दोन चिमुकल्यांंसह मातेचा मृतदेह विहिरीत आढळला

दोन चिमुकल्यांंसह मातेचा मृतदेह विहिरीत आढळला
दुसरबीड परिसरात एकच खळबळ




सिंदखेडराजा:- दोन चिमुकल्यांसह एका विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना आज सकाळी दुसरबीड येथे उघडकीस आली आहे. यामुळे तालुकाभरात एकच खळबळ उडाली आहे.
दुसरबीड येथील स्वाती अमोल जगदाळे वय २८ ही विवाहिता दि. १७ मे, रविवारी उत्तररात्री १ वा. च्या सुमारास ११ वर्षीय मुलगा गणेश व ९ वर्षीय मुलगी मयुरी ह्यांना शौचास नेते म्हणून घरातून बाहेर गेली होती. खूपवेळ होऊनही ती परतली नाही, म्हणून कुटुंबिय व इतरांनी रात्रभर तसेच काल दिवसभर तिघांचाही प्रत्यक्ष तसेच संपर्काद्वारे शोध घेतला. मात्र तिघेही आढळून आले नाहीत. 
आज दि. १९ मे, मंगळवारी सकाळी ६.३० वा. सुमारास दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 
यासंदर्भात माहिती कळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
पती अमोल भगवान जगदाळे ह्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा