तालुका शिक्षक पतसंस्थेचा उपक्रम स्तुत्य - गटशिक्षणाधिकारी

"तालुका शिक्षक पतसंस्थेचा उपक्रम स्तुत्य - गटशिक्षणाधिकारी"

सेवानिवृत्त केंद्र प्रमुखांना घरपोच दिला धनादेश

सिंदखेडराजा:- तालुका जि. प. शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या केंद्र प्रमुखांना संस्थेतील त्यांचा शेअर घरपोच देण्याचा कार्यक्रम आज दि. ७ मे, गुरुवारी साखरखेर्डा येथे पार पडला.
पूर्वी जि. प. शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व १९९५ पासून शेंदूरजन तसेच काही काळ मलकापूर पांग्रा येथे केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असलेले गजानन भौरकर हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेत सदस्य असल्याने त्यांचे ७७ हजार रु. शेअर डिपॉझीट जमा होते. आज दि. ७ मे, गुरुवारी दुपारी गटशिक्षणाधिकारी व्ही. व्ही. गवई यांचे सोबत पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे, उपाध्यक्ष अशोक नागरे, सचिव छाया मनवर, संचालक व्ही. टी. जायभाये, टी. के. देशमुख, जगन शिंदे, व्यवस्थापक संतोष देशमुख आदिंनी गजानन भौरकर यांच्या घरी जाऊन त्यांचा व पत्नी रेखाताई यांचा सत्कार केला. तसेच पतसंस्थेत शेअर स्वरूपात जमा असलेल्या ७७ हजार रु. रकमेचा धनादेश भौरकर दाम्पत्याच्या स्वाधीन केला.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी व्ही. व्ही. गवई यांनी शिक्षक पतसंस्थेच्या घरपोच शेअर परत करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात नव्हेतर राज्यातही अशी सेवा पतसंस्था नसेल असेही प्रतिपादन केले. तर पतसंस्था अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे यांनी वेगाने होणाऱ्या परिवर्तनाच्या काळात पतसंस्थेच्या उपलब्ध साधनसामुग्रीतून अत्याधुनिक सेवा देण्याचा मानस व्यक्त केला. तर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गजानन भौरकर यांनी आपण सिंदखेडराजा तालुक्यात आल्यापासूनच पतसंस्थेचे सदस्य असल्याचे सांगितले. तसेच संचालक मंडळाने हाती घेतलेली घरपोच रक्कम देण्याच्या स्तुत्य उपक्रमाचा गौरव केला. कार्यक्रमाचे संचलन टी. के. देशमुख, प्रास्ताविक व्ही. टी. जायभाये तर आभार सचिव छाया मनवर यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा