अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार एक युवक ठार तर दुसरा गंभीर जखमी


सिंदखेडराजा:- अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई - नागपूर महामार्गावर तालुक्यातील दुसरबीड येथील राजहंस इंडेन गॅस एजन्सी नजीक सायंकाळी ६ वा. घडलेल्या या घटनेतील धडक देणारे वाहन फरार करण्यात आले आहे.
राहेरी येथील पान विक्रीचा व्यवसाय करणारा युवक विजय गजानन केवट, वय १९ वर्षे व संतोष नानाभाऊ डोंगरदिवे, वय १८ हे दोघेजण दुसरबीड येथून राहेरी येथे दुचाकीने परतत होते. त्यावेळी एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत गजानन केवट याचा जागीच मृत्यू झाला असून संतोष डोंगरदिवे हा गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडल्यावर अज्ञात वाहन घटनास्थळावरून निघून गेले. 
संतोष डोंगरदिवे यास उपचारार्थ जालना येथे हलविण्यात आले आहे.
घटनेनंतर किनगावराजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. वृत्त लिहीपर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा