परप्रांतीय प्रवाश्यांना राज्य सीमेकडे घेऊन निघालेल्या बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

परप्रांतीय प्रवाश्यांना राज्य सीमेकडे घेऊन निघालेल्या बसला अपघात
सुदैवाने जीवितहानी नाही

सिंदखेडराजा:- कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथून परप्रांतीय प्रवाश्यांना छत्तीसगड राज्य सीमेवरील देवरी चेकपोस्टपर्यंत सोडवण्यासाठी जाणाऱ्या बसचा अपघात झाला. आज दि. २४ मे, रविवारी सकाळी ५ वा. च्या सुमारास मुंबई ते नागपूर राज्य महामार्गावर तालुक्यातील किनगावराजा नजीक घडलेल्या या घटनेदरम्यान चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी झाली नाही, तर फक्त तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रवाश्यांना मेहकर आगाराच्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीने परप्रांतीय नागरिकांना एस. टी. बसने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडविण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत काल दि. २३ मे, शनिवारी सकाळी ठाणे येथून २६ परप्रांतीय प्रवाश्यांना घेऊन नाशिक विभागातील पेठ आगाराची एस. टी. बस क्र. एम. एच. ४० - ५६५९ निघाली होती. दुपारी २.३० वा. नाशिक येथे आल्यावर चालकांची बदली होऊन नाशिक आगाराचे चालक बी. एम. थोरवे व केशव थोरात यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. आज दि. २४ मे, रविवारी सकाळी ४.३० वा. सुमारास किनगावराजा नजीक असतांना बसच्या मागच्या चाकाचा चेकनट निसटल्यामुळे बसने हेलकावे मारणे सुरु केले. त्यातच चाके निखळून बसपासून बाजूला गेली. त्याचवेळी चालकाचा बसवरील ताबा सुटत असतांना आपले कौशल्य पणाला लावले. त्यामुळे बस रस्त्यावरील बाभळीच्या झाडाला घासली व राज्य महामार्गावर आडवी उभी राहिली. यामुळे घडलेल्या अपघातात दोन ते तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. घाबरगुंडी उडविणाऱ्या या प्रसंगातही चालकांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानंतर मेहकर आगाराच्या बसची व्यवस्था करण्यात आली. जखमी प्रवाश्यांवर प्राथमिक उपचारानंतर सर्व २६ प्रवाश्यांना छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील देवरी चेकपोस्टकडे रवाना करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा