किनगावराजा येथे बाहेरुन येणाऱ्यांची नोंदणी केली बंद ; क्वारंटाईन व्यक्तींचा गावात बिनधास्त संचार ; पंचायत, आरोग्य, महसूल, पोलीस विभागांनी दखल घेण्याची गरज

किनगावराजा येथे बाहेरुन येणाऱ्यांची नोंदणी केली बंद

क्वारंटाईन व्यक्तींचा गावात बिनधास्त संचार

पंचायत, आरोग्य, महसूल, पोलीस विभागांनी दखल घेण्याची गरज





सिंदखेडराजा:- तालुक्यातील किनगावराजा येथे बाहेर गावावरुन आलेल्या लोकांची संख्या हजाराच्या घरात असून, ग्रामपंचायतद्वारे सुरुवातीला दोनशे एवढीच नोंदणी करण्यात येऊन पुढील नोंदणी बंद आली आहे. त्यातल्या त्यात होम क्वारंटाईन केलेल्या तसेच नव्याने बाहेरुन आलेल्या व्यक्ती गावात बिनधास्तपणे फिरत असल्याचे चित्र आहे. आलेल्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतकडून क्वारंटाईन केंद्राच्या जागेची व्यवस्थाही करण्यात आली नाही. यामुळे संबंधित ग्रामपंचायत, आरोग्य, पोलीस व महसूल आदि यंत्रणांनी लवकरात लवकर दखल घेत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
किनगावराजा येथून नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदि बाबींसाठी बाहेरगावी असलेल्या व्यक्तींची संख्या हजारोच्या घरात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आदि राज्यासह  मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, नाशिक, नागपूर, अकोला या मोठ्या शहरातून अनेक व्यक्ती टप्प्याटप्प्याने परतत आहेत. ग्रामपंचायतने परतणाऱ्यांची २०० व्यक्तींची सुरुवातीला नोंद केली. सद्यस्थितीत मात्र ही नोंदणी थांबविण्यात आली आहे. बाहेरुन आलेल्या ज्या व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांनी बाहेर फिरु नये असे अपेक्षित असतांनाही हे लोक गावात बिनधास्तपणे मुक्तसंचार करीत असल्याचे चित्र आहे. होम क्वारंटाईन व्यतिरिक्त आयसोलेट क्वारंटाईन करण्यासाठी तालुक्यात इतरत्र जागेची व्यवस्था करण्यात आली असतांनाही किनगावराजा येथे असे कोणतेही केंद्र निर्माण करण्यात आले नसल्याची परिस्थिती आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या लोकांसाठी फिजिकल डिस्टनसिंगच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायती कडून कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. यामुळे कुणाचा पायपोस कुणाला नसल्याच्या परिस्थितीतून किनगावराजा येथे गोंधळाची परिस्थिती असे बजबजपुरीचे चित्र निर्माण झाले आहे. म्हणूनच संबंधित ग्रामपंचायत, आरोग्य, पोलीस व महसूल आदि यंत्रणांनी लवकरात लवकर दखल घेत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.



ग्रामपंचायत प्रशासनाला जाणीव दिली आहे ..

बाहेरुन आलेल्या व्यक्तींची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये केली जाते. तसेच हातांवर होम क्वारंटाईनचे शिक्के मारत घरीच राहण्याच्या सुचनाही दिल्या जातात. होम क्वारंटाईन केलेल्या बऱ्याच व्यक्ती गावात फिरत असल्याची माहिती मिळाल्याने यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाशी आरोग्य विभागाने पत्रव्यवहारही केला आहे.

  डॉ. अनिल बोडखे 
  वैद्यकीय अधिकारी 
 प्राथमिक आरोग्य केंद्र,    
     किनगांवराजा


जिल्हा परिषद शाळा क्वारंटाईन केंद्रासाठी योग्य ..

किनगांवराजा जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये पाणी, लाईट, स्वच्छता या सोयीसह सर्व बाजुंनी संरक्षण भिंत तसेच समोरच्या बाजूने गेट असल्यामुळे क्वारंटाईन करण्यासाठी योग्य जागा आहे. त्यामुळे तेथे क्वारंटाईन केंद्र उभारावे.

  सौ. शीतल रामेश्वर काकड
   विद्यमान ग्रा. पं. सदस्य
               तथा
           माजी सरपंच
          किनगावराजा

गावात फवारणीही केली नाही ..

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बहुतांश गावात फवारणी केली गेली आहे. मात्र किनगावराजा येथे कोणत्याही प्रकारची फवारणी केली गेली नाही. तसेच गावात घाणीचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे. यामुळे वरिष्ठ पातळीवरुन दखल घेण्याची गरज आहे.

      गणेश काकड
   ग्रामपंचायत सदस्य
      किनगावराजा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा