विदेशातुन परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह..

💥 *_ब्रेंकिंग_*

*_विदेशातुन परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह.._*



_बुलडाणा_ गुरुवार, दि. २८ मे २०२०

_'वंदे मातरम्' मोहिमेअंतर्गत विदेशातून भारतीय मोठ्या प्रमाणात मायदेशी परत आणल्या जात आहेत, त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.. बुलडाणा येथील जे विद्यार्थी फिलिपाईन्सला मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेले होते, त्यांना हि परत आणल्या गेले असून 12 मे रोजी ते बुलढाण्यात आले आले. आल्यानंतर त्यांना बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये क्वारंटीनही ठेवण्यात आले होते. दरम्यान 14 दिवस पूर्ण झाल्याने ते घरी परतले. मात्र त्यानंतर आलेल्या स्वाब रिपोर्टमध्ये एका विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, तो विद्यार्थी धाड नाका परिसरात राहतो._
_त्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे क्वारंटीन पिरियड पूर्ण झाल्यानंतर इतक्या उशिरा रिपोर्ट येणे व व तत्पूर्वीच स्वाब घेतलेल्यांना मोकळे करणे, हे मात्र गुंतागुंतीचे वाटत असून याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप काहीही स्पष्टीकरण आलेले नाही._
_त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तो विद्यार्थी मोकळेपणाने फिरतही होता व दोन दिवसापूर्वी एका हेअर सलून मध्ये येऊन कटिंगही करून गेल्याचे कळते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोरच उभे ठाकले आहे !_

_त्या विद्यार्थ्यांचे वडील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात सर्व्हिसला असल्यामुळे, तेही आता हाय रिक्स मध्ये आले आहेत._

_नियोजन विभागात जायला जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसपुढूनच जावे लागते._
_त्यातल्या त्यात या दोन-तीन दिवसात प्रलंबित कामांच्या मंजुरीसाठी नियोजन विभागात येणाऱ्या- जाणाऱ्यांची संख्याही कमालीची वाढली होती._
  _साभार - दै. देशोन्नती_🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा