खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ; जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत; शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच :: चर्चेचे एकच पेव फुटले

खोटी कागदपत्रे सादर करीत कर्ज प्रकरणी ;

जि. प. मुख्याध्यापक दोन दिवस अटकेत;

शिक्षण विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच 

चर्चेचे एकच पेव फुटले



सिंदखेडराजा:- तालुक्यातील दुसरबीड येथील पतसंस्थेत खोटी बनावट कागदपत्रे सादर करत  जि. प. शाळेत उच्च श्रेणी मुख्याध्यापकाने कर्ज घेतले आहे. त्याप्रकरणी त्या आरोपी मुख्याध्यापकास अटक होऊन जामीन सुद्धा मंजूर झाला आहे. मात्र याबाबत शिक्षण विभागाने कारवाईची कुठलीही पावले उचलली नसल्याची दबक्या आवाजात शंका कुशंकात्मक चर्चा होत आहे.


सत्यजित अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा दुसरबीड, चे व्यवस्थापक दर्शन चोपडा यांनी यासंदर्भात किनगावराजा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पतसंस्थेमध्ये आरोपी शिक्षक दामोदर माणिकराव बुरकुल, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, रा. शिंगणे नगर, देऊळगावराजा याने सन २०२० मध्ये खोटे बनावट कागदपत्रे सादर करुन ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामध्ये जे हमीपत्र होते, त्यावर गटशिक्षणाधिकारी यांच्या बनावट सह्या व शिक्के होते. 

सन २०२३ मध्ये याप्रकरणी पोलिसांनी गु. र. नं. २९२/२०२३ कलम ४२०, ४६८, ४७१ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला. व त्यानंतर केलेल्या पोलिस तपासामध्ये खोटी व बनावट कागदपत्रे सादर केलेली असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांकडून आरोपी दामोदर माणिकराव बुरकुल यास ४ ऑगस्ट सोमवारी अटक करण्यात आली होती. सिंदखेडराजा न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

याशिवाय देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात सुध्दा फसवणूक प्रकरणी याच मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत व भावी पिढीला ज्ञानदान करणाऱ्या मुख्याध्यापका सारख्या नैतिक पदावर आरुढ असलेल्या व अनैतिक कारभार करण्याच्या या प्रकरणात चिरीमिरी तर करण्यात आली नाही ना? अशी दबक्या आवाजातील चर्चेने शैक्षणिक क्षेत्र व्यापून गेले आहे. नव्हेतर शैक्षणिक एक क्षेत्रातील एक अधिकारी त्या आरोपीचा मुख्य पाठीराखा असल्याचेही बोलल्या जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

शिंगणे, कायंदे परिवार .. अन मी दीसना खकानलेल्या, स्वार्थी जळकुट्यांनो .. हा घ्या ढळढळीत पुरावा