दुचाकी अपघातात जि .प. शिक्षक राहुल उर्फ आरपी गवई यांचा दुर्दैवी मृत्यू

दुचाकी अपघातात जि .प. शिक्षक राहुल उर्फ आरपी गवई यांचा दुर्दैवी मृत्यू


सिंदखेडराजा:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचा साखरखेर्डा येथे अपघात होऊन, चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दि. २१ मे, गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
साखरखेर्डा येथील राहुल प्रल्हाद गवई वय ४९ वर्षे हे चिखली येथून दुचाकीने घराकडे परतत होते. दुपारी २.०० च्या सुमारास साखरखेर्डा येथील लव्हाळा मार्गावरील स्व. भास्करराव शिंगणे महाविद्यालया समोर असलेल्या गतिरोधकावर त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने स्लिप होऊन अपघात घडला. या घटनेत त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबरदस्त मार लागला. त्याचवेळी साखरखेर्डा येथून चिखली येथे जाणाऱ्या एका खाजगी वाहनचालकाने जखमी अवस्थेतील राहुल गवई यांना आपल्या वाहनाने चिखली येथील खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान गवई यांच्या चिखली येथील नातेवाईकांना संदेश प्राप्त झाल्याने ते सुद्धा खाजगी दवाखान्यात उपस्थित झाले. मात्र डोक्याला असलेल्या माराच्या निदानासाठी सिटी स्कॅन करण्यापूर्वीच राहुल गवई यांची प्राणज्योत मावळली.
या घटनेमुळे सिंदखेडराजा तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आदि क्षेत्रात दुःखाची लहर पसरली जाऊन हळहळ व्यक्त होत आहे.
तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी संचालक असलेले व सध्या सिंदी येथील जि.प. शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले राहुल गवई हे आपल्या मृदू व मितभाषी स्वभावामुळे  शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद ..!🙏

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा