पोस्ट्स

सेवानिवृत्तीबद्दल विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत भावपूर्ण निरोप

इमेज
  सेवानिवृत्तीबद्दल विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत भावपूर्ण निरोप सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत सेवानिवृत्त झाल्यामुळे भावपूर्ण निरोप देण्यात आला. आज दि. ३१ जुलै, शनिवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश ठोसरे तर सत्कारमूर्ती नाईक बबनराव सखाराम खिल्लारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता खिल्लारे यांच्यासह वसंत पाटील, बाबुराव साबळे प्रमुख उपस्थितीत होते. निरोप समारंभात प्रारंभी शाल, श्रीफळ, कपडे, साडीचोळी, चांदीची मूर्ती व भेटवस्तू देऊन बबनराव खिल्लारे व सुनीता खिल्लारे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना बबन खिल्लारे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सहकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्याचीच भूमिका ठेवली. त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने केलेल्या कार्यात खारीचा वाटा उचलता आला याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी रमेश ठोसरे, वसंत पाटील आदिंनी मनोगतातून बबनराव खिल्लारे यांनी कर्तव्याच्या वेळेच्या पलीकडे जाऊन दिलेल्या स...

मिस यु व्ही. टी. ... मानवतेचा पुजारी हरवलाय ...

इमेज
  मिस यु व्ही. टी. ... मानवतेचा पुजारी हरवलाय ...            दीसना✍️ एक सामाजिक प्रसंग होता. माझ्यासमोर व्हीटी होते. माझ्याकडून नवी नवी ओळख होती. बोलतांना दीपक दादा, दीपक दादा असा उच्चार सुरु होता. मी म्हटले की, तुम्ही मला दादा म्हणत जाऊ नका. तुम्ही इव्हाया जवायाचे माझ्यापेक्षा सिनिअर आहात. व्हीटींनी ताबडतोब प्रतिप्रश्न केला, तुमची रिटायरमेंट कधी? मी म्हणालो २०२४ तर, प्रत्त्युत्तरात ते म्हणाले माझी २०२६. मला काहीच बोलता येईना. त्यानंतर ह्या ना त्या कारणाने संबंध वाढत गेले. मी त्यांना माझे मामेकुळ म्हणायचो. कारण जागदरी व सावखेड तेजन येथे आमचे मामेकुळ व मामा म्हणजे जायभाये. त्यानंतर वेळोवेळी संपर्क येत गेल्याने संबंध दृढ होत गेले. काही महिन्यांपूर्वी आम्हा दोघांमध्ये लसावी, मसावीच्या स्वरुपात डॉ. शिंगणे आले. त्यामुळे शैक्षणिक, सामाजिक मैत्रीच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली. देऊळगावराजा पासून मैत्रीचे गणगोतच मोठ्ठे असल्याने मला नातेवाईक व नाती एवढी माहीत नाहीत. त्यामध्ये व्हीटींनी मला नात्यांची माहिती देऊन भर घातली. कुणाचेही काहीही काम असो, त्याने व्हीटीं...

कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कौतुक करावे तेवढे थोडेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जय्यत तयारी करणार नागरिकांनी काळजी घेण्याची गरज विकासकामांसाठी निधीची तरतूद करणार पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

इमेज
  कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कौतुक करावे तेवढे थोडेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जय्यत तयारी करणार  नागरिकांनी काळजी घेण्याची गरज विकासकामांसाठी निधीची तरतूद करणार  पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा:- वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या कोरोना संसर्गाची भीती आजही कायम आहे. पहिली लाट जाऊन दुसरी आली. ती नियंत्रणात येत असतांनाच तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाचे नियम व वैयक्तिक जीवनात त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन करीत आशासेविका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आदिंनी संसर्गाच्या कठीण काळात केलेल्या कार्याबद्दल करावे तेवढे कौतुक व सन्मान कमीच असल्याचे तसेच विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.   आज दि. २७ जून, रविवारी तालुक्यातील साखरखेर्डा येथे मानतकर परिवारातर्फे चिसौकां वैष्णवी राधिका गोपाल मानतकर व चि. अमोल पुष्पा विष्णू बोरे यांच्या विवाहपूर्व आयोजित "सत्कार कोरोना योद्ध्यांचा" ह्या "स्तुत्य" कार्यक्रमात डॉ. शिंगणे बोलत...

पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश राहेरी पुलाच्या पुनर्वसनासाठी नितीन गडकरी यांनी केला ९ कोटी ८५ लाख रु. निधी मंजूर

इमेज
  पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या पाठपुराव्याला यश राहेरी पुलाच्या पुनर्वसनासाठी नितीन गडकरी यांनी केला ९ कोटी ८५ लाख रु. निधी मंजूर सिंदखेडराजा (विशेष प्रतिनिधी) नागपूर ते मुंबई महामार्गावरील तालुक्यातील राहेरी नजीकच्या पुलाच्या पुनर्वसनासाठी स्थानिक आमदार तथा पालकमंत्री यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय सडक परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाच्या पुनर्वसनासाठी ९ कोटी ८५ लाख रु. निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात नितीन गडकरी यांनी डॉ. शिंगणे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहेरी पूल नादुरुस्त असल्याने त्याचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे तसेच जड वाहतूक बंद करण्यात आल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आपणाला कळविण्यात आनंद होतो की, आपल्या मतदारसंघातील ह्या पुलाच्या पुनर्वसनासाठी तसेच  वळण मार्ग तयार करण्यासाठी ९ कोटी ८५ लाख रु. मंजूर करण्यात येत आहेत. याचवेळी बुलडाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी भूमी अधिग्रहण तसेच इतर बाबींसाठी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्य...

आज ३ मे, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन

इमेज
  आज ३ मे, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जगभरात दरवर्षी ३ मे ह्या दिवशी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन (World Press Freedom Day) साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसाची संकल्पना वेगवेगळी असते. संयुक्त राष्ट्र संघाने ३ मे हा दिवस World Press Freedom Day म्हणून साजरा केला जावा असे जाहीर केले. तेव्हापासून गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा केला जातो. पत्रकारिता, पत्रकारितेचे महत्त्व आणि त्याबाबतची जनमानसात जागृकता निर्माण करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. तसेच, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे याबाबत जगभरातील देशांतील प्रत्येक सरकारला आठवण करुन देणे हा प्रमुख उद्देश हा दिवस साजार करण्यामागे आहे. प्रसारमाध्यमांचे स्वतंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकारने पत्रकारांना संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. सरकारला त्याबाबतची जाणीव करुन देणे हे हा दिवस साजरा करण्याचे प्रमुख उद्दीष्ट आहे. डिक्लेरेशन ऑफ विंडहोक संपूर्ण जगामध्ये १९९१ मध्ये पहिल्यांदा अफ्रीका देशातील पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली. त्यांनी ३ मे हा दि...

संडे हो या मंडे तपासून खावे अंडे .. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नकली प्लास्टिक अंडे विक्रीचा फंडा जोमात

इमेज
  संडे हो या मंडे तपासून खावे अंडे .. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नकली प्लास्टिक अंडे विक्रीचा फंडा जोमात सिंदखेडराजा:- तालुक्यातील खेड्यापाड्यात नकली प्लास्टिक अंडी विक्रीचे रॅकेट सुरु असल्याची खात्रीशीर प्राप्त झाली आहे. एका गावात हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खळबळ माजली असून प्रशासनाने ह्याकडे तातडीने लक्ष देत यावर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ह्या उक्तीनुसार  तालुकाभरात एरव्ही हिवाळ्यात अंडी खाण्यावर जोर असतो. मात्र गेल्यावर्षी पासून कोरोना संसर्ग प्रसार सुरु झाल्यानंतर मांसाहार व अंडी खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यातही खर्चाच्या व उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून अंडी सोयीची असल्याने, सर्वसामान्यांचा जोर अंड्यावर जास्त आहे. परंतु, गावातच कोंबडी पालन करणाऱ्यांकडे नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या अंड्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे, ग्राहकांना दुकानात उपलब्ध असलेली अंडी खरेदी करावी लागतात. बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करुन गावागावातील किराणा दुकानदार विक्रीसाठी अंडी ठेवत असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंडी...

साखरखेर्डा परिसर ठरत आहे कोरोना हॉटस्पॉट १२८ व्यक्ती आढळल्या कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
  साखरखेर्डा परिसर ठरत आहे कोरोना हॉटस्पॉट १२८ व्यक्ती आढळल्या कोरोना पॉझिटिव्ह सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा व परिसरात असलेल्या गावांमधील व्यक्तींच्या गेल्या पाच दिवसांत केलेल्या कोरोना चाचण्यांपैकी १२८ व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. त्यामुळे साखरखेर्डा परिसर हॉटस्पॉट ठरत आहे. तर याचवेळी संचारबंदी असतांनाही ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा शिरकाव तसेच संचारबंदी संदर्भात नुसता मीडियावर कोरडा गवगवा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष कार्यातील फोलपणा ठळकपणे अधोरेखित झाला आहे. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत इच्छुकांच्या कोरोना चाचण्या नित्याने घेण्यात येत असतात. गेल्या पाच दिवसांत साखरखेर्डा व परिसरातील गावांतील जनतेच्या कोरोना  करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी ११२ व्यक्तींच्या आरटीपीसीआर तर १६ रॅपिड अशा एकूण १२८ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये साखरखेर्डा येथील ६० च्या वर तर सायाळा येथील २४ व्यक्ती व उर्वरित पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये शेंदूरजन, दरेगाव, गुंज, सिंदी, सवडद, बाळसमुद्र, तांदुळवाडी येथील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अध...

आज दिसणार .. सुपर पिंक मून म्हणजेच उत्कृष्ट गुलाबी चंद्र ..!

इमेज
  आज दिसणार .. सुपर पिंक मून      म्हणजेच उत्कृष्ट गुलाबी चंद्र ..!      दी.स.ना.✍️ एप्रिल महिन्यात जी पौर्णिमा येते त्या रात्रीच्या चंद्राला सुपर पिंक मून म्हणण्याची अमेरिकेतील परंपरा आहे. याला स्प्राऊटिंग ग्रास मून, एग मून, पासकल मून आणि फिश मून आदि नावांनीही संबोधतात, म्हणूनच ह्या पौर्णिमेला चंद्र प्रत्यक्षात पिंक म्हणजे गुलाबी, किंवा मासोळी इ. सारखा अंड्यासारखा दिसेल असे काही नसते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र हा पृथ्वी भोवती नित्य परिभ्रमण करतो. त्याची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे चंद्र व पृथ्वी यामधील अंतर स्थळनिहाय कमी - जास्त होत असते. एप्रिल महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर खूप कमी म्हणजेच ३ लाख ८४ हजार ४०३ किलोमीटर ऐवजी ३ लाख ५६ हजार ९०७ किलोमीटर २७ हजार ४९६ किलोमीटरने कमी होते. यामुळे चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने तुलनेने अधिक मोठा व स्पष्टपणे दिसत असल्याने त्याचे सौंदर्य खुलल्याचे आढळून येते. ही पूर्णपणे खगोलीय घटना असल्याने शुभ - अशुभ, शकुन - अपशकुन इत्यादि मानू नये. 🙏

दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार ..शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या परिक्षेसंदर्भात नवीन सूचना ...★ यंदा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शाळाच असणार परीक्षा केंद्र

इमेज
दहावी बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार .. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या परिक्षेसंदर्भात नवीन सूचना ... ★ यंदा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची शाळाच असणार परीक्षा केंद्र दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार असल्याची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावा असा प्रश्न होता. याविषयी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात शंका उपस्थित होत होत्या. दरम्यान आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी पालक व विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे असे वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल व 21 मे 2021 ...

महसूल उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात एक लाख रुपयांची केली होती मागणी

इमेज
महसूल उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात एक लाख रुपयांची केली होती मागणी सिंदखेडराजा:- येथील महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनाला पन्नास हजार रुपयाची लाच घेताना, कार्यालय आवारातच रंगेहात पकडण्यात आले आहे. यामुळे महसूल विभाग व संबंधित यंत्रणेत खळबळ उडाली आहे.  तक्रारकर्ता हा बुलडाणा येथील ३६ वर्षे पुरुष असून  प्रचार व प्रसिद्धीसाठीचा कंत्राटदार आहे. त्यांची लाखो रुपयांची देयके/बिल अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ह्या देयकांच्या संदर्भात वरिष्ठांना प्रस्ताव सादर करुन संबधित बिल काढून देण्यासाठी अव्वल कारकून दीपक गोरे याने लाचेपायी एक लाख रुपयांची मागणी तक्रारदार व्यक्तीकडे केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा, कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचखोर अव्वल कारकुनास रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. लाच प्रत्येकी ५० हजार रुपये अशी दोन टप्प्यात मागण्यात आली होती. त्यानुसार आज दि. ३ मार्च, बुधवारी पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याने लाचलुचपत...

💥 सावधान .. आता आपल्याला सुरु होतील भ्रमणध्वनी कॉल्स ..

इमेज
  💥 सावधान .. आता आपल्याला सुरु होतील भ्रमणध्वनी कॉल्स .. मित्रांनो, जेंव्हा सुख, दुःख व त्यातून निर्माण होणाऱ्या काही तातडीच्या  गरजांचा प्रसंग येतो. त्यावेळी कोठून का होईना आपली गरज भागली पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. ह्याच गरजेतून निर्माण झालेल्या अगतिकतेच्या प्रसंगाचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक जण टपून बसलेले असतात. असाच प्रसंग पुढे येतोय तो म्हणजे कोरोना विषाणूची लस. त्याची गरज प्रत्येकाला आहे. त्यातल्या त्यात ही लस सर्वात अगोदर आपल्यालाच मिळावी, असा प्रत्येकाचा अट्टाहास असणार आहे. याचाच फायदा घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक भामटे टपून बसलेले असू शकतात. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करा. अशा प्रकारचा कॉल आपल्याला येऊ शकतो. त्यात आपला आधारकार्ड नंबर मागितल्या जाईल. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, असे सांगितल्या जाईल. त्या नंतर ते भामटे पुन्हा कॉल करीत आपल्याकडून ओटीपी घेतील. एवढी प्रक्रिया पूर्ण झाली की दुसऱ्या बाजूला आपल्या खात्यातील रक्कम काढून घेऊन आपली फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे वेळीच सावध व्हा, व हा मेसेज आपल्या निकटवर्तीयांना फॉरवर्ड करा. जेणेकरुन आपल्या सोबत आप...

वाढदिवस पत्रकारितेतील एका मोकळ्या ढाकळ्या स्वच्छंद व्यक्तिमत्वाचा ... आज संकल्प करु या व सामील होऊ या निखळ नितळ प्रवासात

इमेज
  वाढदिवस पत्रकारितेतील एका मोकळ्या ढाकळ्या स्वच्छंद व्यक्तिमत्वाचा .. आज संकल्प करु या व सामील होऊ या निखळ नितळ प्रवासात .... सिंदखेडराजा:- वाढदिवस म्हटलं की, जगण्याचा काळ एक वर्षाने कमी होतोय याची जाणीव देणारा दिवस असतो. मात्र त्यालाही काही ना काही निमित्त लावत विविध प्रकारचे कार्यक्रम राबवून सकारात्मक दृष्टिकोन देणारी परंपरा मानवाने जोपासली आहे. आज दि. २३ डिसेंबर, बुधवारी असाच एक आगळा वेगळा वाढदिवस केवळ राज्यच नव्हेतर राष्ट्रव्यापी स्वरूपात समाज माध्यमावर साजरा करण्यात आला. ज्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, ती व्यक्ती म्हणजे पत्रकारितेत राब राब राबून नंतर ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ह्या राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेची उभारणी करणारे साधी राहणी व उच्च विचारसरणीचे जिवंत उदाहरण असलेले यासिन पटेल. त्यांचं जीवन कोकणात पत्रकारिता करण्यात व त्यानंतर संघटनेची उभारणी करण्यात, त्यासाठी अजूनही कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला सामोरे जाण्याची ह्या व्यक्तीची तयारी दिसून येते. आपल्या प्रेमळ स्वभावाने, संघटन कौशल्याने माणसे जोडणाऱ्या ह्या अवलियाने आपला सर्व चांगुलपणा पणाला लावला. परंतु त्या...

शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी संवेदनशील राहींची प्रसंगाशी भावलेली तद्रूपता ..

इमेज
शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी संवेदनशील राहींची प्रसंगाशी भावलेली तद्रूपता ..                          दीसना ✍️ सिंदखेडराजा:- सिंदखेडराजा:- काश्मीर मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असतांना दि. १५ डिसेंबर रोजी हिमकडा कोसळून शहीद झालेल्या प्रदीप साहेबराव मांदळे ह्या वीर जवानाच्या पार्थिवावर रविवार दि. २० डिसेंबरला तालुक्यातील पळसखेड चक्का ह्या त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी निर्माण झालेल्या कारुण्य व वीर रसाच्या संमिश्र तसेच वेगळ्याच भावनाप्रधान वातावरणात आपल्या निवेदन शैलीतून प्रख्यात साहित्यिक व संवेदनशील कवी असलेल्या अजीम नवाज राही यांनी उपस्थितांना वेगळ्याच अशा गंभीर व वीरतेच्या विश्वात नेले. आपल्या जीवनात अगदी जगण्याच्या भ्रांतीपासून तर आज स्थिरस्थावर होण्यापर्यंत अजीम नवाज राही ह्यांनी हसत हसत प्रत्येक प्रसंगात संघर्षाचा अनुभव घेतलेला असल्याचे त्यांना जवळून ओळखणारे जाणून आहेत. हे सर्व होत एक एक टप्पा मागे पडत असतांनाही प्रत्येकवेळी त्यांच्यातला साहित्यिक जागरूक राहिला. त्यात...

शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थितांनी अनुभवले डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांचे पालकत्व

इमेज
  शहीद प्रदीप मांदळे ह्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थितांनी अनुभवले डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांचे पालकत्व सिंदखेडराजा:- काश्मीर मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असतांना दि. १५ डिसेंबर रोजी हिमकडा कोसळून शहीद झालेल्या प्रदीप साहेबराव मांदळे ह्या वीर जवानाच्या पार्थिवावर रविवार दि. २० डिसेंबरला तालुक्यातील पळसखेड चक्का ह्या त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी निर्माण झालेल्या कारुण्य व वीर रसाच्या वेगळ्याच भावनाप्रधान वातावरणात जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे ह्यांनी मांदळे कुटुंबीयांचे सांत्वन करण्याची पालकत्वाची भूमिका अनेकांच्या मनात वेगळेच चित्र निर्माण करुन गेली. प्रदीप मांदळे ह्यांचे पार्थिव पळसखेड येथील अंत्यसंस्कार स्थळी पोहोचल्यावर पत्नी कांचन, मुलगा जयदीप, वय ५ वर्षे, सार्थक, वय २ वर्षे, आई शिवनंदा, कृषी सहाय्यक असलेला भाऊ संदीप व दुसरा भाऊ विशाल आदि मांदळे कुटुंबीय विरहाच्या वेदनेने व्याकुळ झाले होते. त्याचवेळी तेथे लष्कर, पोलीस, महसूल, पत्रकारिता, सामाजिक आदि क्षेत्रातील मंडळी आपापल्या कामात होती. त्याचवेळी शहीद प्रदीप मांदळे ह्यां...

कुठल्याही प्रकारची आमिषे व दबावाला बळी न पडता शिक्षक घेणार स्वतंत्र निर्णय राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धेत नसल्याचे चित्र

इमेज
 कुठल्याही प्रकारची आमिषे व दबावाला बळी न पडता शिक्षक घेणार स्वतंत्र निर्णय राजकीय पक्षांचे उमेदवार स्पर्धेत नसल्याचे चित्र       अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ                         वृत्तविश्लेषण                 ✍️दीसना✍️ सिंदखेडराजा:- अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १ डिसेंबर, मंगळवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वी विविध माध्यमातून संपर्क साधणारे उमेदवार तसेच त्यांचे समर्थक आदि सर्वांनाच मतदार शिक्षक तेवढ्याच आत्मीयतेने प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमका कोण उमेदवार यशस्वी होईल? ह्याची शास्वती सध्या तरी नाही. मात्र मतदार शिक्षकांच्या चर्चेतून राजकीय पक्षांनी दिलेले (लादलेले) उमेदवार सोडून अपक्ष उमेदवारातच प्रमुख लढत रंगणार असल्याची चिन्हे सध्यातरी दिसत आहेत. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पडघमावर वर्षभरापूर्वी पासूनच टिपरी पडली आहे. तेंव्हापासून इच्छुक उमेदवार तयारील...

माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूशी दिली यशस्वी झुंज कोविड १९ ला नामोहरम करत दोन दिवसांत घरी परतणार

इमेज
माजी आमदार तोताराम कायंदे यांनी कोरोना विषाणूशी दिली यशस्वी झुंज कोविड १९ ला नामोहरम करत दोन दिवसांत घरी परतणार   सिंदखेडराजा:- उतरत्या वयातही मन तसेच शरीर खंबीर ठेवले. योग्य प्रकारचा वैद्यकीय सल्ला, उपचार घेतले. त्याला अनुसरुन वैयक्तिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद दिला. यातून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे सलग दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार तोताराम कायंदे कोरोना विषाणूला नामोहरम करीत कोविड १९ रोगातून मुक्त होत येत्या दोन दिवसांत घरी परतणार असल्याची खात्रीशीर माहिती कायंदे कुटुंबियांकडून प्राप्त झाली आहे. तोताराम कायंदे यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. त्यात सातत्य ठेवणासाठी वेळोवेळी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना वेळोवेळी भेटी देण्यात कायंदे मतदारसंघात मोजक्या राजकारण्यांपैकी एक आहेत. वयाच्या पंचाहत्तरीत टवटवीत राहून अथक परिश्रम घेत संपर्कात राहण्याचे त्यांचे कार्य नवयुवकाला लाजविण्याजोगे आहे. गेल्या मार्च पासून कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी असतांना, इतर काही राजकारणी फक्त मोबाईल व सोशल मीडियावर संपर्क ठेवत असतांना, कायंदे यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात धा...
इमेज
 काटे कुटुंबीयांवर काळाचा तिसरा घाला हृदयविकाराच्या धक्क्याने एकनाथ काटे यांचे आज निधन  सर्वत्र व्यक्त होतेय हळहळ सिंदखेडराजा:- पांग्री येथील काटे कुटुंबातील एकनाथ भिवसन काटे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षे होते. एका महिन्याच्या कालावधीत काटे कुटुंबातील तिसऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.  काटे कुटुंबातील वयोवृद्ध श्रीमती द्वारकाबाई भिवसन काटे यांचे दि. १८ सप्टेंबर, शुक्रवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर परवा दि. १२ ऑक्टोबर, सोमवारी सायंकाळी हरिश्चंद्र साहेबराव काटे यांचे कोविड १९ आजाराने औरंगाबाद येथील इस्पितळात निधन झाले. मृत्यूसमयी ते ४२ वर्षांचे होते. काल दि. १३ ऑक्टोबर, मंगळवारी सकाळी औरंगाबाद येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर काटे कुटुंबीय साखरखेर्डा येथे परतले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी रक्षाविसर्जन तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्दबातल केले होते. तसेच भेटीसाठी येण्याऐवजी आहात तेथूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहनही केले होते. त्यानंतर आज दि. १४ ऑ...

साखरखेर्डा येथे पुन्हा तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
साखरखेर्डा येथे पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या, आता संख्या पोहोचली आठ वर .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथे काल दि. ३० जुलै, गुरुवारी पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आज दि. ३१ जुलै, शुक्रवारी पुन्हा तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. त्यातून साखरखेर्डा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण आठ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी ही समस्या गंभीरपणे हाताळत, अंतर्मुख होऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.  साखरखेर्डा येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच्या परिस्थितीत ज्या गांभीर्याने कोरोना विषाणू प्रसाराची दखल घेतली होती. त्यात कुठेतरी हलगर्जीपणा आल्याचे आढळून येत आहे. यातूनच गावात तसेच कुटुंबांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती दुर्लक्षित होत गेल्या. ह्या हलगर्जीपणातूनच कोरोना विषाणू प्रसाराला वाव मिळाला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. काल दि. ३० जुलै, गुरुवारी बसस्थानक परिसरातील दोन तसेच गावाच्या अंतर्गत भागातील तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर आता विविध क्षेत्रातील व्यक्ती कामाशिवाय बाहेर पडणार नाहीत अशी अपेक्षा...

पांडुरंग सुरळकर गुरुजींचे निधन

इमेज
निधन वार्ता .. पांडुरंग सुरळकर गुरुजी सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील पांडुरंग बंडूजी सुरळकर, गुरुजी यांचे आज  दि. ३१ जुलै, शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. सुरळकर गुरुजी हे मोडी लिपीचे जाणकार होते. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथील विवेकानंद आश्रमचे संस्थापक स्व. स्वामी शुकदास महाराज ह्यांना इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षणाचे धडे दिले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवे, पतवंडे असा बराच मोठा मित्र परिवार आहे. साधी राहणी व उच्च विचारसरणीचा जुना जाणता शिक्षकाच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. आपण नोंद घेऊन, संबंधितांना कळवावे. भावपूर्ण श्रद्धांजली ...!           🌹🙏

गारखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

इमेज
गारखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  सिंदखेडराजाः- जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली तालुक्यातील गारखेड येथील एक व्यक्ती दि. २ जुलै, गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. दि. ३ जुलै, शुक्रवारी त्याच्या संपर्कातील १७ व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सदानंद बनसोड यांनी दिली आहे. यामध्ये गारखेड येथील तीन व्यक्ती तर वर्दडी येथील एक व्यक्ती असल्याचेही डॉ. सदानंद बनसोड यांनी सांगितले आहे. हे वृत्त येताच तालुक्यात खळबळ उडाली असून, विविध प्रकारच्या शंकात्मक चर्चांना पेव फुटले आहे.

विदेशातुन परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह..

इमेज
💥 * _ ब्रेंकिंग _ * * _ विदेशातुन परतलेल्या एका विद्यार्थ्याचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह.. _ * _ बुलडाणा _ गुरुवार, दि. २८ मे २०२० _ 'वंदे मातरम्' मोहिमेअंतर्गत विदेशातून भारतीय मोठ्या प्रमाणात मायदेशी परत आणल्या जात आहेत, त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.. बुलडाणा येथील जे विद्यार्थी फिलिपाईन्सला मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेले होते, त्यांना हि परत आणल्या गेले असून 12 मे रोजी ते बुलढाण्यात आले आले. आल्यानंतर त्यांना बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये क्वारंटीनही ठेवण्यात आले होते. दरम्यान 14 दिवस पूर्ण झाल्याने ते घरी परतले. मात्र त्यानंतर आलेल्या स्वाब रिपोर्टमध्ये एका विद्यार्थ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, तो विद्यार्थी धाड नाका परिसरात राहतो. _ _ त्या विद्यार्थ्याचा रिपोर्ट रात्री उशिरा प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, विशेष म्हणजे क्वारंटीन पिरियड पूर्ण झाल्यानंतर इतक्या उशिरा रिपोर्ट येणे व व तत्पूर्वीच स्वाब घेतलेल्यांना मोकळे करणे, हे मात्र गुंतागुंतीचे वाटत असून याबाबत आरोग्य विभागाकडून अद्याप काहीही स्पष्टीकरण आलेले नाही. _ _ त्...

किनगावराजा येथे बाहेरुन येणाऱ्यांची नोंदणी केली बंद ; क्वारंटाईन व्यक्तींचा गावात बिनधास्त संचार ; पंचायत, आरोग्य, महसूल, पोलीस विभागांनी दखल घेण्याची गरज

इमेज
किनगावराजा येथे बाहेरुन येणाऱ्यांची नोंदणी केली बंद क्वारंटाईन व्यक्तींचा गावात बिनधास्त संचार पंचायत, आरोग्य, महसूल, पोलीस विभागांनी दखल घेण्याची गरज सिंदखेडराजा:- तालुक्यातील किनगावराजा येथे बाहेर गावावरुन आलेल्या लोकांची संख्या हजाराच्या घरात असून, ग्रामपंचायतद्वारे सुरुवातीला दोनशे एवढीच नोंदणी करण्यात येऊन पुढील नोंदणी बंद आली आहे. त्यातल्या त्यात होम क्वारंटाईन केलेल्या तसेच नव्याने बाहेरुन आलेल्या व्यक्ती गावात बिनधास्तपणे फिरत असल्याचे चित्र आहे. आलेल्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतकडून क्वारंटाईन केंद्राच्या जागेची व्यवस्थाही करण्यात आली नाही. यामुळे संबंधित ग्रामपंचायत, आरोग्य, पोलीस व महसूल आदि यंत्रणांनी लवकरात लवकर दखल घेत कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. किनगावराजा येथून नोकरी, व्यवसाय, शिक्षण आदि बाबींसाठी बाहेरगावी असलेल्या व्यक्तींची संख्या हजारोच्या घरात आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आदि राज्यासह  मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, नाशिक, नागपूर, अकोला या मोठ्या शहरातून अनेक व्यक्ती टप्प्याटप्प्याने परतत आहेत. ग्रामपंचायतने परतण...

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने क्वारंटाईन व्यक्तीला बुलडाणा येथे हलविले

इमेज
कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने क्वारंटाईन व्यक्तीला बुलडाणा येथे हलविले सिंदखेडराजा:- कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाल्याने तालुक्यातील  वाघाळा येथे क्वारंटाईन असलेल्या कोरोना संशयित व्यक्तीची काल दि. २६ मे, मंगळवारी रात्री बुलडाणा येथे रवानगी करण्यात आली आहे. तालुक्यातील मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या वाघाळा येथील एक व्यक्ती मुंबई येथून परतली होती. ह्या व्यक्तीला वाघाळा येथील सरपंच अंजली रामेश्वर सोनुने यांनी १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करीत जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्याची व्यवस्था केली होती.  मात्र क्वारंटाईन असलेली ही बत्तीस वर्षीय व्यक्ती मुंबईवरुन परत येत असतांना भंडारा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आली असल्याचे भंडारा जिल्हाधिकारी यांचे पत्र काल दि. २६ मे, मंगळवारी दुपारी यंत्रणेला प्राप्त झाले. त्यावरुन वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर चाटे, डॉ. भाग्यश्री गायकवाड, आरोग्य सहाय्यक विजय गोसावी, आरोग्यसेवक कारभारी वाकोडे, सरपंच अंजली रामेश्वर सोनुने, तलाठी पंकज देशमुख, ग्रामसेवक ...

परप्रांतात स्वगृही पायदळी परतणाऱ्या तरुणांसाठी विनोद वाघ यांनी बसची केली व्यवस्था

इमेज
परप्रांतात स्वगृही पायदळी परतणाऱ्या तरुणांसाठी विनोद वाघ यांनी बसची केली व्यवस्था सिंदखेडराजा:- तालुक्यात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेल्या २४ परप्रांतीय युवकांनी पायदळी निघत घर गाठण्याचा प्रयत्न काल दि. २४ मे, रविवारी केला होता. अवघे दोन कि. मी. अंतर पार करीत नाही तोच भाजपचे प्रदेश चिटणीस विनोद वाघ यांनी त्यांच्यासाठी जेवण व राहण्याची व्यवस्था करीत आज परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था केली. मध्यप्रदेश येथील २४ तरुण नागपूर ते मुंबई ह्या प्रस्तावित समृद्धी महामार्गाच्या तालुक्यातील तढेगाव येथील केंद्रामार्फत सुरु असलेल्या कामावर रोजगार होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र असलेल्या लॉकडाऊन मध्येही हे काम सुरुच असल्याने, इच्छा असूनही घरी जाता येत नव्हते. अधून मधून जाण्याची इच्छा व्यक्त केली तर लॉकडाऊन लवकरच संपणार म्हणत ठेकेदाराची मंडळी युवकांना विरोध करायची. मात्र लॉकडाऊन चौथ्या टप्प्यावर पोहोचल्याने हे २४ युवक प्रचंड अगतिक झाले होते. काहीही करुन आता मध्यप्रदेशात स्वगृही निघायचे व पोहोचायचेच असा निश्चय त्यांनी केला. त्यासाठी काल दि. २४ मे, रविवारी दुपार...

तहानेने व्याकुळ बैलांना कुमारवयीन युवकाने पाजले पाणी ..

इमेज
तहानेने व्याकुळ बैलांना कुमारवयीन युवकाने पाजले पाणी .. जावे त्यांंच्या वंशा तेंव्हा कळे .. उक्तीचा आला प्रत्यय .. सिंदखेडराजा:- खरिपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. याचवेळी बी - बियाणे, खतांच्या बेगमीसाठी तहानभूक विसरून शेतकरी खरेदीची लगबगही करु लागला आहे. अशाच एका प्रसंगात तालुक्यातील दुसरबीड येथे बैलगाडी सोडून तिथेच बैलांना बांधत मालक कामासाठी गेला असतांना त्याच्या व्याकुळ बैलांना एका कुमारवयीन युवकाने पाणी पाजल्याची घटना लक्षवेधी ठरली आहे. मुंबई ते नागपूर राज्य महामार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड या गावाला अनेक खेडी जोडलेली असल्याने तसेच काही वर्षांपूर्वीपर्यंत सुरु असलेल्या सहकारी साखरकारखान्यामुळे बाजारपेठेचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. त्यामुळे परिसरातील गावांतील ग्राहकांची रेलचेल येथे नेहमी आढळून येते. सध्या कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर येथील वर्दळ कमी झालेली असली तरीही महत्वाच्या कामासाठी परिसरातील ग्रामस्थांना येथे यावेच लागते. आज दि. २५ मे, सोमवारी १० वा. च्या सुमारास परिसरातील एक शेतकरी आपली बैलगाडी घेऊन खते व बी - बियाणे खरेदीसाठी दुसरबीडला आ...