कुठलाही बडेजाव न करता साधेपणाने पार पडला सेवानिवृत्ती व पदभार कार्यक्रम असाही पाळला वर्क फ्रॉम होमचा आदेश
कुठलाही बडेजाव न करता साधेपणाने पार पडला सेवानिवृत्ती व पदभार कार्यक्रम असाही पाळला वर्क फ्रॉम होमचा आदेश
सिंदखेडराजा:- कोविड १९ महामारी संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पं. स. शिक्षण विभागातील सेवानिवृत्ती तसेच पदभाराचा कार्यक्रम आज दि. ३० एप्रिल, गुरुवारी दुपारनंतर कुठल्याही प्रकारच्या समारंभाचे आयोजन न करता, अत्यंत साधेपणाने पार पडला. विशेष म्हणजे कार्यक्रमाला तिघांचीच उपस्थिती होती.
गजानन दिनकर भौरकर हे प्राथमिक शिक्षक म्हणून चिखली व देऊळगावराजा तालुक्यात सेवा देत, सन १९९५ पासून तालुक्यातील शेंदूरजन येथे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. प्राथमिक शिक्षण विभागाच्या विविध प्रकारच्या कामांना त्यांनी योग्य न्याय दिला. दरम्यान मलकापूर पांग्रा येथील केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त प्रभारही त्यांच्याकडे आला होता. आज दि. ३० एप्रिल, गुरुवारी नियत वयोमानानुसार त्यांची सेवानिवृत्ती होती. त्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन अगोदरच सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येऊन, शेंदूरजन तसेच मलकापूर पांग्रा केंद्रप्रमुखपदी अनुक्रमे प्रदीप सीताराम पळसकर व माधव नारायणराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यामुळे पं. स. च्या शिक्षण विभागाने आज दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्ती व पदभार स्वीकारणे यासंदर्भात कार्यवाही करण्याचे पत्र २० एप्रिललाच दिले होते. त्याला अनुसरुन नवनियुक्त केंद्रप्रमुखांनी शासनाचे वर्क फ्रॉम होमचे आदेश मानत सेवानिवृत्ती झालेल्यांचा आदर राखत पदभार स्वीकारण्यासाठी सकाळीच गजानन भौरकर यांचे साखरखेर्डा येथील निवासस्थान गाठले. तेथे सर्व प्रक्रिया पूर्ण करीत दुपारनंतर पदभार स्वीकारला.
याचप्रमाणे तालुक्यातील सिंदी येथे मुख्याध्यापक मधुकर माणिकराव रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत जि. प. शाळेतील सहाय्यक शिक्षक रामेश्वर चिंधाजी गवई हे सुद्धा आज सेवानिवृत्त झाले आहेत.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏