विहिरीत पडली नीलगाय, वनविभागाचे नियोजन नसल्याने एक दिवस विहिरीतच राहणार




सिंदखेडराजा:- तालुक्यातील सिंदी शिवारातील एका विहीरीत आज सकाळीच नीलगाय पडली असल्याचे आढळून आले आहे. मात्र संपूर्ण दिवस ओलांडून सायंकाळ होइपर्यंत नीलगायीच्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नसल्याची परिस्थिती आहे.
सिंदी येथील बद्री साहेबराव दहातोंडे यांचे गावापासून उत्तरेच्या दिशेला शेत आहे. या शेतामध्ये पिकांच्या सिंचनासाठी विहीर आहे. आज दि. १ मे, शुक्रवारी सकाळीच शेतातील विहिरीत नीलगाय पडल्याचे बद्री दहातोंडे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ह्याबाबत पोलीस पाटील वैशाली मदन हाडे यांना कळविले. पोलीस पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी विहिरीतील नीलगाय आक्रमक होऊ शकते म्हणून बाहेर काढण्याचा कुणीही प्रयत्न करु नये, आम्ही येत आहोत असे शेळके नामक कर्मचाऱ्यांकडून कळविण्यात आले. मात्र सायंकाळ होत असतांना विहिरीतून नीलगाय काढण्यासाठी दोरीचे फासे बनविणारा व्यक्ती अजून मिळाला नसल्याचे सांगण्यात येऊन उद्या दि. २ मे, शनिवारी सकाळी नीलगाय काढण्यात येईल असे सांगितले. 
त्यामुळे विहिरीत पडलेली नीलगाय दोन दिवस विहिरीतच राहणार असल्याने परिसरातील सर्वच शेतकऱ्याचा जीव टांगणीला लागला आहे.
वनविभागाच्या वरिष्ठांनी या नीलगायीला बाहेर संदर्भात व्यवस्थित नियोजन केले नसल्याने विविध स्वरुपाच्या शंकाकुशंकात्मक चर्चांना उत आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा