कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने क्वारंटाईन व्यक्तीला बुलडाणा येथे हलविले
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने क्वारंटाईन व्यक्तीला बुलडाणा येथे हलविले
सिंदखेडराजा:- कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील वाघाळा येथे क्वारंटाईन असलेल्या कोरोना संशयित व्यक्तीची काल दि. २६ मे, मंगळवारी रात्री बुलडाणा येथे रवानगी करण्यात आली आहे.
तालुक्यातील मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या वाघाळा येथील एक व्यक्ती मुंबई येथून परतली होती. ह्या व्यक्तीला वाघाळा येथील सरपंच अंजली रामेश्वर सोनुने यांनी १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करीत जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था केली होती.
मात्र क्वारंटाईन असलेली ही बत्तीस वर्षीय व्यक्ती मुंबईवरुन परत येत असतांना भंडारा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली असल्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे पत्र काल दि. २६ मे, मंगळवारी दुपारी यंत्रणेला प्राप्त झाले.
त्यावरुन वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर चाटे, डॉ. भाग्यश्री गायकवाड, आरोग्य सहाय्यक विजय गोसावी, आरोग्यसेवक कारभारी वाकोडे, सरपंच अंजली रामेश्वर सोनुने, तलाठी पंकज देशमुख, ग्रामसेवक कल्पना राठोड, कोतवाल मदन वायाळ, बीट जमादार नारायण गीते व पो. कॉ. विशाल बनकर यांच्या साहाय्याने वाघाळा येथील ह्या संशयित बत्तीस वर्षीय व्यक्तीला काल दि. २६ मे, मंगळवारी रात्री ८ वा. सुमारास बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच मलकापूर पांग्रा येथील एक आठ वर्षीय बालिका कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे मुंबई येथील तपासणीत आढळून आले होते. मात्र बुलडाणा येथे हलविल्यानंतर घेण्यात आलेल्या चाचणीत ही बालिका स्वगृही परतली. त्यानंतर सुटकेचा श्वास घेत असतानाच नजीकच्या वाघाळा येथील व्यक्ती कोरोना संशयित आढळून आल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वाघाळा येथील ह्या संशयित व्यक्तीचा तपासणी अहवाल निगेटिव्ह यावा, असा आशावादही यावेळी व्यक्त होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏