पांडुरंग सुरळकर गुरुजींचे निधन
पांडुरंग सुरळकर गुरुजी
सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथील पांडुरंग बंडूजी सुरळकर, गुरुजी यांचे आज दि. ३१ जुलै, शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते.
सुरळकर गुरुजी हे मोडी लिपीचे जाणकार होते. हिवरा आश्रम, ता. मेहकर येथील विवेकानंद आश्रमचे संस्थापक स्व. स्वामी शुकदास महाराज ह्यांना इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शिक्षणाचे धडे दिले होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवे, पतवंडे असा बराच मोठा मित्र परिवार आहे.
साधी राहणी व उच्च विचारसरणीचा जुना जाणता शिक्षकाच्या निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.
आपण नोंद घेऊन, संबंधितांना कळवावे.
भावपूर्ण श्रद्धांजली ...!
🌹🙏

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏