साखरखेर्डा येथे पुन्हा तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह



साखरखेर्डा येथे पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या, आता संख्या पोहोचली आठ वर ..

सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथे काल दि. ३० जुलै, गुरुवारी पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आज दि. ३१ जुलै, शुक्रवारी पुन्हा तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. त्यातून साखरखेर्डा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण आठ झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी ही समस्या गंभीरपणे हाताळत, अंतर्मुख होऊन उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
साखरखेर्डा येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच्या परिस्थितीत ज्या गांभीर्याने कोरोना विषाणू प्रसाराची दखल घेतली होती. त्यात कुठेतरी हलगर्जीपणा आल्याचे आढळून येत आहे.
यातूनच गावात तसेच कुटुंबांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती दुर्लक्षित होत गेल्या. ह्या हलगर्जीपणातूनच कोरोना विषाणू प्रसाराला वाव मिळाला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.
काल दि. ३० जुलै, गुरुवारी बसस्थानक परिसरातील दोन तसेच गावाच्या अंतर्गत भागातील तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यानंतर आता विविध क्षेत्रातील व्यक्ती कामाशिवाय बाहेर पडणार नाहीत अशी अपेक्षा असतांना 'मला काय त्याचे ..?' ह्या उक्ती प्रमाणे विनाकारण हिंडणाऱ्या फिरणाऱ्या व्यक्ती गावात अनेक ठिकाणी आढळून येत होत्या.
त्यानंतर आज दि. ३१ जुलै, शुक्रवारी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आले. त्यातून प्रशासन जागे होऊन विनंतीवजा सूचना करीत काही ठिकाणी जाऊन कर्तव्य बजावत असतांना त्यांना विरोध झाल्याच्याही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
यातूनच प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची तसेच विनंतीवजा व्यवस्थेला विरोध करणाऱ्यांंच्या विरोधात कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याची आवश्यकता भासत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळेच
प्रशासनाला सहकार्य करा.
घरीच थांबा.
काळजी घ्या.
कोरोना प्रसारावर आळा घालण्यासाठी एकत्र या.🙏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा