काटे कुटुंबीयांवर काळाचा तिसरा घाला
हृदयविकाराच्या धक्क्याने एकनाथ काटे यांचे आज निधन 
सर्वत्र व्यक्त होतेय हळहळ




सिंदखेडराजा:- पांग्री येथील काटे कुटुंबातील एकनाथ भिवसन काटे यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ वर्षे होते.
एका महिन्याच्या कालावधीत काटे कुटुंबातील तिसऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 
काटे कुटुंबातील वयोवृद्ध श्रीमती द्वारकाबाई भिवसन काटे यांचे दि. १८ सप्टेंबर, शुक्रवारी सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले.
त्यानंतर परवा दि. १२ ऑक्टोबर, सोमवारी सायंकाळी हरिश्चंद्र साहेबराव काटे यांचे कोविड १९ आजाराने औरंगाबाद येथील इस्पितळात निधन झाले. मृत्यूसमयी ते ४२ वर्षांचे होते. काल दि. १३ ऑक्टोबर, मंगळवारी सकाळी औरंगाबाद येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर काटे कुटुंबीय साखरखेर्डा येथे परतले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी रक्षाविसर्जन तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्दबातल केले होते. तसेच भेटीसाठी येण्याऐवजी आहात तेथूनच श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहनही केले होते.
त्यानंतर आज दि. १४ ऑक्टोबर, बुधवारी दुपारच्या वेळी एकनाथ भिवसन काटे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, पुतणे, पुतण्या असा बराच मोठा परिवार आहे.
परिस्थितीशी संघर्ष करीत काटे कुटुंबीयांनी पलसिद्ध कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जिल्हा नव्हेतर राज्यपातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीपासून मानवतेला प्राधान्य देणाऱ्या काटे कुटुंबातील तीन व्यक्तींचे एका महिन्याच्या कालावधीत पाठोपाठ निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
एकनाथ काटे यांच्यावर पांग्री काटे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा