूमुळे दरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला