सामाजिक परिवर्तनास कोरोना ठरतोय कारणीभूत ..

सामाजिक परिवर्तनास कोरोना ठरतोय कारणीभूत ..

परंपरा आणि नाविन्याचा विवाहात साधला मेळ ..


सिंदखेडराजा:- सध्याच्या संचारबंदी काळात समाजातील विविध प्रसंग, उत्सव व सोहळ्यांची पद्धत बदलत चालली असून, अनेक व्यक्ती, कुटुंबे आदि ह्या परिवर्तनाला मोठ्या उत्साहात व खुबीने स्वीकारत असल्याचे सकारात्मक चित्र हळूहळू रुजत चालले आहे. याचा प्रत्यय आज दि. १७ मे, रविवारी एका शिक्षक तथा पत्रकाराच्या लग्नसमारंभात घडवून आणलेल्या पारंपरिक व नावीन्याचा मेळातून आढळून आला.
तालुक्यातील किनगावराजा येथील शिवाजी भिकाजी काळुसे यांचे शिक्षक तथा पत्रकार असलेले चिरंजीव गजानन यांचा विवाह जवळच असलेल्या सावखेड तेजन येथील विष्णू कडूबा बुधवत यांची कन्या सीमा हिच्यासोबत ठरला होता. फेब्रुवारी महिन्यात जुळलेल्या रेशीमगाठी ६ एप्रिल रोजी विवाह बंधनात रुपांतरीत करीत नवदाम्पत्य संसारसागरात उतरणार होते. मात्र मध्येच अचानक कोरोना विषाणू प्रसारातून होणाऱ्या कोविड १९ रोगाचे संकट अभावितपणे उभे राहिले. त्यामुळे संचारबंदी लागू झाली. संचारबंदी उठल्यावर विवाह सोहळा आयोजन करण्याचे ठरले. मात्र त्याचेही तीन टप्पे संपत येऊन चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार होती. मग काळुसे व बुधवत कुटुंबीयांनी १७ मे चा मुहूर्त ठरवीत मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह करण्याचे निश्चित केले.
त्यानुसार आज सकाळी काळुसे कुटुंबीय १५ वऱ्हाड्यांसह सावखेड तेजन येथे पोहोचले. सॅनिटायझर, मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आदिंचे काटेकोरपणे पालन करीत, अगदी कमी वेळात मंगलाष्टके, सप्तपदी आदि विधी पार पाडत लग्नसोहळा आटोपून दुपारी काळुसे कुटुंबीय वर गजानन व वधु सीमा सह स्वगृही परतले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विनोद वाघ, माजी आमदार तोताराम कायंदे, प्रभाकर ताठे, बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक नागरे, डॉ. शिवानंद जायभाये, राकाँ विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप मेहेत्रे, शहराध्यक्ष शेख यासीन, किनगावराजा ठाणेदार सोमनाथ पवार, श्रावण डोंगरे, छगन खंदारे, सरपंचपती संदीप नागरे, ग्रामसेवक गीते, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर मांटे, पी. टी. सानप, योगेश डोळे, बंडू मांटे, विलास मांटे यांच्यासह वर व वधूच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा