गारखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
गारखेड येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
सिंदखेडराजाः- जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली तालुक्यातील गारखेड येथील एक व्यक्ती दि. २ जुलै, गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. दि. ३ जुलै, शुक्रवारी त्याच्या संपर्कातील १७ व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सदानंद बनसोड यांनी दिली आहे.
यामध्ये गारखेड येथील तीन व्यक्ती तर वर्दडी येथील एक व्यक्ती असल्याचेही डॉ. सदानंद बनसोड यांनी सांगितले आहे.
हे वृत्त येताच तालुक्यात खळबळ उडाली असून, विविध प्रकारच्या शंकात्मक चर्चांना पेव फुटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद ..!🙏