महसूल उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात एक लाख रुपयांची केली होती मागणी


महसूल उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

एक लाख रुपयांची केली होती मागणी


सिंदखेडराजा:- येथील महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनाला पन्नास हजार रुपयाची लाच घेताना, कार्यालय आवारातच रंगेहात पकडण्यात आले आहे. यामुळे महसूल विभाग व संबंधित यंत्रणेत खळबळ उडाली आहे. 

तक्रारकर्ता हा बुलडाणा येथील ३६ वर्षे पुरुष असून  प्रचार व प्रसिद्धीसाठीचा कंत्राटदार आहे. त्यांची लाखो रुपयांची देयके/बिल अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ह्या देयकांच्या संदर्भात वरिष्ठांना प्रस्ताव सादर करुन संबधित बिल काढून देण्यासाठी अव्वल कारकून दीपक गोरे याने लाचेपायी एक लाख रुपयांची मागणी तक्रारदार व्यक्तीकडे केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलडाणा, कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचखोर अव्वल कारकुनास रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. लाच प्रत्येकी ५० हजार रुपये अशी दोन टप्प्यात मागण्यात आली होती. त्यानुसार आज दि. ३ मार्च, बुधवारी पहिला हप्ता देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला होता. येथील महसूल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारातील पार्कींग मध्ये ५० हजार रुपयांची लाच घेताना दीपक गोरे अव्वल कारकून याला रंगेहाथ पकडण्यात आले. ह्या कारवाईसाठी  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परीक्षेत्र, अधिक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संजय चौधरी पोलीस, नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, शिपाई विजय मेहेत्रे, विनोद लोखंडे, चालक मधुकर रगड व रशीद शेख यांनी सापळा यशस्वी केला आहे.

ह्या कारवाईमुळे महसूल विभागासह इतरही सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा