पोस्ट्स

वास्तविक पत्रकारिता करावी का ..?

इमेज
  खऱ्याचं खरं .. खोट्याचं खोटं .. वास्तविक पत्रकारिता  करावी का ..? नुकतीच एक बातमी निदर्शनास आली  जिल्ह्यातील एका तथाकथित  नामांकित पत्रकाराने  ती टाकली होती. जी बाब कुठेही घडू शकत नाही,  असा राजकीय अंदाज  जिल्ह्यातील त्या मतलबी  पत्रकाराने घेतल्याचे दिसून आले. पण अंदाज राजकीय होता. मात्र त्यात नवल असे की, वृत्ताची सत्यता पडताळून पाहणे  गरजेचे असतांना .. व्यावसायिक दृष्टिकोनातून  जाहिरातीची बरसात होईल, या हिशोबातून संपादकानेही ते वृत्त प्रकाशित केले. ते वृत्त वाचतांना  लोण्याचा भाव मात्र  आवर्जून आठवला. त्या पत्रकाराने किती आणि काय लिहावं? दरम्यान  नुकताच पार पडलेला एक प्रसंग समोर आला.  सोहळाच असावा  असा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी सामाजिक क्षेत्रातील  एक प्रभावी व्यक्तिमत्त्व  ज्याने मला निमंत्रित केले,  ती सोबत होती. सोहळा पार पडला. माझ्या सारख्याने  जाणीवा व नेणीवा ठेवत  जे जसे घडले त्यानुसार  वृत्तांकन केले. त्यात तो राजकीय जे काही बोलला  ते जसेच्या तसे लिहिले हो...

संत चोखोबांच्या जन्मस्थान विकासासाठी हेवेदावे विसरु या - आ. मनोज कायंदे

इमेज
  संत चोखोबांच्या जन्मस्थान विकासासाठी हेवेदावे विसरु या - आ. मनोज कायंदे  आंतरराष्ट्रीय धर्तीवर संशोधन केंद्र निर्माण व्हावे - हर्षवर्धन सपकाळ  सिंदखेडराजा:- संत चोखोबांच्या जन्मस्थानाचा विकास जन्मोत्सवाच्या प्रणेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल. त्यासाठी आपापसातील हेवेदावे विसरण्याचे आवाहनही  आ. मनोज कायंदे यांनी केले. संत चोखोबांच्या ७५७ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन आज दि. १४ जानेवारी, मंगळवारी मेहुणाराजा, ता. देऊळगावराजा येथे करण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात पुढे बोलतांना आ. कायंदे यानी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत विकासपथावर मार्गरत राहण्याची गरज व्यक्त केली. तर हा जन्मोत्सव हा लोकोत्सव होण्यासाठी पुढील जन्मोत्सव तीन दिवसांचा असेल असे अभिवचन त्यांनी दिले. मागील काळात माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आणलेल्या साडेचार कोटी निधीचाही उल्लेख त्यांनी केला.  यावेळी माजी आ. हर्षवर्धन सपकाळ, माजी आ. तोताराम कायंदे, सरपंच नंदाताई बोंद्रे, संतोष खांडेभराड, माजी जि. प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, प्रा. कमलेश खिल्लारे, भगवान मुंढे, देविदास ठाकरे, राजू चित्ते,...

मातृतीर्थात त्या वेडेपणाची झाली वर्षपूर्ती , ते वेडे म्हणजेच "बळीवंश"

इमेज
शेतकऱ्यांची बाजू घेणे,  हिताची, संघर्षाची भूमिका मांडणे  म्हणजेच वेडेपणा  ९ ऑगस्ट रोजी 'भारत छोडो' आंदोलनदिनी  मातृतीर्थात त्या वेडेपणाची झाली वर्षपूर्ती  ते वेडे म्हणजेच "बळीवंश" सिंदखेडराजा:- तालुक्यातील भौगोलिकता पाहता इथे विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळतात. मागील कालावधीत नैसर्गिक अन्न साखळी तुटल्याने व त्यामुळे वन्यप्राण्यांचे असंतुलन निर्माण झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांना पिक उत्पादनात होतो आहे. ही बाब लक्षात आली ती रुम्हणा येथील एक युवक जो बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहे व मातीशी जन्मजात नाते आहे त्याचा लक्षात ही बाब आली. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम ही संकल्पना नव्याने समोर आली व दृढही झाली आहे. त्यामुळे आपल्याला काम करुनही वेळ मिळतो, त्याचा लाभ आपण कुटूंब, गाव, परिसर नव्हेतर आपल्या मातृतीर्थातल्या सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना देऊ शकतो यावर त्याचे लक्ष केंद्रित झाले नव्हेतर त्याने जाणीवपूर्वक केंद्रित केले. यासाठी चळवळ निर्माण व्हावी म्हणून ९ ऑगस्ट, २०२३ रोजी बळीवंश असे नामकरण केले. सगळ्याच सदस्यांना पूर्ण वेळ देणे शक्य नसल्यामुळे...

काय व्हावं मतदारसंघाचं ? राजकीय क्षेत्राची शैक्षणिक क्षेत्रात घुसखोरी ..प्रभारी गटशिक्षणाधिकारी ठरताहेत वादग्रस्त

इमेज
राजकारण घुसलंय शाळेत..  गटशिक्षणाधिकारी प्रभारीपद ठरत‌ आहे वादग्रस्त  .. सिंदखेडराजा:- तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पद हे प्रभारी म्हणून कार्यरत होते. शैक्षणिक क्षेत्रातील कामकाज व्यवस्थितपणे सुरु होते‌. तरीही शैक्षणिक क्षेत्रातील एका दादाच्या माध्यमातून व सत्ताधारी एका माजी आमदार पातळीवरील पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून नुकत्याच आलेल्या प्रभारीने आपला जालीम मोर्चा व स्वतः दामाजीपंताचे कार्य हाती घेतले असल्याचे निदर्शनास येत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पद हे रिकामे असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील जेष्ठ असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्यरत होते. सगळं काही सुरळीत चालू होते. मात्र देऊळगावराजा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका दादा प्रभारीने राजकीय माजीला हाताशी धरले. दामाजीपंतांचे तसेच मताधिक्याचे आमिष दाखवून व आपल्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एका प्याद्याला पुढे केले. यामागे विद्यमान लोकप्रतिनिधीने नाथांचे गाव सांगूनही पूर्वी आपले ऐकले नव्हते, मग तर मला आता रक्कम व अधिकाराचा वापर करायचाच, असे गृहीत धरुन शैक्षणिक क्षेत्रात यादवी माजवायची व त्याद्वारे विद्यमानाचे मतातून खच्...

साखरखेर्डा परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडितच अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत ..

इमेज
  साखरखेर्डा परिसरात २४ तासांपासून वीजपुरवठा खंडितच अनेक प्रकारच्या चर्चांना ऊत .. साखरखेर्डा:- येथील व परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊन तब्बल २४ तास उलटून गेलेला आहे. यासंबंधीची माहिती जाणकार सूत्रांकडून घेतली असता मेहकर वरुन पुरवठा जाणूनबुजून खंडित केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. साखरखेर्डा व परिसरातील वीजपुरवठा काल दि. ११ जुलै, गुरुवारी दुपारी चार वाजेपासून खंडित झालेला आहे. ह्या पुरवठ्या दरम्यान मध्यठिकाणी असलेल्या देऊळगाव माळी येथील वीजपुरवठा मात्र चालू होता.  साखरखेर्डा वासीयांनी काल दि. ११ जुलै, दुपारी अंदाजे ४.०० वाजेपासून पासून तर आज सायंकाळी वृत्त लिहिपर्यंत मधला एक तासाचा कालावधी वगळता खंडित वीजपुरवठ्याचा सामना केला. दर शुक्रवारी येथे आठवडी बाजार भरत असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा भंग पावली आहे. तर कुठलाही लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र आहे. येथील कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कॉल उचलला जात नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. एकंदरीत स्थानिक तसेच राज्य व राष्ट्रीय नव्हेतर पक्षीय पातळी...

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या आंदोलनाची शक्यता

इमेज
 रा ज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या आंदोलनाची शक्यता  सिंदखेडराजा:- संपूर्ण राज्यातील वैद्यकीय अधिकारी गट 'ब' संवर्गाची पदोन्नती प्रतिक्षेत आहे. ह्यासाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, त्यातून शासनाने वैद्यकीय अधिकारी यांच्या पदोन्नतीची यादी जानेवारी मध्ये प्रसिद्धही केली होती. त्याला सहा महिने उलटूनही गेले मात्र तरीही अंमलबजावणीचे घोडे अजूनही पेंड खात असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी शासकीय स्तरावरुन विलंब का केला जात आहे? याबाबतीत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वैद्यकीय अधिकारी गट 'अ' मध्ये समाविष्ट होणे अपेक्षित असतांनाच काही अधिकाऱ्यांना सन २०१९ मध्ये गट ' मध्ये समाविष्ट करण्यात आले. परंतु त्याला विरोध न करता त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या गटात समायोजित होत 'दुधाची तहान ताकावर भागवत' शासनाला सहकार्यच केले. शासकीय स्तरावर विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना ठराविक सेवाकालानंतर पदोन्नती देण्यात येत असते. परंतु यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट 'ब' कायम उपेक्षित राहिल्याची वास्तव परिस्थिती आहे. यामध...

सावखेड तेजन शिवारात बिबट्या दिसला पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये घबराट

इमेज
सावखेड तेजन शिवारात बिबट्या दिसला पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये घबराट बिबट्याच्या पावलांचे ठसे  बिबट्याच्या शोध घेण्यासाठी सज्ज पथक सिंदखेडराजा:- तालुक्यातील सावखेड तेजन शिवारात ऐन शेत मशागतीच्या गडबडीच्या दिवसांतच बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सावखेड तेजन गावाच्या दक्षिण दिशेला डोंगरशेत नावाचे शिवार आहे. त्याच भागातून आडगांवराजा जाण्यासाठीचा मार्ग आहे.  सावखेड तेजन ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शरद सोनुने यांचे शेत त्याच भागात आहे. आज दुपारी दोन वा. सुमारास खरीप पूर्व नियोजन करीत, ते शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना बिबट्या दिसला. वनविभागाच्या संबंधितांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती कळविली. त्यानंतर वनरक्षक गणेश ठाकरे, वनरक्षक सुभाष बुधवत हे त्या भागात पोहचले. त्यांना शरद सोनुने यांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे दाखवले. त्याचा पाठलाग करीत बिबट्याचा शोध घेण्यात आला. यासाठी स्थानिक शिवहरी चपटे, मदन जायभाये, बद्री जायभाये,  हर्षल सांगळे यांच्या सह गावातील अनेक जण शोध मोहिमेत सामील झाले होते. मात्र बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही. खरीप हंगामात ...

लोकसभा निकालापूर्वी नागरिकांना कायदेशीर इशारा

इमेज
  लोकसभा निकालापूर्वी नागरिकांना कायदेशीर इशारा                         विनोद नरवाडे, ठाणेदार, किनगावराजा  सिंदखेडराजा:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल उद्या दि. ४ जून, मंगळवारी असून, आचारसंहिता दि. ६ जून गुरुवार पर्यंत लागू  आहे. या दरम्यान अशांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कार्य करण्यात येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात किनगावराजा ठाणेदार विनोद नरवाडे यांनी पत्र जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, निकाल घोषित झाल्यावर कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कॉमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर अशी कुठलीही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही ॲप्लिकेशन द्वारे कुणीही प्रसारित करु नये. कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी करु नयेत. डीजे वाजवू नये, विनापरवाना मिरवणूक काढू नये. व्हॉट्सॲपच्या गृप ऍडमिन यांनी ओन्ली ऍडमिन असे सेटिंग करावे. अन्यथा एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर कायदा व सु्यवस्थेचा प्रश्न निर्माण झ...

जेईई मेन परीक्षेत महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलानं गाजवलं मैदान ..

इमेज
जेईई मेन परिक्षेत सुशांत सिंग राजपूत ठरला होता अव्वल त्याच परिक्षेत महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मुलानं गाजवलं मैदान .. सर्वांचा लाडका आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या सुशांत सिंग राजपूतने २००३ मध्ये AEEE म्हणजेच आत्ताची JEE Main परीक्षा उत्तीर्ण केली होती. अभिनयासोबतच तल्लख बुद्धिमत्ता अशी विशेष ओळख असणाऱ्या सुशांतने ऑल इंडिया रँक ७ मिळवून ही कठीण परीक्षा पास झाला होता. अशीच एक कमाल महाराष्ट्राला शेतकरी घरातील मुलाने केली आहे. त्याची प्रेरणादायी यशोगाथा आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रातील एका छोटय़ाशा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेकांसमोर आदर्श ठेवला आहे. जेईई मेन २०२४ परीक्षेचे निकाल लागले असून, परीक्षेतील टॉपर्सची यादीही जाहीर केली आहे. यावर्षी ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, तर एआयर (ऑल इंडिया रँक) १ नीलकृष्ण निर्मलकुमार गजरे (Gajare Nilkrishna Nirmalkumar) याला देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एका छोटय़ाशा गावातून आलेल्या नीलकृष्णाची कथा ही अभ्यासाप्रती असलेल्या समर्पण, मेहनत आणि चिकाटीची गोष्ट आहे. नीलकृष्णाचे वडील नि...

गॅस सिलेंडरच्या आगीत घर भस्मसात, ९ लाखांचे नुकसान; कुटुंब बेघर

इमेज
  गॅस सिलेंडरच्या आगीत घर भस्मसात,  ९  लाखांचे नुकसान; कुटुंब बेघर सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा येथे काल सकाळी स्वयंपाक सुरु असतांना एकाएकी गॅस सिलेंडरने पेट घेतला व आग लागली. त्यामुळे माळवदाचे असलेले संपूर्ण घर आगीत भस्मसात झाले आहे. महसूल विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन, ९ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. साखरखेर्डा येथे नंदकुमार लक्ष्मणराव देव यांच्या घरात काल दि. २२ एप्रिल, सोमवारी सकाळी ८.३० वा. च्या सुमारास स्वयंपाक सुरु होता. त्यावेळी गॅस सिलेंडरने एकाएकी पेट घेतला. काही कळण्याच्या आतच घरालाही आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी विशेषतः युवकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र काही मिनिटांतच होत्याचे नव्हते झाले. या आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले. आगीच्या या घटनेत ४ खोल्यांचे माळवदाचे घर व ४५ टिनपत्रे  किंमत ५ लाख रुपये, फर्निचर २ लाख ३५ हजार रुपये, घरगुती व कौटुंबिक सामान ७५ हजार रुपये, पुजेचे व चांदीची पारंपरिक भांडी ४० हजार रुपये, मंगळसूत्र व सोन्याचे दागिने ४५ हजार रुपये व इतरही सामान व वस्तू सगळे मिळून ९ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झ...

बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली; दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर लागणार निकाल

इमेज
  महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख ठरली; दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर लागणार निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळ जलदगतीने तयारी करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेतली गेली. महाराष्ट्रात १ ते २६ मार्च आणि बारावीची परीक्षा तर, २१ फेब्रुवारी ते १९ मार्च यादरम्यान घेण्यात आली. निकाल लवकर लागण्याच्या दृष्टीने जलदगतीने तयारीला सुरुवात झाली होती. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले होते. पेपर तपासणी झाल्यानंतर संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी संकलन केंद्रांवर जमा करण्यासाठी ठरावीक मुदत देण्यात आ...

लाच स्वीकारतांना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबवित होते लाचेची प्रक्रिया

इमेज
  लाच स्वीकारतांना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात  चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने राबवित होते लाचेची प्रक्रिया   सिंदखेडराजा:- येथील तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह शिपाई व वाहन चालक अशा तिघांना  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चक्क तहसील कार्यालयात ३५ हजार रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले असून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज दि. १२ एप्रिल, शुक्रवारी दुपारी ३.०० वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. तर तहसीलदार यांच्या दोन घरांच्या झाडाझडती मध्ये ४६ लाख ९२ हजार १८० रु. रक्कम जप्त करण्यात आली आहे. तालुक्यात इतर काही  रेती व्यावसायिक चोरुन उत्खनन व वाहतूक करीत असतांनाच ह्या लाच प्रकरणातील रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तक्रारदारावर मात्र बंदी लादण्यात आली होती. त्यामुळे त्या तक्रारदाराने आपल्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने खडकपूर्णा नदीतील रेती काठावर आणणे व तेथून पुढे वाहतूक करु देणे, ह्या सगळ्या बाबींकडे महसूल विभाग व विशेषतः सिंदखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी दुर्लक्ष करण्यासाठी तसेच तक्रार आल्यास निपटवून  देण्यासाठी शिपाई पंजाब ताठे व वाहन चालक...

मोबाईल टॉवरवर चढून, दोरीने गळफास घेत उडी मारत, वयस्कर इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न

इमेज
  मोबाईल टॉवरवर चढून, दोरीने गळफास घेत उडी मारत,  प्रौढ इसमाचा आत्महत्येचा प्रयत्न सिंदखेडराजा:- तालुक्यातील साखरखेर्डा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हिवरा आश्रम येथे एका प्रौढ व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढून तेथे दोरीने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना आज सकाळी ११.०० वा. सुमारास घडली आहे. हिवरा आश्रम येथील रमेश रामभाऊ सरकटे हा अंदाजे ५५ वर्षांचा प्रौढ इसम सकाळी ११.०० वा. च्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला, तेथे जाऊन त्याने पोलिसांना पुकारले. कर्तव्यावर हजर असलेल्या बीट जमादार प्रवीण गवई, नितीन राजे जाधव, तुका लक्ष्मण इनामे, निवृत्ती पोकळे आदिंनी घटनास्थळ गाठले. त्याचवेळी ठाणेदार स्वप्नील नाईक यांनीही लगोलग कळविले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर रमेश सरकटे याने एक चिठ्ठी खाली फेकत, पोलिसांना त्यावर कारवाई करण्याचे म्हटले. दरम्यान ठाणेदार स्वप्नील नाईक हे आपल्या आणखी काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. सरकटे याने फेकलेली ती चिठ्ठी खाली येताच पोलिसांनी कारवाई करण्याची हमी दिली. मात्र आता आपले काम झाले म्हणत, रमेश सरकटे याने सोबत असलेली दोरी टॉवरच्या पाईपला बांधून फास तयार केला....

आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏

इमेज
  आज माझ्या मामांचे पुण्यस्मरण ..!🌷 माझा साळुबा मामा ..!🙏 सावखेड तेजन, ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथील जेष्ठ व्यक्तिमत्त्व आम्हा सर्व भाच्यांचे लाडके मामा श्री. साळुबा नामदेवराव जायभाये यांचे चारवर्षांपूर्वी वृद्धापकाळाने आजच्या रोजी म्हणजे दि. २४ जानेवारी,  २०२० शुक्रवारी सकाळी ५.३० वा. जालना हॉस्पिटल, जालना येथे निधन झाले. मृत्युसमयी ते वय ८५ वर्ष्यांचे होते. किनगावराजा येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शिवानंद जायभाये ह्यांचे वडील असलेले साळुबा मामा हे प्रेमळ ह्या व्याख्येच्या पलीकडे जाणारे व्यक्तिमत्त्व. त्यांची आठवण झाली की, वेगळीच ऊर्जा आम्हा भाच्यांच्या मनात निर्माण होते. आम्हा सगळ्या भाच्यांची खूप काही काळजी त्यांनी घेतली. माय ह्या शब्दात एकदाच 'मा' येतो. पण दोनदा मा येणारे जायभाये वाड्यातील आमचे बाजीराव मामा, किसन मामा, राम मामा, उत्तम मामा, कारभारी मामा, आश्रूबा मामा, लक्ष्मण मामा, भीमराव मामा आदि प्रत्येक मामा आमच्या नशिबी होते. नव्हेतर त्यांनी आमच्या व्यक्तिमत्वाला वळण लावले. म्हणूनच आम्ही घडलो. आमच्या साळुबा मामांच्या प्रेमळ स्मृती आजही उरात जिवंत आहे. इथ...

डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस लग्नवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! ह्या निमित्ताने आढावा गोतावळ्याचा ..!

इमेज
  डॉ. सुनील व सौ. शिल्पा कायंदे आपणांस लग्नवाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ..! ह्या निमित्ताने आढावा गोतावळ्याचा ..! लहानपणापासून ज्यांना बघत आपण मोठे होतो. त्यांचा काहीना काही प्रभाव आपल्यावर असतोच. माझ्या मामाच्या गावी म्हणजेच सावखेड तेजन येथे मी लहानाचा मोठा झालो. तेथे खेळत बागडत असतांना माय सोबत, द्रोपदाबाईला भेटण्यासाठी चेपटे कुटुंबियांच्या वाड्यातही जायचो. त्यातील प्रमुख व्यक्ती म्हणजे द्रोपदाबाईंचे पती व माझ्या वडिलांचे मित्र म्हणजेच आमच्या मुक्ताबाईचे बंधू तुकाराम चेपटे हे होते. वाड्यात गेलो की, द्रोपदा मावशी सोबतच ज्यांचा लळा लागला व सणासुदीला ज्या माहेरी यायच्या त्या आमच्या मुक्ताबाई. मला जसे आठवते त्यानुसार त्याकाळी सावखेड तेजन येथील राजकीय वर्तुळात आमची मामा मंडळी स्व. बाजीराव जायभाये, स्व. विश्वनाथ जायभाये दुकानदार, स्व. कारभारी जायभाये, विघ्ने, मांटे, बुधवत यांच्यासह डोईफोडे, सोनुने आदि अनेक व्यक्ती कार्यरत होत्या. त्यांना मार्गदर्शन देण्यात तढेगाव येथील स्व. बाबुराव कुटे, सिनगांव जहाँगीर येथील सौंदाजी पाटील डोईफोडे यांच्यासह हिंमतराव पाटील बंगाळे, पांग्री येथील वाघ, ...

बातमी मागची बातमी .. बहारदार सूत्रसंचलनाचा श्रीगणेशा होतोय ..

इमेज
बातमी मागची बातमी .. बहारदार सूत्रसंचलनाचा श्रीगणेशा होतोय .. सिंदखेडराजा:- एखादा कार्यक्रम आयोजित केल्यावर त्या कार्यक्रमाचा निवेदक योग्य आहे, असं म्हटलं की सत्तर टक्क्यांच्या वर कार्यक्रम यशस्वी होतो. राहेरी येथील नामांतर लॉंग मार्च ह्या कार्यक्रमाच्या आठवणीतून हाच अनुभव आपला लहान भाऊ गणेश ह्याने दिला. रसिक मनाचा मी एक व्यक्ती, कार्यक्रमात सहभागी जरी झालो नाही तरी त्याचा आढावा घेणे, ही प्रवृत्ती. त्यातच कुठलाही धारण केलेला मीडिया सोडल्यावर अधिक उत्सुकता तानवुन काय आणि कसं झालं? हे विचारणं नैसर्गिकच. दरवर्षी प्रमाणे काल म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी राहेरीच्या पुलावर म्हणजे आमच्या गावाच्या शिवावर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ ह्याचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ व्हावे, ह्या मागणीसाठी जोगेंद्रजी कवाडे सर ह्यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च  करण्यात आला होता. तत्कालीन शासन व्यवस्थेने राहेरी पुलावर मोर्चा अडविला व मारहाण करुन आंदोलकांच्या नावावर केसेस केल्या होत्या. जानेवारी महिना त्यात सुट्या संपलेल्या असतात. घ्यायची म्हटल्यावर मिळत नाही. त्यामुळे इच्छा असूनही थोडं अडचणीचं हो...

अक्षरशः घाबरलो.

इमेज
  आज सकाळी ऑनलाइन होतो. मात्र त्यानंतर मोबाईलवर मुंग्या चढायला सुरुवात झाली. अक्षरशः घाबरलो. नंतर लक्षात आले की, आज मकर संक्रांत   त्यामुळे समजले की, आपल्या शुभेच्छांचा गोडगोड   तीळगुळ आलाय. म्हणूनच मोबाईलवर मुंग्या चढताहेत. त्यातून माझ्या अंतरीच्या शुभेच्छा आपण व कुटुंबियांना सुद्धा ..! फक्त गोडगोड बोलू नका तर  कायमच आपलं व्यक्तिमत्त्व गोडगोड ठेवा. 🙏

अपात्रतेचा निकाल तर लागला .. आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ?

इमेज
  अपात्रतेचा निकाल तर लागला .. आता कशी असणार मातृतीर्थ सिंदखेडराजातील राजकीय परिस्थिती ? सिंदखेडराजा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांनी पक्षीय व्हीप नाकारला म्हणून त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या ह्या आरोपानंतर विधानसभा अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश मे २०२३ नंतर देण्यात आले. ह्या प्रकरणाच्या सुनवाईत मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीन बाबी स्पष्ट केल्या होत्या. त्यामध्ये तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ तसेच बहुमत सिध्द करण्यासाठी दिलेले निर्देश चुकीचे असल्याचे म्हटले होते. तिसरी बाब म्हणजे जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांनाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही स्पष्ट केले होते. जसे हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आले त्यानंतर निकाल उशीरा देण्यासाठी किंवा लांबविण्यासाठी वेळकाढूपणा अवलंबवण्यात आल्याचे प्रकारही घडले. त्याबद्दलही सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली होती.  विधानसभा अध्यक्षांनी शेवटी १२०० पाने वाचल्यानंतर एकदाचा निकाल लागला. निकाल लागल्यान...

भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल

इमेज
  भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बहिणीची भावाला यकृत भेट स्पृहणीय पोस्ट समाजमाध्यमावर व्हायरल सिंदखेडराजा:- भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला एका बहिणीने आपल्या भावाला यकृतदान करीत समाजात एक स्पृहणीय आदर्श निर्माण केला आहे.  दिवाळीच्या सणातील भाऊबीज हा दिवस भावाबहिणीच्या नात्यातील महत्वाचा दिवस असतो. त्यानिमित्ताने भावाच्या घरी म्हणजेच माहेरी हक्काधिकाराने जाता येत असते. भाचे मंडळी सुद्धा मामाच्या घरी जाण्यासाठी आतुर असतात. त्यामुळेच दिवाळीचा सण आला की सासुरवाशीण महिला माहेराकडे डोळे लावून आठवण काढत असतात.  तालुक्यातील पळसखेड चक्का येथील सौ. दुर्गा अरुण धायतडक हिचे माहेर देऊळगावराजा तालुक्यातील  अंढेरा हे आहे. तिचा भाऊ हॉटेल व्यावसायिक रमेश नागरे यांची प्रकृती काही दिवसांपासून अधूनमधून खराब होत होती. त्यामुळे लहान भाऊ संतोष नागरे व कुटुंबीयांनी त्यांना  मोठमोठ्या दवाखान्यात निदान व उपचारासाठी नेले. त्यात यकृताचा आजार असल्याचे निदान झाले. परंतु त्यामध्ये यकृत बिघाड जास्तच असल्याचे आढळले. त्यामुळे औषधोपचाराने आजार नियंत्रण साध्य होणार नाही. मात्र यकृत अवरोपण केल्यास पूर्णपणे आ...

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा 'बर्निंग बस' चा थरार .. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तेहतीस जण बचावले

इमेज
  समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा 'बर्निंग बस' चा थरार .. चालकाच्या प्रसंगावधानामुळे भीषण अनर्थ टळला तेहतीस जण बचावले  सिंदखेडराजा : अमरावती येथून पुणे येथे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसला समृद्धी महामार्गावर चॅनल २८० वर अचानक आग लागली. या घटनेत बसचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकांसह तेहतीस प्रवाश्यांचे प्राण बचावले.  एमएच ३७ टी ५४५४ क्रमांकाची बस अमरावती येथून  पुणे कडे जात होती.  ३० सप्टेंबर, शनिवारी रात्री निघाली होती. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्र.  २८० जवळ बसने अचानक पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत, बस रस्त्याच्या बाजुला थांबवली व ताबडतोब सर्वच प्रवाशांना खाली उतरवले. ह्या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर चाैकीचे पीएसआय उज्जैनकर, पोहेकाॅ काेळी, पाेकाॅ नाझीर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. क्यूआरव्ही पथकाला पाचारण करीत, वेळीच आग विझवण्यात आली. ह्या घटनेतील चालक शेख रज्जाक शेख आयुब, रा. दारव्हा, जि. यवतमाळ आणि प्रविण मुंडे, रा. मंगरुळपीर, जि. वाशीम यांच्यासह ३२ प्रवाशी सुखरुप आहेत. अचानक घडलेल्या झालेल्या ह्या प्रकाराने भयभीत झा...

खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

इमेज
  खैरव येथील वयोवृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ .. सिंदखेडराजा:- तालुक्यातील खैरव येथील दिनकर बाळाजी भुसारी वय ७२ वर्षे यांनी विषारी औषधी प्राशन करीत आत्महत्या केली आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या दिनकर भुसारी यांच्याकडे अंदाजे अडीच एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी व नातू पणतू आदि सदस्य आहेत. पिढ्यानपिढ्याची गरीबी, त्यात कर्करोगाचे आजारपण, पेरणी व पिकांची मशागत आदि बाबींवर झालेला खर्च, त्यामुळे औषधी घेण्यासाठीही रक्कम नव्हती. त्यातच पीक परिस्थिती बरी असतांनाच पावसाने दिलेली उघडीप त्यातून येत्या काळातील संभाव्य नापिकी आदि अनेक चिंतांमधून त्यांनी काल दि. २५ ऑगस्ट, शुक्रवारी विषारी औषधी प्राशन केली. उपचारासाठी देऊळगाव मही येथे नेल्यावर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथील इस्पितळात हलविले असता, उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे.  यासंदर्भात माजी सरपंच संजय तळेकर, पोलीस पाटील बबन घुगे आदिंनी संबंधित गावपातळीवरील कर्मचारी यांना माहिती दिली आहे. जालना येथे शवविच्छेदन झाल्यावर आज दुपारी बारा वा. सुमारास खैरव येथ...

आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!!

इमेज
  आज व्हीटी सरांचा स्मृतीदिन ..! मनात काहूर अन हुरहूर ...!! दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे दि. १९ जुलै २०२१ रोजी मला कॉल करुन एका व्यक्तीने व्हीटी सरांच्या निधनाची बातमी कळवली. विश्वास बसतच नव्हता, कारण रोज किंवा तिसऱ्या दिवशी भेट होत होती. मात्र त्यांना हृदयविकार असल्याचे माहीत होते. त्यामुळे जागदरी, ता. सिंदखेडराजा येथे संपर्क साधून विचारले असता, ती माहिती खरी असल्याचे सांगण्यात आले. प्रचंड हादरलो.  आठवणींनी मनात काहूर उठले. जागदरी ह्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक एक बाब समोर ठेऊन, काय काय अन कसे कसे नियोजन करायचे? चर्चेतून ठरत होते. त्याचवेळी त्यात खिळ घालणाऱ्या घटकांचा कसा बंदोबस्त करायचा हेही नजरेसमोर होते. त्याच दृष्टिकोनातून व्हीटी सरांच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वीच राजकीय, सामाजिक आदि विविध प्रकारची  उपाययोजना करण्यासाठी बुलढाणा येथे जाऊन आलो होतो. दिवसभर सोबत होतो. त्यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शिवदास रिंढे सोबत होते. गावाच्या विकासासाठी राजकारण विरहित फक्त मैत्री जपणारा शिवदास आमच्या सोबत दिवसभर होता.  जागदरी गावाच्या विकासासाठी व्ही...

लाड झालेत लाखांचे ; करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार ..

इमेज
 लाड झालेत लाखांचे करोडोंची किंमत नाही? मूल्य मात्र मोजावे लागणार .. एक काकुळतीला आलेला शेवटच्या क्षणाचा प्राणी .. आयुष्यात त्याने विरोध केला असेल, कुणाचे वैर पत्करले नाही, आणि दुश्वासही केला नाही. जगणं भारी होत असतांना घरगुती बाबतीवरुन तो कित्येकांच्या नजरेत भरला असावा. अनेकांना मदत देत, त्याने फक्त भलाईचाच धडा गिरवला. तोच आज व्याकुळ होतोय. ज्यांच्यासाठी खूप काही सोडून जावंसं वाटतंय तेच दुश्वास करताहेत. सुरेश भटांच्या भाषेत इथे एकच अध्याहृत आहे की, "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते." त्याचवेळी जगण्याची उमेद असणारा तो म्हणाला की, कितीही वेळा झाले तरी छळ सोसणार,  पण जगणे काय असते? ते तर ह्याचजन्मी दाखवून देणार. कारण त्याने सोसलेलं तो कधीच बोलला नाही. जगण्याची दुर्दम्य इच्छा असणाऱ्यांच्या आयुष्यात केवळ शेवटच्या ओळी त्याच्याच असतील. मोकळा श्वास दुर्मिळ होतो तेंव्हा आयुष्यात संघर्ष करीत करीत .. जगण्याचा श्वास घेत  इथपर्यंत जरी उरला असशील .. जगण्याची नाळ समजण्यासाठी शोध घेत घेत फुका वाया गेला असशील .. तुझ्या भरवस्यावर जगण्याची इच्छा असल्याने ते कृत्य वाईट करीत असतील .. त्य...

सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

इमेज
  सौ. अलका सुधाकर नागरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित सिंदखेडराजा:- तालुक्यातील बारलिंगा येथील सौ. अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. दि.३० जून रोजी, महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे तालुक्यातील खैरव-बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या महिला सदस्या सौ.अलका सुधाकर नागरे यांना सामाजिक क्षेत्रात लोकांसाठी व जनतेच्या हितासाठी केलेल्या योगदानाबद्दल  'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ह्या सन्मानाने गौरवित करण्यात आले आहे.  ह्याप्रसंगी सरपंच नलिनीताई राजेंद्र गरड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी सुधाकर नागरे, माजी सरपंच संजय तळेकर, राजेंद्र गरड, राजेंद्र नागरे, रवींद्र टाले, सुरेश भालेकर, संतोष नागरे व ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

इमेज
यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक - यूपीएससी १४६ वा गुणवंत गौरव  गंगाधर कायंदे वंजारी समाजातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न सिंदखेडराजा:- यशाला कोणताही शॉर्टकट नसतो. ते मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास व त्यामध्ये अपयशाने गर्भगळीत न होता, त्याकडे दुर्लक्ष करीत, अभ्यासात शेवटपर्यंत सातत्य ठेवावे लागते, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षेतील गुणवंत गौरव गंगाधर कायंदे याने केले. देऊळगावराजा येथील योगीराज लॉन्स येथे दि. २५ जून, रविवारी संत श्री भगवानबाबा शैक्षणिक प्रतिष्ठान बुलढाणा-जालना यांच्यावतीने आयोजित 'प्रथम विदर्भ वंजारी समाजरत्न' सन्मान व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात गौरव कायंदे सत्काराला उत्तर देत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तोताराम कायंदे, तर हभप सानप गुरुजी, प्रा.गंगाधर कायंदे, राजेंद्र वाघ, जालिंदर बुधवत, विनोद वाघ, सौ. नंदाताई कायंदे, सौ. शारदाताई जायभाये, आत्माराम कायंदे, भगवान मुंढे, देवानंद कायंदे, दादाराव खार्डे, गणेश मांटे, प्रकाश गीते, रमेश कायंदे, तोताराम  नागरे, सावळाराम नागरे, बद्री बोडखे, डॉ. केशव आघाव, युवराज नागरे, वामनराव आघाव, अमोल काक...