कोरोनाला नष्ट करण्यासाठी रोजेदार चिमुकल्यांंची प्रार्थना

  • कोरोनाला नष्ट करण्यासाठी रोजेदार चिमुकल्यांची प्रार्थना



सिंदखेडराजा:- कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी दुसरबीड येथील अलफैज शकील कुरेशी (वय ८ वर्षे), मदीहा अशरफी समीर कुरेशी (१० वर्षे) व मुसेब शकील कुरेशी हे लहानगे इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्यातील रोजाचे उपवास ठेवत आहेत. यावेळी कोरोनाला हरविण्यासाठी आशीर्वाद मिळावेत या हेतूने घरातच नमाज अदा करीत आहेत. 

पवित्र रमजानचा महिना म्हटलं की प्रार्थना, पवित्र कार्यांचा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंतचा उत्सव साजरा होतांना दिसून येत असतो. एरव्ही मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी व उत्साह बहरत आनंददायी वातावरण निर्माण होत असल्याचे अनुभवयास मिळत असते. परंतु यंदा रमजानच्या महिन्यात कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आल्याने मशिदीत निरव शांतता आढळून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून रमजान महिना व रोजे हे एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात येत असल्याने रोजेदारांची चांगलीच कसोटी पाहणारे ठरत आहे. रोजाच्या उपवासात रोजेदार व्यक्तींना तब्बल १४-१५ तास अन्नपाण्यावाचून रहावे लागत असते. ऋतू कोणताही असला तरी मुस्लिम समाजातील छोटछोट्या बालक बलिकांपासून तर वयोवृद्ध व्यक्ती रोजाचे उपवास धरतात. 
दुसरबीड येथील अलफैज शकील कुरेशी, मदीहा समीर कुरेशी, मुसेब शकील कुरेशी या लहानग्यांनी घरातील जाणत्या व्यक्तींंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सोबत रोजे धरले आहेत. याचवेळी तळपत्या उन्हाचा सामना करत  कोरोनाला हरविण्यासाठी अल्लाहला साकडे घालत आहेत.                           
दुसरबीडसह सर्वत्र या लहानग्यांचे कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
आपकी दुआ कुबुल हो।🙏🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा; दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार, नातेसंबंधांच्या गणिताला नवा ट्विस्ट!

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या लग्नानंतर महिन्याभरातच काळाचा घाला